Submitted by सूर्यकांत डोळसे on 7 January, 2010 - 23:37
आज वाटेतच रंग उधळतो टपोरी
आज वाटेतच रंग उधळतो टपोरी
बालिके, जरा जपून जा कॉलेजवरी
तो छचोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल चिठ्ठी फे्कतो
मस्ताऊन, माजून जाळे टाकतो
सांगतो अजूनही तुला खरोखरी
सांग कामांधास काय जाहले
त्यांनी छेडल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग ढंग संग लागली
एकटीच वाचशील काय तू पोरी?
त्या तिथे असंग संग त्यात गुंगला
ट्पोर-ट्पोर्यासवे बेधूंद दंगला
तो पहा ढोल इज्जतीचा वाजला
हाय माजले फिरुन तेच टपोरी.
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख, फक्त लयमात्रांचे भान
सुरेख, फक्त लयमात्रांचे भान राखावे लागेल. नाहीतर चाल चुकते... गाण्याची बर का !
सुर्यकांतसाहेब, तुम्हास येथे पाहून आनंद झाला. आपल्या दैनिक पुण्यनगरीतील वात्रटिका न चुकता वाचतो मी. माबोवर आपले स्वागत आहे.
ग्रेट ... आवडलं
ग्रेट ... आवडलं
शुभेच्छा
देवनिनाद
कौतुकाला पात्र आणि कौतूकला
कौतुकाला पात्र आणि कौतूकला अनुमोदन