विसावा

Submitted by Mi Patil aahe. on 29 November, 2018 - 05:58

तू येशील----
अन् तू आलास!!!!
असाच अचानक---
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
तुला पाहताच---
सारं बळ एकवटून मी कामाला लागले!!!!
तेव्हा तू कित्ती ओरडलास माझ्यावर----
कित्ती काळजी घेतोस ना माझी!
आठवड्यातून दोनदा पत्र---
अन् फोनतर वेगळाच!!!!!
कित्ती प्रेम भरलय तुझ्यात-----
अगदी बापावर गेलास!!!
पुत्र असावा तर तुझ्यासारखाच---
माझ्यासारख्या मातेला तेवढाच विसावा!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults