घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या सजवलेल्या मॅनेक्वीनवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.
*कट २*
लॉकडाऊनकाळात अमेझॉन / नेटफ्लिक्सवरील काही मालिका पाहून झाल्या. त्यापैकी काही आवडल्या. तर अश्याच एका आवडलेल्या मालिकेबद्द्ल काही लिहिलेले..
......................................................................................................................................................................................................................
कधी कधी वाटतं सोडून द्यावं सगळं अन् जावं निघून कुठेतरी दूर ...
जिथे येणार नाहीत कसलीच संकटं,
पडणार नाहीत भयानक प्रश्न, वाटणार नाही जिव्हाळा कुणाशीच ...
जिथे नसेल अशी जीवघेणी स्पर्धा, जी संपवून टाकते जगण्याची इच्छा...
जिथे नाही करावा लागणार समाजाचा विचार, नाहीत द्यावी लागणार इतरांच्या प्रश्नांची उत्तरं...
नसेल कुणाचं नियंत्रण तुमच्या इच्छेवर, जिथे येणार नाहीत कसलीच बंधनं तुमच्या विचारांवर...
जिथे नाही झिजावं लागणार इतरांसाठी,
जिथे फक्त आपण असू, स्वतःसाठी...
मग आठवतात ते चेहरे,
जे बसलेत आस लावून उज्वल भविष्याची,
आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाताना केसाला काळा रबरबँड लावत होते. हो, रबरबँडच. इथे अमेरिकेत बहुतेक त्याला हेअरबँड म्हणतात. पण माझ्या लहानपणी आम्ही याला रबरबँडच म्हणत असू. वॉकला जाताना केस बांधून गेलेलंच बरं पडतं. केसांचा गुंता होत नाही आणि घामाने केस चेहर्यावर चिकटतही नाहीत. इथे या शहरात चालण्यापेक्षाही धावण्याचं मोठं प्रस्थ! सकाळी कितीतरी मुलं, मुली, काका, काकू, आजी आजोबा सुद्धा इथल्या नदीकिनारी असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरून धावताना दिसतात. मला मॉर्निंगवॉकची सवय पण इथे येऊनच लागली. माझा नवरा पळायला जातो पण मी त्याला म्हणाले मला आधी नित्यनेमाने चालणं जमलं तरी पुष्कळ आहे.
सर्व मुळ रचनाकारांची आणि रहस्य कथा कार माननीय ' बाबुराव ' याची माफी मागून ….
तड्क्याचे भडके संपले । वैराग्य धावुनी आले ।
मायबोलीचे my बोली झाले ।
जानुनी ....घ्या हो रोमातील सकळीक ।
कोणीही उठले , काहीही बोलले ।
त्याचे प्रत्यंतर रागात झाले ।
जर आमचे 'बाबुराव ' गन घेवून घोद्या वरून आले ।
स्तेनगन ने ते गझला पाडू लागले ।
आणि नीश्ठेचे फल त्यांना लाभले ।
भंगलेल्या अभंगाचे पेटंट मिळाले ।
तर मग दोष कोनास देनार ।
म्हणून म्हणतो - ' मी कोण कुठला काय करतो ते न सांगता च ओळखावे? '
हे ज्याचे त्याने आणि नाहीतर वेब मास्तरांनी जाणावे
आणि या नव काव्याला पहिल्या पानावर ठेवावे ।