शशक - खास दिवस

Submitted by निरंजन कुलकर्णी on 21 September, 2019 - 06:58

मोहन झोपला. उद्याचा दिवस खास होता.

दारावर टकटक झाली. मोहनला जाग आली. घड्याळात पाहिले. बाराला दहा कमी.

यावेळी कोण दार वाजवतय? मनात विचार आला.

दार उघडलं. बाहेर कुणीच नाही. मोहन बाहेर गेला दार वाजवणाऱ्याला शिव्या देत.

कोणीतरी हात पकडला व खेचला. ओढत नेलं व गाडीत टाकलं.

गाडीत चार जण. चेहेऱ्यावर मुखवटे. मोहन घाबरला. गाडी सुसाट निघाली. मैदानासमोर थांबली.

हे तर कॉलेजचं मैदान. मोहनला मैदानावर नेलं. भीतीमुळे तोंडातून शब्द निघेनात.

एकाने हात पकडले तर एकाने पाय. वर उचलला. दोघांनी पार्श्वभागावर लाथा हाणल्या.

चौघांनी मुखवटे काढले व ओरडले –

हॅपी बर्थडे!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users