Submitted by के बालचंद्र on 5 January, 2010 - 21:55
हव्या कशाला मग सलवारी ?
भरजरी शालू जुनाट झाले
फेकुनी द्या त्या नववारी
कम्फ़रटिबल त्या मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ?
नको रुढी, रिवाज नको ते
परंपरागत तर नकोच बाई
ढिगभर कपडे वापरल्याने
वाढत गेली महागाई
कराल जर का माझा अनुनय
स्वस्ताई येईल घरोघरी ....!
टकमक बघुद्या बघणार्यांना
आपल्या बापाचे काय जाते ?
नेत्रसुख घेवुद्या घेणार्यांना
सुखवू द्या मस्त नयनपाते
टीका करती जुनाट जन ते
तिसाव्या शतकाची मी नारी ...!
स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलो नसतो नेसून कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
होऊ द्या आता घरोघरी ...!
गुलमोहर:
शेअर करा
.
(No subject)
हाण तिच्या मारी.... येवुद्या
हाण तिच्या मारी.... येवुद्या अजून
. .
लै भारी! विशाल, रसग्रहण
लै भारी!
विशाल, रसग्रहण पाहिजे.
शरद
(No subject)
तलवार झाली, सलवार झाली, आता
तलवार झाली, सलवार झाली, आता सलवारी....
एक गोष्ट मात्र खूप आवडली... तुमचे अक्षर खूप सुंदर आहे !!
कविता आवडली हे वेगळे सांगायला
कविता आवडली हे वेगळे सांगायला पाहीजे का ?
माणूस आदिकाळा कडे परत चालला
माणूस आदिकाळा कडे परत चालला आहे तेच खरं.

पुढे काही वर्षांनी ती सुद्धा अडचण वाटायला लागेल.
मग लोकं म्हणतील ...
++++++++++
ठेविले अनंते तैसेचि रहावे ...
(No subject)
<< माणूस आदिकाळा कडे परत
<< माणूस आदिकाळा कडे परत चालला आहे तेच खरं. >>
सहमत.
अरे काय चाललयं काय ? का
अरे काय चाललयं काय ? का सगळेजण हात धुवुन सलवारीच्या मागे लागलेत
जर का असती देवाची
जर का असती देवाची इच्छा
जन्मलोच नसतो नेसुन कपडे ?
>> हा हा हा...
का सगळेजण हात धुवुन
का सगळेजण हात धुवुन सलवारीच्या मागे लागलेत >>>
============================
सलवारीचं तलवारीशी यमक जुळतंय ना ...
आणि त्यावर बघणार्यांच्या भुवया उंचावतात लगेच ...
प्रतिसाद दात्या समस्त
प्रतिसाद दात्या समस्त भाऊबहिंनींचे जिवाभावातुन आभार..
असाच लोभ असु द्यावा..
अजुन एक आचरट विडंबन !
अजुन एक आचरट विडंबन !
अहो वाकडी_तिरकी, एकदा पाऊलवाट
अहो वाकडी_तिरकी,
एकदा पाऊलवाट पडली की बाकींच्यांना सोईचे पडते त्याच रस्त्याने जायला.
मग रस्ता रमता रमता आमरस्ता बनुन जातो....
वाकडी_तिरकी खरं तर तुमचा आयडी
वाकडी_तिरकी
खरं तर तुमचा आयडी पूर्ण न वाचता मी म्हणणार होतो की आला अजून एक डी गॅन्गचा आयडी.
आचरटपणाच म्हणाल तर होय आम्ही आचरट आहोत आणि प्राणपणाने आचरटपणा करत राहू.....
(No subject)
<<भरजरी शालू जुनाट
<<भरजरी शालू जुनाट झाल्या
फेकुन द्या त्या नववारी
कंफरटेबल असता मस्त बिकिन्या
हव्या कशाला मग सलवारी ? >>>
ओ हो हो... नव्या युगाची, नव्या मनुची कविता. जुन्या रुढींना सोडचिठ्ठी देवून नव्या सुधारणा स्विकारण्याचं नम्र आवाहन करणारी आचार आणि विचार स्वातंत्र्याचं बाळकडू पाजणारी उत्तूंग (?) कविता.
<<नको रुढी नको रिवाज ते
परंपरागत नकोच बाई
ढिगभर कपडे वापरल्यानेच
वाढत गेली महागाई
कराल माझा अनुनय तर
स्वस्ताई येईल घरोघरी.>>>
सत्ताधारी पक्षाने बोध घ्यायला काहीच हरकत नाही. सार्या जगासमोर भेडसावत असलेल्या महागाईच्या राक्षसाला पराभूत करण्याचा यापेक्षा साधा, सोपा आणि महत्त्वाचे म्हणजे स्वस्त उपाय आणखी कुठला असु शकेल. कविने आपल्या समाजाभिमुख मनाचा जिवंत पुरावाच जणू दिला आहे या कवितेच्या माध्यमातून. किती स्वच्छ विचार... परंपरागत पैठणीवर १५-२० हजार खर्च करण्यापेक्षा तेवढ्या रुपयात किती बिकीन्या घेता येतील. पुरूषवर्गासाठी लंगोट हा चांगला पर्याय ठरावा.
<<टकमक बघुद्या बघणार्यांना
आपल्या बापाचे काय जाती?
नेत्रसुख घेवुद्या घेणार्यांना
सुखवु द्या नयनपाती
टिका करती जुनाट जन ते
मी तिसाव्या शतकाची नारी.>>>
अहाहा काय ते तेज, काय ती विचारधारा ! स्वतंत्र अस्मिता वगैरे म्हणतात ती हीच असावी. आजच्या नारीचे बंडखोर, तेजस्वी रुप आणि करारी बाणा किती योग्य शब्दात व्यक्त केला आहे कविने. कवीच्या अफ़ाट प्रतिभेला माझे कोटी कोटी प्रणाम. पण हे करत असताना कवी आपला उदारमतवादीपणाही सोडत नाहीये.... ज्याला जे हवेय ते बिमधास्त घेवू द्या (नयनसुख) व्वा... धन्य , साधू...साधू ! आणि वर पुन्हा ठणाकावून सांगण्याचा करारीपणादेखील.... मी नव्या युगातील आहे.... तुमच्या पुराणातील वांगी... (बटाटे, कांदे, दोडके... प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे वाचावे) पुराणातच राहू दे..... कवीकडे आहे.
<<स्तोम कशाला या कपड्यांचे
म्हणोत काही मेले बापडे
जर का असती देवाची इच्छा
जन्मलोच नसतो नेसुन कपडे ?
स्वस्त बिकिनी मस्त बिकिनी
हीच वेशभुषा गुणकारी..>>>
आपल्या विचारांना प्रत्यक्ष विधात्याचा पाठिंबा असल्याचेही कविने इथे सिद्ध केले आहे.
कविवर्य, कुठे होतात आपण? आपली ही कविता आणि त्याद्वारे चालवलेले हे विधायक कार्य पाहून समस्त मायबोलीकर उपकृत झाले आहेत. दंडवत देवा. अशाच उच्च कविता प्रसवत राहा हिच प्रार्थना !
कविता नाही पण विशाल
कविता नाही पण विशाल कुळकर्णींचे रसग्रहण फारच आवडले.

.........................
आणि हो माझे शिर्षक पळवले.काही दक्षिणा-बिक्षिणा ?
पैठणी, लुगड्यावरून आता
पैठणी, लुगड्यावरून आता बिकीनीवर आलात..
तीसाव्या शतकातल्या आधुनिक नारीसाठी काहीतरी शिल्लक ठेवणार ना?
प्रतिसाद दात्या समस्त
प्रतिसाद दात्या समस्त भाऊबहिंनींचे जिवाभावातुन आभार..
असाच लोभ असु द्यावा.
वा! अत्यंत समर्पक
वा!
अत्यंत समर्पक रसग्रहणाबद्दल विशाल कुलकर्णी यांचे आभार!!
शरद
विशल्या सुटलायस खरा !
विशल्या सुटलायस खरा ! सलवारीला आणखी पर्याय शोधले नाहीत म्हणजे मिळवलं.
हातोडा, चाबूक... दे दणादण..
हातोडा, चाबूक... दे दणादण..


आवडत्या १० त...
प्रतिसाद दात्या समस्त
प्रतिसाद दात्या समस्त भाऊबहिंनींचे जिवाभावातुन आभार..
असाच लोभ असु द्यावा.
दक्षिणा,आभारी आहे.
विशाल ती म्हण खरी करुन
विशाल ती म्हण खरी करुन दाखवलीस " प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे" इथे " प्रयत्ने कविता रगडीता रसही गळे "
(No subject)
(No subject)
Pages