आदाब अर्ज है.... :)

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13

गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्‍याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.

सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.

--डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'नमस्ते' 'हाय' पेक्षा वेगळे बोलू
जरासा मोकळा हो मोकळे बोलू

---

समृद्धी असली तर शांती कलह फकीरी असताना
इतर कुठे पर्याय मिळाले विवंचनेच्या दिमतीला

---

कडाक्याचा इरादा ठीक नाही
तिरिप येतेय छोटी हे जमेचे

---

--'कणखर'
============================================

कोण काय ठरवून निपजतो दुनियेमध्ये
फळ ठरतेच कुठे, ठरते तर इच्छा ठरते

--समीर चव्हाण
=============================================

दिलीस जी वेदना तिचा मी असा बनवलाय पारवा
अता तिचा हुंदका जराही घुमून येईल तर शपथ

--वैभव कुलकर्णी.

======================================

...................................

हुंदका ऐकून माझा ते म्हणाले..
छान आहे, पण तरी ती बात नाही...

- सदानंद बेंद्रे
...................................

वा, वेगळा धागा केल्याबद्दल धन्यवाद डॉक.

वाट बघत बसलेत जगाचे मंच हजार
मी किमया हरवत जाणारा किमयागार

- डॉ. अनंत ढवळे

पाहतो आता जरा चालून मी तिरपागडा
सरळ वाटू लागतो का घाट वेडावाकडा

आपल्या मतभिन्नतेमध्ये असे सातत्य आहे
आपले जमणार नाही हेच अंतिम सत्य आहे

नुसती ढिगार्‍यातून वरती मान केली
कोणीतरी आला फुले टाकून गेला

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी

किती तर्‍हेच्या अतर्क्य घटना रटाळ गोष्टी म्हणजे जीवन
अनेक वर्षे रखडवलेला डेली सोप बरा एखादा

पाट्या टाकत ये जा करतो कायम एकच रस्त्याने
पूर्वी पायी आता गाडी हेच काय ते न्यारेपण

----
'कणखर'

हृदयामधले घड्याळ असते सुरु निरंतर
तू दिसल्यावर जाणिव होते टिकटिकण्याची

--डॉ.कैलास गायकवाड

================================

मी दक्षिण टोकावर,उत्तर टोकावर तू
विजातीय ध्रुवांत किती आकर्षण असते

--डॉ .कैलास गायकवाड

स्टेशन

दोन सुखाच्या घासांवरही भागत असते
कुठे जिंदगी इतके सारे मागत असते

ऊर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते

तुला द्यायचा आहे तर दे स्वर्ग असा की
गरिबीचेही जेथे हसून स्वागत असते

इतकी येते याद कुणाला माहेराची
लागे चटका किंवा भाकर डागत असते

फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते

वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते

माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते

'शाम' बदलल्या इथल्या माणुसकीच्या व्याख्या
दुनिया हल्ली पैसा बघून वागत असते

- शाम
------------------------------------------------------------

मस्त संकल्पना. धागा श्रीमंत करूयात. >>>> +१००...

काय धागा सुरू झाला आहे! व्वा व्वा! प्रथमच काहीतरी निवडक दहात घ्यावेसे वाटत आहे. येथे आता रोजच मजा येणार. खाली दिलेले सर्व शेर अतिशय आवडले.

ह्या धाग्यान्वये अभिव्यक्तीच्या इतक्या देखण्या पाकळ्या एकाच फुलात बघायला मिळणार आहेत की उत्तम रसनिर्मीतीचे मायबोलीवरील सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरेल!

-'बेफिकीर'!

==================

कडाक्याचा इरादा ठीक नाही
तिरिप येतेय छोटी हे जमेचे

कोण काय ठरवून निपजतो दुनियेमध्ये
फळ ठरतेच कुठे, ठरते तर इच्छा ठरते

दिलीस जी वेदना तिचा मी असा बनवलाय पारवा
अता तिचा हुंदका जराही घुमून येईल तर शपथ

हुंदका ऐकून माझा ते म्हणाले..
छान आहे, पण तरी ती बात नाही

वाट बघत बसलेत जगाचे मंच हजार
मी किमया हरवत जाणारा किमयागार

नुसती ढिगार्‍यातून वरती मान केली
कोणीतरी आला फुले टाकून गेला

देखण्या गावास देहाची सहल ठरली
पाहतो येतात सोबत कोणत्या व्याधी

किती तर्‍हेच्या अतर्क्य घटना रटाळ गोष्टी म्हणजे जीवन
अनेक वर्षे रखडवलेला डेली सोप बरा एखादा

हृदयामधले घड्याळ असते सुरु निरंतर
तू दिसल्यावर जाणिव होते टिकटिकण्याची

मी दक्षिण टोकावर,उत्तर टोकावर तू
विजातीय ध्रुवांत किती आकर्षण असते

फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते

वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते

माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते

'शाम' बदलल्या इथल्या माणुसकीच्या व्याख्या
दुनिया हल्ली पैसा बघून वागत असते

वेळ तुझी ठरलेली आहे अमकीतमकी
रोज सकाळी नवी वेदना देते धमकी

ह्या जगण्याशी लढण्याचे भय कुणास आहे
माझ्यापेक्षा आहे माझी व्याधी खमकी

=============================

आक्रंदुनी मी घेतली प्रतिभेत जास्तीची उचल
आता तुझ्यावाचूनही होते तुझ्यावरती गझल

(ह्या मतल्याची गझल होऊ शकेलही, तूर्त सांगता येत नाही)

-'बेफिकीर'!

तिन्ही शेर आवडले बेफि.

पहिले दोन फार आवडले. माणूस जात असलेल्या फेजमधे होणारे शेर लगेच जाणवतात.

ह्या जगण्याशी लढण्याचे भय कुणास आहे
माझ्यापेक्षा आहे माझी व्याधी खमकी

व्वा.

एक नवीन शेरः

माझ्यासोबत एक प्रवाही विचारधारा
माझ्यामागे दशदिशांतली मतमतांतरे

समीर

एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते

~वैवकु

माबोवरचे तब्बल दोन "वन ऑफ दि बेस्ट" धागे तुमच्या नावावर !!!..तरहीचा आणि हा .... अभिनंदन डॉ. साहेब आणि धन्यवाद

निवडक दहात !!

देशासाठी लढताना, प्राणांची लावुन बाजी, शौर्याची गाथा लिहिली; इतिहास घडवला त्यांनी....
सत्तेसाठी कुढताना, गुंडांना धरले हाती, झुंडीच्या भीतीपोटी इतिहास बदलला त्यांनी !!

~~ शरद

झाडाने रोखुन धरला ऑक्सीजन
झाडाखाली ला़कुडतोड्या बसला

~वैभव देशमुख

तुझ्यासाठी न इथले चांदण्यांचे डोह
मनाच्या अंतरंगी मस्तपैकी पोह

~समीर चव्हाण

(शेर लिहिण्यात चूक झालेली असल्यास क्षमस्व आठवेल तसा लिहिला ..)

बेस्ट धागा आहे. धन्यवाद.

एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते>>> पहिली ओळ कमाल आहे, दुसरी ओळ जमत नाहीये. कुछ तो बदलो.

नंदिनी ...आपल्याला माझी एक ओळही आवडली ह्याचे समाधान होत आहे
जमल्यास बदल करीन पण हा शेर मी विठ्ठलासाठी योजला आहे तूर्तास तरी बदलावा असे वाटत नाही आहे पण बघू ..तुम्ही म्हणताय तर प्रयत्न करीन Happy

ह्या शेराची गझल अजून सुचत नाहीयेय कदाचित अख्ख्या गझलेत वाचला तर जमीनीमुळे अजून खुलून येइल मी जुल्काफियाच्या प्रयत्नात आहे जमेलसे वाटते आहे बघू ..आशिर्वाद असूद्यात ;)..

माझ्यासोबत एक प्रवाही विचारधारा
माझ्यामागे दशदिशांतली मत मतांतरे<<< वा वा! (मतमतांतरे असे सलग लिहितात मला वाटते). मस्त शेर!

एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते <<< वा वा, नंदिनींशी सहमत! दुसरी ओळ बरीच वेगळी असायला हवी असे आपले वाटून गेले.

जमल्यास बदल करीन पण हा शेर मी विठ्ठलासाठी योजला आहे >विटठ्टठल आणि सिग्रेट हे काय झेपलं नाही. पण तरीही असो. पहिली ओळ मात्र मला तुफान आवडली.

विटठ्टठल आणि सिग्रेट हे काय झेपलं नाही.<<< Proud

हे असे झेपवून घेण्यातून अनेकदा गझलेबाबतची अभिरुची विकसित होते / होऊ शकते. शेर मात्र खरोखरच सकस असायला हवा, झेपवून घेण्यातून अभिरुची विकसित होते असे प्रमाण मानून वाट्टेल तसे शेर लिहिणे योग्य नाही. वैवकुंचा हा शेर बराच प्रॉमिसिंग (वाटत) आहे.

Pages