चुकलेच

मायबोली वर लेखन केल्यामुळे नक्की काय मिळते?

Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 00:13

मायबोलीवर भरपूर ग्रुप्स आहेत.प्रत्येकाचा विचार केलेला दिसतो.ज्याची जी आवड ते तो/ती लिहिते,वाचते.
वाचकांना आनंद मिळत असेल, लेखक कवी हे ही आनंद लूटत असतील.
असे मी समजते!!!!!
पण हे खरेच आहे का? टाईमपास करणारेही आनंद घेतातच ना??? टींगल करून, एखाद्या चा मामा करून!!!!!!
मग माबोवर लेखन करून काय मिळतं??
निखळ आनंद!!!! की नुसता आनंद?????
की फक्त टाईमपास??????
का आणखी काही आहे,जे मला अजून कळलेले नाही.पण माबोकरांना 'ते' गुपीत ठाऊक असणार----- त्यामुळेच कदाचित मायबोलीवर मायबोलीकर लिहीत आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली वर खरेच माहिती मिळते का?

Submitted by Mi Patil aahe. on 7 December, 2018 - 23:55

मला वाटले होते मायबोली कर खूप छान माहिती देतात.पण ते माहिती कमी अन् खिल्ली जास्त उडवतात--- असे जाणवले!!!! फेसबुक अन् मायबोली हे दोन्ही टवाळखोरांनी व्यापले आहे. फेसबुक वरील comment अन् माबोकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया ( माहिती) या दोन्ही टिंगलटवाळी वाटते. काही माननीय अपवाद आहेत.ज्यांच्यामुळे मायबोली वर थोडवेळ रेंगाळत राहायला आवडून जाते.
पण टवाळखोरांमुळे वाटून जाते की " भीक नको पण कुत्र आवर"

शोध मनाचा

Submitted by Mi Patil aahe. on 6 December, 2018 - 04:19

संस्कार, संसार, संस्कृती, संत, संतोष, संक्रांत, संपूर्ण, संधी, संवाद, संवर्धन, संवेदना, संवेदनशील, संघ, संगीत, संगोपन, संडास( जनावरे/मानवप्राणी यांचे शौच जे प्रक्रिया करून "बायोगॅस" म्हणून वापरला जातो, याच बायोगॅस प्रकल्प उभारणीमुळे ग्रामिणभागाचे कित्येक प्रश्न मार्गी लागले असल्याचे दिसून आले आहे.), संमोहन, संतती,संपत्ती, संघटना, संघर्ष, संजय, संदेश,संदर्भ, संस्था, संजीव----- यात "सं " आहे. "सं"म्हणजे?,काय अर्थ आहे या "सं" चा?
"सं" म्हणजे मला वाटते तेजस्वी!/दैवी/एक दिव्य/अनामिक शक्ती!!!

शब्दखुणा: 

Bhangda ( panjabi) dance कोणत्या गाण्यांवर basavava?

Submitted by Mi Patil aahe. on 6 December, 2018 - 00:33

5/6 varshachya mulancha bhangda dance kontya bollywood ganyavar basavava v kasa?
इथे मी फक्त माहिती विचारली आहे.
माहिती देता आली तर द्या.मायबोली ला तुम्ही इतके कमी लेखता का, की अशा प्रकारच्या माहिती
मायबोलीवर,मायबोलीकर देऊ शकणार नाही, असे नाही ना!!! मग जमेल तशी माहिती द्या!
अर्थात ते प्रत्येकाला जमणार कसे? म्हणजे
(एखाद्याला सविस्तर माहिती देणं/मार्गदर्शन करणं वा मार्गदर्शक बनणे अन् कुणालाही भांगडा येणं किंवा शिकवणं-------)

६४ कला,१४ विद्या नेमक्या कोणत्या आहेत?

Submitted by Mi Patil aahe. on 1 December, 2018 - 23:53

६४ कला असतात म्हणे अन् १४ विद्या!
पण त्या कोणत्या?
नृत्य, गीत, संगीत-----या ६४ कलांमध्ये मोडतात,असे वाटते.
तर
वाक्चातुर्य, ज्योतिष, संमोहन--- अशा काही विद्या वाचनात आहेत.
पण पूर्ण माहिती नाही.तर ही माहिती कोण देईल मला?
कुणी दिली माहिती तर उत्तमच तेव्हढीच ज्ञानात भर!!
अन् नाहीच दिली तरी फारसे काही बिघडणार नाही,निदान रोजच्या रहाटगाडग्यात!!!!!

Playgroup च्या मुलांचा डान्स कसा बसवावा?

Submitted by Mi Patil aahe. on 1 December, 2018 - 23:32

२६ जानेवारी. करीता एक ग्रुप डान्स स्कूल मध्ये बसवायचा आहे. तरी कोणते गाणे (हिंदी, मराठी) व स्टेप योग्य ठरतील? 2/3 वर्षां च्या मुलांसाठी!
१५ Aug.२०१८ ला नर्सरी च्या मुलांचा 'नन्हा मुन्ना राही हूं !' डान्स बसवला होता.त्यामुळे आता तो प्रिंसिपल स्विकारणार नाहीत.
नाच रे मोरा - ला माझी पहिली पसंती होती,जी प्रिंसिपल & इतर टिचर ना पसंत पडली नाही,म्हणून तर हा अट्टाहास!!!!
हो "छोटीसी आशा - " ला प्रिन्सिपॉल नी थोडीशी सहमती दर्शवली आहे खरी ---- तरीही त्यांच्या मते स्लो ,शांत गाणे नको ----
नविन,जोशपूर्ण, बालमनाला साजेल असे गीत हवे आहे.

रोपटे

Submitted by Mi Patil aahe. on 1 December, 2018 - 09:11

एक रोपटे वाय्रावर डुलताना पाहिले!
कधीतरी, कुणीतरी खुडून गेले----
पुन्हा ते उगवून आले----
झाले गेले विसरून गेले;
त्याच मस्तीत डोलत राहिले!
त्याला पाहून मन माझे हासले;
त्याच्यासारखे जगणे आवडले!
मातीतून पुन्हा उगवणे!!!!!
स्वत:ही जगणे----
अन् दुस-याला ही जगवणे!

शब्दखुणा: 

देवळातल्या देवा

Submitted by Mi Patil aahe. on 29 November, 2018 - 06:23

देवळातल्या देवा,
मी तुला विचारू किती?
ह्रदयातला बाप्पा माझा उठणार कधी?
अंत:करणातला देव मला दिसणार कधी?
कुठे रे राहते, ती तुझी भक्ती?
गाठ घालून देशील का, तिची न् माझी?

देवळातल्या देवा,
मी तुला विचारू किती?
माझ्या प्रश्नाच उत्तर, दे की रे आता!!!!!
नवसाला पावणारा देव, तू असा रे कसा?
मुका की बहीरा, तुला काय म्हणू आता?
देवळातल्या देवा,बोल की आता!!!!!!

शब्दखुणा: 

विसावा

Submitted by Mi Patil aahe. on 29 November, 2018 - 05:58

तू येशील----
अन् तू आलास!!!!
असाच अचानक---
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तुला पाहताच---
सारं बळ एकवटून मी कामाला लागले!!!!
तेव्हा तू कित्ती ओरडलास माझ्यावर----
कित्ती काळजी घेतोस ना माझी!
आठवड्यातून दोनदा पत्र---
अन् फोनतर वेगळाच!!!!!
कित्ती प्रेम भरलय तुझ्यात-----
अगदी बापावर गेलास!!!
पुत्र असावा तर तुझ्यासारखाच---
माझ्यासारख्या मातेला तेवढाच विसावा!!!!!

शब्दखुणा: 

अंधारबाबा

Submitted by Mi Patil aahe. on 28 November, 2018 - 06:19

अंधाराची मला बाबा फारच वाटे भीती !
असतो म्हणे,बागुलबुवा दबा धरून बसलेला----
अंधाराचा शर्ट घालून येतो म्हणे, हळूच रात्री!
लहान मुलांना पाहताच----
घालतो म्हणे ; हळूच आपल्या खिशात!
अन् घेऊन जातो म्हणे; आपल्या दूर अंधार देशात!!!!!!
एकदा मात्र मी ठरवूनच टाकल----
अंधारबाबाला हाकलून लावायच!
कोपरातली काठी घेऊन,
मी त्याच्या मागेच लागलो!
तोच, " कुठे धडपडू लागलास, सकाळच्या पारी?"
आवाज आला कानी!!!!!!
वळून पाहिले मागे तर ;आई होती दारात उभी!
"अंधारबाबाला मी हाकलून लावले"छाती फुगवून मी सांगू लागलो----

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चुकलेच