केशवा का रे या (विडंबन)

Submitted by जागोमोहनप्यारे on 4 January, 2010 - 03:24

केशवा का रे या तुझ्या डोक्यात इतक्या उवा
तुझ्या डोक्यात इतक्या उवा..

तुझ्यासारखा तूच घाण्या
रोज टाळिशी का रे न्हाण्या
वेळोवेळी मस्तकातुनी
घाल की रे कंगवा...

वेडा होऊन निद्रानाशी
ब्लेड नि कात्री घेऊन खाशी
डोक्यावरच्या जटा कापिशी
पडे उवांचा थवा.......

शुभ्र पांढर्‍या लिखांसाठी
शाम्पू घे रे भरूनी वाटी
खसखस खसखस डो़के चोळण्या
साबण पण रे हवा...

गुलमोहर: 

होय.. मीटर बर्‍याच ठिकाणी चुकले आहे.. Sad

घाल की रे कंगवा... याच्याऐवजी घाल रे कंगवा... असे हवे.. एकदा करेन सगळे दुरुस्त

जामोप्या,
हे बघ मी दुरुस्त करून दिलंय.
आता उगाच डोके खाजवत बसायला नको Proud

केशवा, माधवा,
तुझ्या डोक्यात किती रे उवा!

तुझ्यासारखा तूच घाण
उगा टाळिसी का रे न्हाण?
वेळोवेळी डोक्यावरुनी
फिरव की कंगवा

वेळ काढुनी एकदाच
सलूनमध्ये थेट जाच
केसांना त्या कैची लागता
पडे उवांचा थवा

लिखांप्रमाणे कोंड्यासाठी
शाम्पू लाव रे भरून वाटी
केस पांढरे तेही बघ रे
उपाय जालीम हवा

मस्त... विडंबन पार भादरूनच टाकलंत की!!
Proud Lol
............................................................
कशाला भादरलं, डोक्याला की कवितेला ? Lol