मायबोली वर खरेच माहिती मिळते का?

Submitted by Mi Patil aahe. on 7 December, 2018 - 23:55

मला वाटले होते मायबोली कर खूप छान माहिती देतात.पण ते माहिती कमी अन् खिल्ली जास्त उडवतात--- असे जाणवले!!!! फेसबुक अन् मायबोली हे दोन्ही टवाळखोरांनी व्यापले आहे. फेसबुक वरील comment अन् माबोकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया ( माहिती) या दोन्ही टिंगलटवाळी वाटते. काही माननीय अपवाद आहेत.ज्यांच्यामुळे मायबोली वर थोडवेळ रेंगाळत राहायला आवडून जाते.
पण टवाळखोरांमुळे वाटून जाते की " भीक नको पण कुत्र आवर"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माहिती मिळते नक्कीच पण 2..3 ओळींचे धागे काढून काहीहीहं ह प्रकारची माहिती मागितली तर नक्कीच खिल्ली उडवली जाणार

पर्यटनस्थळे, चित्रपट, पाककृती, पाळीव प्राणी, टीव्ही - गाडी सारख्या वस्तू, दूरदर्शन मालिका अश्या गोष्टींची विपुल माहिती मिळू शकते.

राजकीय व सामाजिक धाग्यांचे आखाडे झालेले असतात.

गझलांना संमिश्र प्रतिसाद येतात. कथा, कविता ह्यांना चांगले प्रतिसाद येतात. टाईमपासचे जे धागे असतात, जसे शाहरुख वगैरे, त्यावर धमाल चाललेली असते व क्वचित वादही होतात. स्कोअर सेटल करण्यासाठी कोणताही धागा वापरला जाऊ शकतो असा अनुभव आहे. उचकवणारे धागे आले की दोन दिवस अजगरासारखे पडून राहतात आणि मग शेवटी उसळून वर येतातच आणि तुफान मारामारी होते. वाहती पाने हे एक प्रकारचे उपसमुह असतात. तेथील सामुहिक मानसिकता खिल्ली उडवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत कुठेही वावरत असते.

आदु यांच्या या धाग्यावरच्या पहील्याच प्रतिसादाशी सहमत!
खर म्हणजे त्या प्रतिसादानंतर अजुन काही बोलण्याची आवश्यकता नाही

तरीही तुमच्या त्या भांगडाच्या धाग्यावर आलेले प्रतिसाद बघता बऱ्याच लोकांनी सयंम दाखवून तुम्हाला मदतच केलेली दिसतीय तरीही तुम्ही सरसकट मायबोलीला नावे ठेवताय यावरुन तुमच्याच हेतूबद्दल शंका यायला लागलीय.

मायबोलीला वाईटच म्हणायचे असे ठरवूनच आलाय का?

टाईमपासचे जे धागे असतात, जसे शाहरुख वगैरे ...
>>>>
शाहरूख टाईमपास ...

@ धागा,
माहिती गूगलवर मिळते.
मायबोलीवर सल्ले मिळतात. काही आपुलकीचे काही खोचक. काही फायद्याचे काही मनोरंजनाचे...

मायबोली वर खरेच माहिती मिळते का? >>>> अजिबात नाही. सरळ माबोसंन्यास घेऊन दुसरा काही माहीती स्त्रोत मिळाला तर पहा. किंवा मग वाचनमात्र रहा आणि माहिती विचारूच नका
( मदत घेऊन attitude दाखवणं तरी बंद होइल)

मायबोली माहिती मिळण्याची साईट नाही. तस्मात इथे माहिती मिळालीच पाह्जे असं काही नाही.
तर तुम्हाला जर योग्य माहिती न मिळण्याचा कटु अनुभव आला असेल तर इथे माहितीपर प्रश्न न विचारता इतर आंतरजालावर विचारावे.
गूगलावे.

Submitted by सस्मित on 8 December, 2018 - 11:55

मी म्हणाले तेच पण संयमित शब्दात लिहिलं आहेस. हे मला जमायला हवं. पटकन फ्यूज उडतो माझा

माहिती: पुलंच्यां जन्मशताब्दीनिमित्ताने बूकगंगावर त्यांच्या पुस्तकांवर १५% सुट आहे

माहिती: पुलंच्यां जन्मशताब्दीनिमित्ताने बूकगंगावर त्यांच्या पुस्तकांवर १५% सुट आहे

Submitted by सस्मित on 8 December, 2018 - 13:30
>>>
धन्यवाद सस्मित ! काही पुस्तकं संग्रही नव्हती. एखादे होते पण कोणीतरी घेऊन परत न दिल्याने नव्हते ते पण घेतले!
लोकसत्ता चं अप्रकाशित पु. लं. पण दिसलं बुकगंगा वर

चिडकू>>> अरे वा! माहितीचा फायदा झाला म्हणजे.

माहिती: आयडियल बूक डेपो, दादर, पुस्तक प्रदर्शन आणि विक्री. पुस्तकांवर आकर्षक सुट आहे. (ही वाचीव माहिती आहे. आज किंवा उद्या मी स्वतः जाउन बघेन Happy

माबोवर माहिती मिळते, नक्कीच मिळते.
दारू कशी प्यावी, बार कसा उघडावा, कुत्रा घरी कसा सोडावा, ढेकूण कसे पळवले, विबास मधले कोत बो असे खूप उपयोगी धागे आहेत.