खरेसाहेब माफ़ करा : ३ : जरा चुकीचे ….

Submitted by विशाल कुलकर्णी on 6 January, 2010 - 22:56

जरा चवीचे.., जरासे बेचव…
जरा चवीचे.., जरासे बेचव, खाऊ काही,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
आला नाही ढेकर तोवर खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
पाठ फिरू दे त्यांची नंतर, ओरपू तर्री..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
पर्याय नकोशा बर्गरवर चल शोधू काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून
चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून
रबडी आहे ‘वड्या’च्या नंतर, खाऊ काही…
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

लिंबू असू दे हातामध्ये, रेचक म्हणूनी
लिंबू असू दे हातामध्ये, रेचक म्हणूनी
भूक हावरी, तब्येत खडतर, खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही …….

नव-ईडंबनकार ईरसाल ‘खोटे’

गुलमोहर: 

I eat to live ( unlike few who live to eat)..... त्यामुळे यात फार गम्य अन गती नाही.........

पण विशाल तुम्ही एकदम फारमात हां.......... राज क्या है भाई????!!!!

एकदम मस्त...आवडल..

रिकाम्या पोटी आयुष्यावर काय बोलता रे ? गणेश कला क्रिडा मधे "त्या" शो च्या वेळी कार्यकमापेक्षा तिथला वडापाववाल्याचा धंदा जास्त का होतो ते या कवितेने ध्यानात आले..

विशाल खोटे

>>>
चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून
चयापचयाची कशा काळजी, हाण तू दाबून
रबडी आहे ‘वड्या’च्या नंतर, खाऊ काही…
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!

लै भारी

विशल्या, ये की दिल्लीत या शनिवारी रविवारी Wink

भेटू रे खरच आणी सुसाट खात सुटू. बिलका नही ये दिल का मामला है.. Happy

विशल्या, ये की दिल्लीत >>> येतोय मी, पण १८ तारखेला. थांबणार का तोवर? Wink

बाकी दोस्तमंडळी ठांकू बर्का ! Happy

विश्ल्या का बाबा त्या संदिप खरेच्या जीवावर उठला आहेस? Lol
तु काय अख्ख्या अल्बमचं विडंबन करायचं ठरवलंयस का?
मस्त जमलेय भट्टी पण... Happy

अम्या आणि विशल्या,
खादाडीची काही योजना असेल आणि मला वगळलेत तर परिणाम ठीक होणार नाहीत. Proud
कसली विडंबनं करतोस रे. वाचून तोंड खवळतं ना.

चला लोकहो विशालसंगे खाऊ काही Wink

सगळ्यांचे मनापासुन आभार !

कवे, माझ्याकडे संदीपचे ’नेणीवेची अक्षरे’ आणि ’मौनाची भाषांतरे’ हे दोन काव्यसंग्रह आहेत. (विकत घेतले आहेत मी Wink )

योग्या, मग कधी बोलवतो आहेस आम्हाला तुझ्या घरी जेवायला ? Proud

उम्या , लैच खाव खाव सुटली आहे. पण आमची खाव खाव आणि तुम्हा सरकारी नौकरांची खाव वेगळी असते बरं का? Wink धन्स रे !