काव्यलेखन

आहे अजून माझ्या हातात जिंकणे मी

Submitted by जयदीप. on 21 January, 2014 - 12:05

पाल्हाळ वेदनांचे...मी ऎकणार नाही
पाल्हाळ वेदनांचे या संपणार नाही

केला ठराव आहे आत्ताच मी दिशांशी
हरवोत त्या कितीही....मी हरवणार नाही

इतकेच होत आहे माझ्या मनाप्रमाणे
माझ्या मनाप्रमाणे मी वागणार नाही

चालायचेच आता माझे हरून जाणे
वाटे मला कधीही मी जिंकणार नाही

तू सोड रे नशीबा रडणे नव्यानव्याने
आता तुला कधीही मी हसवणार नाही

आहे अजून माझ्या हातात जिंकणे मी
सांगून हे स्वत:ला मी फसवणार नाही

स्वप्नामधून माझ्या जाऊ नको कधी तू
डोळे कधीच माझे मी उघडणार नाही

आहे अजून माझ्या हातात जिंकणे मी

Submitted by जयदीप. on 21 January, 2014 - 12:05

पाल्हाळ वेदनांचे...मी ऎकणार नाही
पाल्हाळ वेदनांचे या संपणार नाही

केला ठराव आहे आत्ताच मी दिशांशी
हरवोत त्या कितीही....मी हरवणार नाही

इतकेच होत आहे माझ्या मनाप्रमाणे
माझ्या मनाप्रमाणे मी वागणार नाही

चालायचेच आता माझे हरून जाणे
वाटे मला कधी मी जिंकणार नाही

तू सोड रे नशीबा रडणे नव्यानव्याने
आता तुला कधीही मी हसवणार नाही

आहे अजून माझ्या हातात जिंकणे मी
बोलून हे स्वत:ला मी फसवणार नाही

-जयदीप

प्रेमासाठी जगता जगता

Submitted by स्वाकु on 21 January, 2014 - 01:54

प्रेमासाठी जगता जगता
तुटले नाते फुलता फुलता

माझ्यासाठी उरलो नाही
सगळ्यांसाठी जगता जगता

समजत नाही अश्रूंनाही
रडतो का मी हसता हसता

माझे मी पण सुटले तेव्हा
दिसल्या वाटा बघता बघता

श्वासांनाही कळले नव्हते
विझल्या ज्योती जळता जळता

-- स्वानंद
९८६७२२७२८२

शब्दखुणा: 

गाणीच गाणी ......

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2014 - 23:49

गाणीच गाणी ......

छान छान गाणी ग्गोगोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी

वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी

पर्‍यांची गाणी जादू कहाणी
न संपणार्‍या गोष्टींची गाणी

पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी

बागेची गाणी झोपाळ्यावाणी
मागे-पुढे झुलवणारी

मामाची गाणी अंगाई गाणी
गागू करुया पटाक्कनी

पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....
---------------------------------------

शब्दखुणा: 

आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

स्त्रीसत्ताकी त्या हुकुमातून ...

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 January, 2014 - 10:17

वीणा निर्भया आता इस्टर
कसे कधी हे चक्र थांबणार
नरा नरात लपलेला हा
पशु कधी दूर हटणार

प्रत्येक स्त्री मादी असते
मिळाली तर हवी असते
वखवखलेल्या हवेपणाला
पोर कुणाची का न दिसते

राणी हाती सत्ता यावी
मुंग्यांची मग सेना व्हावी
स्त्रीसत्ताकी त्या हुकुमातून
घडेल काही अथवा नाही

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

एकांत (बालविक्रिडीत वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 20 January, 2014 - 09:57

काढत बसते जुनाट कपडे कपाटातले,
गोंडस झबले विजार इवली जरी फ़ाटले...
लाजत पहिला खट्याळ गजरा हळू पाहते,
रेशम लुगडी कधी पसरते घड्या घालते....

गोल वळकटी निखार भरल्या तरी खोलते,
पत्रविवरणे मला खरडली पुन्हा मोजते....
पान निसटले कुठून जरका तिथे खोचते,
खंगत पडल्या उदास कविता कधी वाचते,

आठव सगळे जमून मजला उगा टोचती,
थेंब निथळते भकास नयनी सदा वाहती...
रोज गवसते जरी कवडसा भुयारात मी
खोदत हसते मनात दडली जुनी खाण मी....

भग्न तसविरी विराण पुसते दिसाया जरा,
हार बदलते कृत्रिम पिवळा जसा की खरा .....
बांधव नवरा मुले विलगली अनायास का,
आत तडपण्या उरात उरले अता श्वास का.....

निरलस

Submitted by अज्ञात on 20 January, 2014 - 06:54

सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते
अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते

स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते
रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते

कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते
झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते

………………. अज्ञात

कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

Submitted by आनंदयात्री on 20 January, 2014 - 01:16

राजगडला, लोहगडला
मोरोशीच्या भैरवला
साल्हेर, वासोटा, माळशेजला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

वाटाच वाटा - जाऊ कुटं
थंडीचा काटा - र्‍हाऊ कुटं
उन्हात रापायला, वार्‍यात टाकायला
सोबत चला नं भटकायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला?

पायात अ‍ॅक्शन घालून,
पाठीस हॅवर लावून
कातळ चढून, दरीत पाहून
कधी कधी जाऊया रॅपलिंगला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

कोकण कडा तर आवडीनं
टक्कमक बघूया जोडीनं
सनसेट पाहून, शेकोटी लावून
गुहेत जाऊया झोपायला
कुटं कुटं जायाचं ट्रेकिंगला...?

- नचिकेत जोशी
(पूर्वप्रसिद्धी - 'चक्रम हायकर्स' तर्फे प्रकाशित 'सह्यांकन २०१३' स्मरणिका
आणि

पुन्हा फुटकळ

Submitted by विजय दिनकर पाटील on 20 January, 2014 - 00:36

नवीन स्वतंत्र धागा झाल्यामुळे धागा संपादित केला आहे. स्वतंत्र धाग्याबद्दल आभार डॉक्टर!

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन