तुझी वाट् बघण्यात् संध्याकाळ् सरुन् जाते
रोज् माझ्या मनाचे गाणे हवेत् विरुन् जाते
एकटेपणाला सोबत् घेऊन् ही सांज् रोज् मला भेटते
तुलाही येत् असेल् माझी आठवण् उगाच् तेव्हा वाटते
कधी आठवुन् एखादा क्षण् मन् उगाच् कासावीस् होते
तु नसतांना देखील् मन् तुझेच् होऊन् राहते
रोज् नवी संध्याकाळ् तुझी नवी आठवण् देते
येशील् तु कधीतरी मन् उगाच् ग्वाही देते
सारे काही आलबेल् असते एक् मला सोडुन्
मन् मात्र् वेडं होते तुझी आठवण् काढुन्
सगळा हा खेळ् चालतो फक्त् एक् तुझ्यासाठी
एकांत् हा करत् राहतो मनाला सोबत् प्रेमापोटी
दिवेलागणीला मन् एकट्च् घरी परत् येते
ऑलिंपीक नॅशनल पार्क, वॉशिंग्ट्न स्टेट, यु.एस.ए.
वाळवंटातील संध्यारंग

संध्याकाळ
अशाच एका संध्याकाळी तुझी आठवण दाटून आली
डोळ्यामध्ये साठवलेले अश्रू सहज सांडून गेली
एकेक दिवस एकेक क्षण तुझ्या माझ्या भेटी मधले
एकेक भाव एकेक स्पर्श तुझ्या निश्चयी मिठी मधले
तोच चंद्र तीच रात तीच झुळूक वार्याची
आजही वेडी प्रीत माझी वाट पाहते या सार्याची
बकुळीची फुले पाहता तुझा स्पर्श आठवतो
त्या माळेचा सुगंध सजणा आजही मन भरून वाहतो
आज ही कंठ दाटून येतो होतो आठवांचा पसारा
आज ही तुझाच भास होतो झेलून घेता पाऊसधारा
सारे काही तसेच आहे पाऊस, वारा, बकूळमाळ
आता फ़क़्त परकी झाली तुझ्याविना ही संध्याकाळ.....
माध्यम : ऑइल
दोन वर्षांच्या मोठ्या अंतरा नंतर पुन्हा एकदा चित्र काढण्यासाठी सुरुवात केली आहे .. पहा तुम्हाला आवडते का?
