निरलस

Submitted by अज्ञात on 20 January, 2014 - 06:54

सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते
अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते

स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते
रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते

कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते
झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते

………………. अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा!! सुंदर... सुंदर...

स्पर्शखुण गंधाळलेली.. अंतराची कुपी.. शब्दांचे जोखड.. वा वा, वा..

वाह मस्तच
हि कविता बर्‍यापैकी सोपी झालेली दिसते<<< अगदी हेच म्हणणार होतो की कविता बरीच सोपी झाली आहे म्हणून !
मी फार पूर्वी एकदा तुमच्या एका कवितेवर काहीसे असे सांगणारा प्रतिसाद दिला होता की आपल्याकडे असलेल्या बेजोड शब्दकळेत आपण गझल करावीत ... तो प्रसंग आठवला(त्यात आपण वैखरी हा शब्द वापरला होतात ती कविता बहुधा )
ह्या कवितेत जो सोपेपणा (अर्थ समजून घेण्याचा दृष्टीने) ह्याच्या पेक्षा अजून थोडा सोपेपणा आणता आला तर आपल्याकडून खूप हटके आणि यादगार गझल होतील ह्यात मला आजही बिल्कूल शंका नाही
असो
धन्स

धन्यवाद अमेय.. Happy

वैभवजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. गजल ह्या प्रकाराबद्दल मला आकर्षण जरूर आहे. मागे एका कर्यशाळेत सहभागीही झालो होतो. पण का कुणास ठाउक, जाणीवपूर्वक रचना करताना शब्द-यमक-आणि मात्रांचे भान ठेवणे, मला समधान न देता जड गेले. अपेक्षित सहजता येऊ शकली नाही त्यात. जिभेच्या सहज वळाणावरून शब्दांचे अलगद ओघळणे ( भले ते समोरच्याला त्याच्या अनुभुतीनुसार थोडे दुर्बोध साले तरी ) मला जास्त भावते.
अर्थात हा आपापल्या जन्मसिद्ध मर्यादांचा स्वभावही असू शकतो तो ओलांडण्याचा प्रत्न रचनेत कृत्रिमता आणेल की काय असे वाटते.. आपल्या शुभचिंतनाबद्दल मनःपूर्वक आभार.. !!