ओंकार

अलवार सुगंध मोगरीचा

Submitted by Meghvalli on 18 March, 2024 - 04:41

अलवार सुगंध मोगरीचा
दरवळला माझ्या मनांत
जणु मिठीत सरुन माझ्या
तु शांत नीजली आहे ।।१।।

अधिर कटाक्ष तुझा
अंगी रोमांच दाटलेले
ती भेट चांदण्यात
मनांत जपून आहे ।।२।।

बरसतात श्रावण सरी
अंग चिंब भिजलेले
निसर्ग हा सजलेला
प्रेम गीत गात आहे ।।३।।

बंद होतां पापण्या
तुलाच पाहतो मी
पुर्ण चंद्र आसमंती
स्वरुप तुझेच आहे ।।४।।

श्वासात तुच माझ्या
तुच स्पंदनात आहे
तुच नादब्रह्म माझा
ओंकार तुच आहे।।५।।

रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - ओंकार रेखाचित्र

Submitted by सावली on 28 September, 2015 - 02:58

ओंकार प्रधान रुप तुझे देवा

१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता.

Subscribe to RSS - ओंकार