स्कॉटलंड

युकेला भेट - सल्ले द्या

Submitted by मामी on 5 May, 2016 - 04:11

जुनच्या शेवटी १० दिवसांसाठी इंग्लंड-स्कॉटलंड करत आहोत. २ फॅमिलीज आहेत - ऐकूण ७ जणं.
तर खालील विषया संदर्भात सल्ले हवे आहेत.
१. इथलं ड्रायव्हिंग लायसन्स तिथे चालतं ना? लंडनमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणार आहोत. पण लंडनहून स्कॉटलंडला जाताना कार हायर करून घेऊन जाण्याचा विचार आहे.
२. लंडनहून हायर केलेली कार पुढे ग्लासगो अथवा एडिंबरो ला सोडून देता येईल ना? कारण परत येताना वेळ वाचवण्यास ट्रेननं येण्याचा विचार आहे.
३. स्कॉटलंड कारनं करावं ना? आम्हाला जी ठिकाणं बघायचीयेत त्याकरता कार असल्यानं फ्लेक्सिबिलिटी राहील ती बरी पडेल असं वाटतंय.

स्कॉटिश खाद्यसंस्कृती

Submitted by सुमुक्ता on 16 February, 2015 - 03:36

प्रत्येक संस्कृतीचा अविभाज्य घटक म्हणजे तेथील खाद्यपदार्थ. विविध खाद्यपदार्थ खाऊन पहिल्याने प्रत्येक प्रांतांची संस्कृती कळत जाते. त्याचप्रमाणे तेथला इतिहास, तेथील हवामान आणि तेथील माणसेसुद्धा कळायला लागतात. स्कॉटलंडला राहायला आल्यानंतर माझी पहिली ओळख झाली ती म्हणजे हॅगिस ह्या पदार्थाशी. हा पदार्थ येथे खूपच लोकप्रिय आहे. मेंढीच्या लिवर, काळीज आणि फुफुसाचे मिन्स, कांदे, ओटमिल, मीठ, स्कॉटिश मसाले आणि मेंढीची चरबी एकत्र करून मेंढीच्या जठरामध्ये ठेवून मंद आचेवर साधारण तीन तास शिजवितात. आधुनिक पद्धतीमध्ये मेंढीच्या जठराऐवजी सॉसेजचे वेष्टण वापरले जाते.

विषय: 

स्कॉटलंडचा स्वातंत्र्यलढा आणि आम्ही

Submitted by सुमुक्ता on 14 January, 2015 - 05:45

१७०६ मध्ये स्कॉटलंड आणि इंग्लंड ने Treaty of Union वर शिक्कामोर्तब केले आणि United Kingdom चा जन्म झाला. पण तरीही स्कॉटलंड वर स्कॉटिश लोकांचे राज्य असावे असे अनेक देशप्रेमींना वाटत होते. अखेर १९९८ मध्ये स्कॉटलंडला स्वतंत्र संसद असावी ह्या ठरावास मंजुरी देण्यात आली आणि देशपातळीवरचे काही निर्णय वगळता स्थानिक कायदा बनवायचे स्वातंत्र्य स्कॉटलंडला मिळाले. स्कॉटलंडला UK पासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्कॉटिश नॅशनल पार्टीने सार्वमत घेण्याचे आश्वासन दिले. परिणामत: २००७ आणि २०१११ च्या निवडणूकांमध्ये त्यांना यश मिळून ते सत्तेवर आले.

Subscribe to RSS - स्कॉटलंड