बालपणापासून माझे एक स्वप्न आहे,जे आजही पूर्ण झालेच नाही अन् होईल असे आता वाटतही नाही.का? असे काय स्वप्न आहे माझे?
तसे फार मोठे नाही---- पण कठीण नक्की आहे.
कारण इच्छाशक्ती कमी आहे.
तशी इच्छा हीच स्वप्नांची माऊली असते.आईशिवाय लेकराची आबाळ होते तशीच इच्छाशक्ती शिवाय स्वप्न साकार होणे कठीण!!!!
आणि इच्छा मनात जन्मते,म्हणून इच्छेला शक्तीची (मनाची) जोड हवी.तरच स्वप्न साकारली जाऊ शकतात.
म्हणजे इच्छा ही स्वप्न आणि मन यातला महत्त्वाचा दुवा आहे.
जेव्हा मी वाचायला शिकले, जेव्हा मी लिहायला शिकले,अन् मग मलाही वाटू लागले आपल्याला ही असेच लिहायला आले तर, आपलं लिहिणं कुणाला आवडलं तर---
हे स्वप्न त्याच लहानपणी शाळेत असताना साकारले.शिक्षक, शाळेतले विद्यार्थी माझ्या निबंधाचे कौतुक करू लागले अन् मी आs वासून स्वत:च्या आत डोकावू लागले.
हे सारे माझ्यासाठी स्वप्नवत् होते.
तशी स्वप्न झोपल्यावर ( डोळे मिटल्यावर) पडतात सहसा--- बय्राचजणांना स्वप्न पडत नाहीत किंवा आठवतं नाहीत!
काहीजणांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहायची सवय असते.(शेखचिल्ली स्वप्न /दिवास्वप्न म्हणा हवी तर)
मनात आले एकदा रेखाटावे चित्र!
वाटत होते सारखे ----
त्यात दिसावे आपले प्रतिबिंब!
सगळ्यासाठी असले ;
जरी ते नुसतेच चित्र-----
पण माझ्यासाठी होते ;
ते आगळेच स्वप्न!
मी आज तुला वास्तवात भेटले;
पण मनास ते स्वप्नच भासले!
आले ते दिवस परतूनी क्षणात;
तुला भेटताच माझ्या मनात!
एकच आहे इच्छा मनोमनी;
तुझी न् माझी भेट व्हावी क्षणोक्षणी!
भेटत जा ना;
कधीतरी-----
वास्तवात नाही ;
स्वप्नात तरी!!!!!
मला आज काहीतरी लिहावस वाटलं
कुणाला काहीतरी सांगावस वाटलं
अन् मग काय? मायबोली आली साक्षात!
अन् म्हणाली, बोल माझ्या कानात!!!
<माझे मन पाखरू मनपाखरू
उडतसे नभी!
पहा मनी बांधिला खोपा कुणी?
खोपा कुणी?
कोण ही आली नवी?
आली नवी?
न्याहळते नजरा-----!!!
हास्य फुलते अधरा----!!!!
होती तहान अधुरी----!!!!!
तीच होते का आज पुरी?>
मराठी माझी मायबोली
तरीही वेडावते इंग्रजी
काही गणित कळत नाही
सायन्स अजून वळत नाही
इतिहास तसा कच्चाच आहे
भूगोलाचा गोल शून्यच आहे