Bhangda ( panjabi) dance कोणत्या गाण्यांवर basavava?

Submitted by Mi Patil aahe. on 6 December, 2018 - 00:33

5/6 varshachya mulancha bhangda dance kontya bollywood ganyavar basavava v kasa?
इथे मी फक्त माहिती विचारली आहे.
माहिती देता आली तर द्या.मायबोली ला तुम्ही इतके कमी लेखता का, की अशा प्रकारच्या माहिती
मायबोलीवर,मायबोलीकर देऊ शकणार नाही, असे नाही ना!!! मग जमेल तशी माहिती द्या!
अर्थात ते प्रत्येकाला जमणार कसे? म्हणजे
(एखाद्याला सविस्तर माहिती देणं/मार्गदर्शन करणं वा मार्गदर्शक बनणे अन् कुणालाही भांगडा येणं किंवा शिकवणं-------)
अहो,हे सारे मलाही कळते आहे.पण आमच्या आदरणीय प्रिन्सिपॉल ला कुणी सांगावे? की मी डान्सर नाही व ज्यांना शिकवायच आहे ती मुलंही 'कळती' नाहीत.भांगडा चा भ जिथं मलाच कळतं नाही तिथं मी काय शिकवणार "भांगडा"?
तरीही यू ट्युब वर मी फिर फिर फिरले मायबोली जवळ थोडीशी टेकले,तोच मला कळले इथे माहिती मिळते--- साहजिकच मी मायबोली च्या पांथस्थाला विचारायचे ठरवले भांगडा चा भ कुणाला माहीत आहे काहो?????
माहिती असेल तर देता का कुणी त्याला ,"प्रिन्सिपॉल "चा पत्ता?
जेणेकरून मला ओव्हरलोड होणार नाही!!!!
तसे मी भांगड्याच गणित जुळवून ठेवले आहे.साय्रा गोष्टी एका माणसाला जमणे कठीण असू शकते.पण अशक्य नसतं.
भांगडा,गरबा,कथ्थक,कुचीपुडी, भरतनाट्यम,लावणी, वेस्टर्न डान्स,ब्रेकडान्स, तसेच लोकनृत्य ही भरपूर आहेत, कोळी नृत्य, कातकरी नृत्य, आदिवासी नृत्य असे किती किती प्रकार आहेत.६४ कलामधील नृत्य/नाच/डान्स ही कितवी कला असेल? ठाऊक नाही.पण ही कला प्रत्येकाला प्राप्त होईल वा झाली असेल असे काही सांगता येत नाही.
पण गाव,शहर,राज्य,देश, परंपरा, संस्कृतीनुसार ही नृत्यकला विकसित होत राहते,एवढे नक्की!
म्हणूनच नृत्याचा विशिष्ट प्रकार करणे आव्हानात्मक होउन जाते.मग गुरू ला शरण जाणे शहाणपणाचे ठरते.नाहीतर एकलव्याप्रमाणे ते कसब आत्मसात करावे लागते.
आता एकलव्य कुठे,अन् आपण कुठे!!!!?!!!
जिथे एकलव्यासारख्या शिष्याला गुरूने शिष्य म्हणून स्विकारले नाही लवकर; तिथे आपला काय पाड लागावा?
पण भांगडा कोणत्याही गाण्यांवर बसवता येईल का?की त्यासाठी पंजाबी गाणेच असले पाहिजे? हिंदी, मराठी गाणी चालणार नाहीत का? चालत असतील तर ती निवडक गाणी कोणती आहेत? कुणी सांगू शकेल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पण मुळात भांगडा कसा शिकवावा हे लोक ऑनलाइन लिहून कसं समजावणार? ☺️☺️☺️
म्हणजे मी इथे बसून 'हे बघा मुलांना सांगायचं की असे असे टुक टुक केल्यासारखे हात हलवत इंडेक्स फिंगर नाचवत तिरकं तिरकं पायात वाकत डावीकडे जायचं' तरी तुम्हाला इमाजीन होईल का?
युट्युब जास्त चांगले समजावू शकेल

YouTube बघा. बर्याच आयडिया मिळतील . इथे माबो वर प्रश्न विचारून काय अर्थ??
धन्यवाद

माफ करा ताई,
खिल्ली उडवण्याचा हेतू नव्हता.पण माझ्या आजूबाजूच्या प्री स्कुल शिक्षकांकडे अन्युअल डे साठी ज्या सुंदर आयडिया दर वर्षी असतात त्या बघून आपण खूपच बेसिक स्पून फिडिंग , तेही 2 वाक्यांचे नवे नवे धागे काढून मागता आहात असे काहीसे वाटले.
शिवाय प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनियर सगळ्या एज ग्रुप चे नाच तुमच्या एकट्या कडे देऊन ओव्हरलोड का केले आहे असेही वाटले.
चूक असल्यास माफी.

अवांतर : फार पूर्वी एक विनोद वाचला होता. सरदारजींच्या दोन्ही हातांची पहिली एकेक बोटे (अनामिका) कापली तर त्यांना भांगडा करताच येणार नाही. Lol

Ikde bangda (malvani) icharla asta tar jamun gela asta ekvel...dhigbhr recipes milalya astya pan Proud bhangda vachun nachayla shikne mhanje "pohave kase" he book vachun pohayla (/ki budayla Wink ) panyat udi marlyasarkhe zale
YouTube बघा. >>+११
सगळे प्रश्न एकाच धाग्यात विचारा ना!! >>+१११

मी अनु, अहो असल्या धाग्यांवर टाईमपास करायचा असतो. तुम्ही काय इतके मनापासून सल्ले वगैरे देताय!

बाय द वे, ते प्रतिसादात इतके चांगले मराठी लिहता येत असताना धागा का नीट मराठीत लिहला नाही बर?

अहो,हे सारे मलाही कळते आहे.पण आमच्या आदरणीय प्रिन्सिपॉल ला कुणी सांगावे? की मी डान्सर नाही व ज्यांना शिकवायच आहे ती मुलंही 'कळती' नाहीत.भांगडा चा भ जिथं मलाच कळतं नाही तिथं मी काय शिकवणार "भांगडा"?
तरीही यू ट्युब वर मी फिर फिर फिरले मायबोली जवळ थोडीशी टेकले,तोच मला कळले इथे माहिती मिळते--- साहजिकच मी मायबोली च्या पांथस्थाला विचारायचे ठरवले भांगडा चा भ कुणाला माहीत आहे काहो?????
माहिती असेल तर देता का कुणी त्याला ,"प्रिन्सिपॉल "चा पत्ता?
जेणेकरून मला ओव्हरलोड होणार नाही!!!!

ओके ओके
हो प्रि स्कुल च्या टीचर्स कडून त्यांना चांगला नाच यावा वगैरे अपेक्षा हल्ली केल्या जातात.आमच्या इथल्या प्रि स्कुल टीचर्स ची स्वतःची पूर्ण एक थीम बसवून नाच इव्हेंट असते.स्टेप ज्याला जश्या येतात त्याप्रमाणे त्याला/तिला जास्त किंवा कमी नाच वाली गाणी देतात.शिवाय मुलांचे नाच बसवणं, गोष्टीचे स्किट तयार करणं वगैरे कामं असतात.
भांगडा ला हल्ली ट्रेंड गाणं लंडन ठुमकदा, जुनं रंग दे बसंती, रेट्रो थीम असेल तर नया दौर चं गाणं.
थोड्या सोप्या भांगडा ऍक्शन मसाला भांगडा स्टेप बाय स्टेप युट्युब वर सर्च करा.भांगडा च्या बेसिक स्टेप लहान मुलांना जमतील.शिवाय अश्या कार्यक्रमा पूर्वी माईक वरून सूचना करतात की मुलं खूप लहान आहेत.त्यांच्या वयाचे असताना तुम्ही स्टेजवर उभे पण राहिला नसतात.ते नाचले, उभे राहिले, रडले, पळून गेले तरी त्यांना चिअर अप करा.चिडू नका.
जे मूल नाचत नाही त्याला टीचर स्वतः त्याच्या बरोबर नाचून संभाळून घेतात.
एकंदरच प्रचंड कठीण जॉब प्रोफाइल आहे.

पाटील, धीर सोडू नका. आज काल वर्क ओव्हरलोड ही फॅक्ट ऑफ लाइफ आहे व स्पर्धेत तरून पुढे जायचे असेल तर कोप करावे लागते.

भांगडा शिकवा यचा असेल तर रंग दे बसंती हे गाणे बसवा. देशभ क्ती पर तसेच फार कॅची आहे. मुले असेच नाचतील. भांगडाचा ड्रेस अस्तो मुला मुलींचा वेगळा लुंगी कुर्ता व मुलांना वर सरदारजीचे पागोटे. दाढी मिस्या. मुले गोड दिसतील. मुली पण दोन लांब वेण्या वगैरे.

स्टेप्स सा ठी नगाडा नगाडा हे जब वी मेट मधील गाणे बघा. व कल हो न हो मधील प्रिटी वुमन.

सोप्या स्टेप्स असतात. मला बर्यापैकी भांगडा येतो व मी खाली बेसमेंट मध्ये कुत्रा फिरवायला जाते तिथे कोणी नस्ते तेव्हा मी मस्त नाचून घेते.

दुस रे म्हणजे जस्ट डायल किंवा सुलेखा साइट वर डानस कोरीओ ग्राफर सर्च करा. तुमच्या भागातील व्यक्ती शोधून त्याला परिस्थिती सांगा
व एक तास दोन तासाचे इंटेन्स कोचिन्ग घ्या. म्हणजे मुलांना शिकव णे सोपे जाईल. मुलांचे कपडे सप्लायर कडे मिळतील.

सोपे आहे हो टेन्शन घेउ नका. ओय बल्ले बल्ले. ओय शावा शावा.

मी प्रत्येक वेळेला , बांगडा कसा तळायचा वाचतेय..>>> फिस्स्कन हसले. आजूबाजूचे बघायला लागले ना Lol

अमा Happy

खाली बेसमेंट मध्ये कुत्रा फिरवायला जाते तिथे कोणी नस्ते तेव्हा मी मस्त नाचून घेते. <<< कुत्र्याला भांगडा नक्की आला असेल.. Light 1

तरीही यू ट्युब वर मी फिर फिर फिरले >>> खर की काय ? मी भागरा डान्स फोर किड्स टाकल्यावर दोन अगदी सोपे व्हिडियो पहिल्या दोनातच दिसलेत
हे बघा!
https://www.youtube.com/watch?v=hQkitPHEdt0
https://www.youtube.com/watch?v=lth5zHpSmgA

तुम्हाला डान्स मधल काहीही येत नसेल तरी हे व्हिडियो दाखवुन करुन घेता येइल
बॉलिवुडच गाण हव असेल तर प्रिन्सिपलला गाणी सुचवायला सान्गा किवा सरळ पालकाना इमेल करा १-२ उत्साही आया सापडतिलच तुम्हाला बहुधा त्या आख्हा डान्सही देतिल कोरीओग्राफ करुन फक्त त्याच्या पोरास्नी पहिल्या रान्गेत वैगरे डोकेदुखी हेन्डल करावी लागेल.

धाग्याची टी आरपी वैगरे उद्देश असेल तर तुम्हाला इथल्या काही महान आयडिची शिकवणि लागेल बघा!

इथे मी फक्त माहिती विचारली आहे.
माहिती देता आली तर द्या. >>>>> Attitude, huh?

>> बघ की!!

मी अनु, अहो असल्या धाग्यांवर टाईमपास करायचा असतो. तुम्ही काय इतके मनापासून सल्ले वगैरे देताय!
>>> अगदी अगदी! अनू मनापासून सल्ले पण देतेय आणि वर सॉरी पण म्हणतेय हे बघुन मलाच कसं तरी होतंय.

भांगडा धागा काढुन कसा कळणार हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी गाणी मागितली आहेत असं नाही वाटत मला. वर पुन्हा सल्ले देता आले तर द्या हा अ‍ॅटिट्युड ? लोकं पण मनापासुन सल्ले बिल्ले देतायेत,

जरा थोडे कष्ट घेतले तर युट्य्ब वर लहान मुलांचे बसवलेले डान्स सापडतील... शोधता आलं तर शोधा!

हे सारे मलाही कळते आहे.पण आमच्या आदरणीय प्रिन्सिपॉल ला कुणी सांगावे?
>>>>
प्रिन्सिपल ला काय सांगायचं या वर धागा येणार का आता?

या बाईं इतक्या ओव्हरलोडेड असतील तर त्यांनी मुलांनाच विचारावे. तर ती जास्त चांगला सल्ला देतील असे वाटते, ती जास्त अपडेटेड असतात.

ती जास्त अपडेटेड असतात.>>> +१ Proud
रोल नं २१ ह्या कार्टुन सीरीज ,, बल्ले बल्ले शावा शावा हे गाण खुप मस्त आहे.लहान मुलांना ते दाखवा. क्रीस नाचतोय म्हटल्यावर ते पण उत्साहात शिकतील.तुम्हांला पण सोप जाईल.

ओये शावा शावा
>>>>>
+७८६
माहीया वे शावा शावा.. कभी खुशी कभी गम.. मुलांना फिलींग सुपर्राटार्स होईल Happy
अदरवाईज्ज पंजाबी गाणी बोअर असतात..

ओये शावा शावा
>>>>>
+७८६
माहीया वे शावा शावा.. कभी खुशी कभी गम.. मुलांना फिलींग सुपर्राटार्स होईल Happy
अदरवाईज्ज पंजाबी गाणी बोअर असतात..>>>>>>>
+८७६
रुप है तेरा सोणा सोणा
सोणी तेरी पायल
छन छना छन ऐसे छमके
करदे सबको घायल
कह रहा आखोका काजल
इश्क मे जीना मरना
शावा शावा माहिया वे
शावा शावा
य्या Happy

उडता पंजाबचे टाईटल ट्रॅक सुद्धा मस्तयं नाचायला.. थोडे हटके.. पंजाबची दुसरी बाजूही दाखवायला हवी ना लोकांना

छे छे! मुलांना असल्या गाण्यावर नाचवायचं नसतं.
त्यांच्या बालमनावर परीणाम होती.

मी पाटील आहे जी,
तुम्ही नेमके काय बदलले माहीत नाही पण हे बदलून आता पहिल्यापेक्षा जास्त छान वाटत आहे...
बदल केल्याबद्दल धन्यवाद.
आता तुमचे बदल केलेले सगळे लेख पुन्हा वाचतो.