आखाड्याच्या मैदानात पहेलवानाला किमंत होती. दगडाला धोंडा म्हणा किंवा धोंड्याला दगड म्हणा. शेवटी आमचा पहेलवान म्हणजे सरतेशेवटी दगडच. धोंडया हे टोपण नांव. बिनामिशीचा पहेलवान..आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना.. तसा आमचा पहेलवान,पोटात एक अन ओठात एक होतं.त्याचे आचार भ्रष्ट होते. आज तो जिंकला असेल किंबहुना अंबारीत बसायचा योग आला असेल. त्याला अर्थ नव्हता.पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवला की काय.. लोक विचारात पडले होते. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले काय, तरी ते कडुच.
केलं उसनवार, सगळं मुसळ केरात.... अशोक भेके
साधारणत: पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट. त्यादिवशी दहीहंडी उत्सव होता. ठिकठिकाणी दहीहंडी बांधली असल्यामुळे घोडपदेवला गोविंदाची गर्दी दिसत होती. मी देखील या गर्दीतला एक भाग होतो. त्यावेळेला कोंबडी बाजा वाद्य होते. त्या वादयाच्या तालावर गोविंदा एका रांगेत नाचत नाचत पूढे जात होते. मागे बैलाच्या लाडीसावर सुंदर वेशभूषा धारण करून मुले राम-कृष्ण हंनुमान बनून शोभारथ त्या गोविंदाची शोभा वाढवीत होते. खूप आनंदी वातावरण असायचे. त्यादिवशी इकडे तिकडे फिरत असताना अमरज्योत मंडळाचा गोविंदा निघाला. बुवाचाळी पासून सुरू झालेल्या गोविंदाचा आनंद घेत मी देखील सामील झालो.
काल समाजसेवक श्री दिलीप वागस्कर यांचा वाढदिवस झाला. शेकडोने केक, शेकडो पूष्पगुच्छ हजारो माणसांची वर्दळ. सर्व क्षेत्र लोटले होते. कोणत्या पक्षाचा नेता, कार्यकर्ता नव्हता असे दिसले नाही. संस्था आल्या त्यांचे कार्यकर्ते होते. विभागातील सोसायटी प्रतिंनिधी यांची उपस्थिती होती. लहान होते आणि मोठे देखील होते. सारे पक्षभेद विसरून दिलीप वागस्कर यांच्या व्यक्तीगत स्ंनेहापोटी आवर्जून उपस्थिती दर्शवीत होते. या माणसाला ईश्वराने वरदान दिले आहे. जे आपल्याकडे आहे त्यातील काही भाग प्रेमाने त्यांच्यासाठी समर्पित करावा. काल ज्येष्ठ नागरिकांना घोंगडी तर शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
मराठा आहेत म्हणून सरकार आहे..... हा माझा लेख मायबोलीवर delete का करण्यात आला. उत्सुकता आहे. उत्तर जाणून घेण्याची.
नुकतीच महापालिका प्रभाग आरक्षण सोडत निघाली. जवळजवळ अर्ध्यापेक्षाही अधिक दिग्गज नैराश्याच्या गर्तेत गेले. काहीजण आपला मतदारसंघ शाबूत असल्याने सुखावले. यावेळी महिला महापालिका सभागृहात ५०% हून अधिक असणार, हे निश्चित झाले. त्या सर्वसाधारण जेथे पुरुषांना संधी आहे तेथे विद्यमान नगरसेविका म्हणून तिकीट स्वीकारणार आणि निवडून देखील येतील. त्यामुळे सभागृहात मात्र पुरूषांचे मताधिक्य घटणार आहे.
लोकसभा निवडणुक जशजशी समीप येत आहे तशतशी Digital Media वर तोबा गर्दी उसळली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या वाटेत काटे पसरण्याचे काम अत्यंत जोमाने बहुतेक मीडिया कर्मी करीत आहेत. गत लोकसभा निवडणुकीत काहीच मनस्ताप झाला नव्हता. पूलवामाची घटना अगदी ताजी होती. भारतीय जनता सैनिकांच्या मृत्यूमुळे हळहळत होती. सध्या मात्र श्री नरेंद्र मोदींच्या विरोधात जनमत जाऊ लागल्याचे बोलले जाऊ लागले आहे. कारण टोमॅटोचा महागाई स्तर इतका झपाट्याने वाढला की, विरोधकांच्या हातात कोलीत दिल्याचे भाजपला मान्यच करावे लागेल. महागाईने लोक त्रस्त झाल्याचे लक्षात येताच विरोधी पक्षातील छोटी बडी धेंड स्वस्थ बसतील का?
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.....