गाणीच गाणी ......

गाणीच गाणी ......

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2014 - 23:49

गाणीच गाणी ......

छान छान गाणी ग्गोगोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी

वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी

पर्‍यांची गाणी जादू कहाणी
न संपणार्‍या गोष्टींची गाणी

पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी

बागेची गाणी झोपाळ्यावाणी
मागे-पुढे झुलवणारी

मामाची गाणी अंगाई गाणी
गागू करुया पटाक्कनी

पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....
---------------------------------------

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गाणीच गाणी ......