गाणीच गाणी ......

Submitted by पुरंदरे शशांक on 20 January, 2014 - 23:49

गाणीच गाणी ......

छान छान गाणी ग्गोगोड गाणी
म्हणू या राणी दोघी जणी

वेलीची गाणी फुलांची वेणी
झाडांची गाणी फळांची गोणी

पर्‍यांची गाणी जादू कहाणी
न संपणार्‍या गोष्टींची गाणी

पावसाची गाणी झुळझुळ पाणी
गडगड ढगांची लखलख गाणी

बागेची गाणी झोपाळ्यावाणी
मागे-पुढे झुलवणारी

मामाची गाणी अंगाई गाणी
गागू करुया पटाक्कनी

पापी तुझी साखरेवाणी
हसते कशी राधाराणी....
---------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राक्तनाचे अलगुज असे
का कोणी न जाने
सांजची ती किरणे हि
का उसने अश्रुंचे मांगे

क्षितीज माझा आत्ता
अजूनहि अंतरापलीकडे
त्यास पाहता पाहता
पाणवतात आज हि पापण्याचे कडे

विरघळतात शब्द अन
अश्रू हि ओघळतात
त्या सांज ची किरणे ही
आज भावनांचा व्यवहार करतात

क्षीण होत होत आज तो
रविराज हि गिळकृंत झाला
माझ्या एकट्याचा डाव
सख्य बघ असाच मोडीत निघाला

प्राक्तन ना जाणिले कोणी
वेश्य भाव मानिले सर्वांनी
आम्हीच पुसतो आम्हास
इथे समय देतोय कोणी

आपुलेच भाव इथे
आम्हास जड जाहले
का कुणाचे आत्ता
ओझे आम्ही वाहिले

काक आरोळी साठी
सारा मुलुख इथे जमा
मेजवानीच्या शामियाने साठी
जमला हा सगळा समा

विरक्त शरीर माझे
आसक्त आत्मा घेऊन
फिरते आज हि
कित्येक आशा घेवून

माझ्या शब्दांचा अर्थ
इथे वेगळाच लावला जातो
अहो नाही म्हणालो तरी
संभ्रमात पाडलो जातो

कसे सांगावे ह्या निर्जीव समाजाला
ह्या मनाची आगतिक इच्छा
हात पसरवावे म्हणतो... तर
त्यास म्हणे भिक्शुकाची दीक्षा

काय गुन्हा जो माझा होता
आकांक्षा साऱ्या मरून पडल्या
त्याची हि कलमे सारी
माझ्यापाशीच त्यांनी धाडल्या

भग्न देवूळ हि आत्ता
आसरा देईनासा झाला
समाजात राहून देव हि
आत्ता माझ्यावर कोपला

मिटलेल्या डोळ्याने
सारे सहन करीत आलो
मेलेल्या ह्या मनाला ...
आज पुन्हा मारून आलो

काल तो मृत्यू
माझ्या दारात आला
मुक्तीचा संदेश देवून
तो हि तसाच परतून गेला

मी क्षणभर
तसाच होतो
मुक्तीची व्याख्या... पुन्हा पुन्हा
पडताळत होतो

हाती फ़्क़्त
शून्य लागत होते
नात्याच्या ओढीत
मन कासावीस होत होते

का बर तो असा
चाहूल देवून गेला
माझिया सुखाची व्याख्या
पूर्ण मोडून गेला