मराठी गझल

फक्तटिका-कारांचे आयुष्य

Submitted by वैवकु on 23 December, 2011 - 04:36

----------------------------
ज्ञानदेवा ...........
इथे काही लोक चांगल्या काव्यावर फक्त टिकाच करतात अशा फक्त-टिका करणाऱ्या फक्तटिका कारांच्या आयुष्यावर ही टीका आहे .
टिका आणि टीका यातला तुम्ही दाखवून दिलेला फरक एव्हाना त्यांच्या लक्षात आला असेल यात शंकाच नाही
------------------------------

करावी टिका हेच आयुष्य त्यांचे !
स्वतःला विका हेच आयुष्य त्यांचे !

स्वतः थुंकती चुम्बुनी घेत आणी ;
स्वतःचा थुका हेच आयुष्य त्यांचे !

भुके श्वान पत्रावळी उष्टती की ....
भिकेच्या भुका हेच आयुष्य त्यांचे ?

सुखी वेद ज्याच्या मुखी तोच रेडा ,

गुलमोहर: 

कोण हरिहरी करते?

Submitted by ह.बा. on 22 December, 2011 - 04:57

कोण हरिहरी करते?

जगण्याच्या जखमेत असे का मरण वेदना भरते?
अवघडलेले वादळ आता मंद मंद वावरते...

पारंबी सुकल्यावर तेथे कोण झोकतो जगणे?
ती वार्‍याचा करुनी झोका एकटीच थरथरते

तीच मिठी अन हे ते सगळे रोजचेच ते त्याला
ती ही पहिल्या भेटीइतकी ते तसेच बावरते

लागेना डोळ्याला डोळा शांत होइना तगमग
चाहुल येते शांतीची अन रात्र नेमकी सरते

दिंडी आहे तोवर, आहे भाव तोवरी नाचू
मटणाच्या ताटावर सांगा कोण हरिहरी करते?

- हबा

गुलमोहर: 

ध्येयवेडा पोरगा.....तरही गझल

Submitted by वैवकु on 20 December, 2011 - 04:05

==========================================
आदरणीय ढवळे सरांची , त्यांच्या ध्येयवेडा पोरगा ...... चि माफी मागून....
गझलेचा हा प्रकार प्रथमच हाताळतोय चुकल्यास सगळ्यांनी माफ करा.

आयुष्यात प्रथमच नितांत आवडलेला शेर दिल्याबद्दल ढवळे सरांचा ऋणी राहीन
गझलेच्या मतल्याबाब्तीत चक्क उचलेगिरी केलीय ती त्यामुळेच ..हे जाणकरांस वेगळे सांगणे न लगे !!!!
खपवून घ्यावे ही विनंती.....
==========================================
ध्येयवेडा पोरगा तो कोण होता ...?
थेट माझ्या सारखा तो कोण होता ...?

तू दिलेल्या यातना सुख लेखणारा
वेदनांना पारखा तो कोण होता... !!...??

गुलमोहर: 

स्वप्नी तुझिया दिसेन मी ( मतलाबंद ग़ज़ल )

Submitted by निशिकांत on 18 December, 2011 - 23:50

दार किलकिले ठेव सख्या तू डोकाउन तुज बघेन मी
झोप असूदे तुला लागली स्वप्नी तुझिया दिसेन मी

मनातले ते व्यक्त कराया तुझी राधिका बुजेन मी
लाज वाटते हाक मारण्या मंदमंद दरवळेन मी

आनंदीआनंद बरसता कोरडी कशी उरेन मी?
श्रावणातल्या सरीप्रमाणे तुला चिंबवून भिजेन मी

आठवणीचा दाह कितीही मला छळूदे, हसेन मी
झुळूक होउन तुझ्याभोवती थंड गारवा असेन मी

खाचा खळगे जीवन मार्गी मनात भिती पडेन मी
हात मला दे घट्ट धराया क्षितिजावरती फिरेन मी

चर्चा करण्या दोष कुणाचा, आसपासही नसेन मी
असेल चुकले माझे समजुन माझ्यावरती रुसेन मी

तुझीच बाजी सदा असूदे खुशीखुशीने पिसेन मी

गुलमोहर: 

ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का?

Submitted by आशिष वाटसरू on 18 December, 2011 - 11:16

ओलीताचं अंकुर कोरडवाहूत फुलेल का,
जाशील जरी कुठे,
तुझ्यात तुझं काही उरेल का.
भास जरी जगण्याचा कुशीत नवऱ्याच्या तुझ्या,
कर सारे प्रयत्न,
पण तुझ्यातला मी कधी मरेल का.

थंडीचे ते दिवस तुला नक्कीच ताप आणतील,
वाचव तू स्वतःला,
आठवणींचे वार तुझा नक्कीच घात करतील
खुशाल टाक पाऊल तुझ्या नव्या संसारात,
पण सांभाळून जरा,
पैंजणाचे आवाज माझं गाणं गातील.

गंध मोगऱ्याचा माझ्या आलिंगनात,
दरवळेल तोच सुगंध,
त्यानी आणलेल्या गजऱ्यात.
गुलाबाचा हट्ट कर मोगऱ्याला म्हण नाही,
पण लक्षात असू दे,
टवटवीत गुलाबाचा गंध कधीच दाटत नाही.

भातुकलीच्या खेळात तुझ्या मीच खरा राजा,
मात्र तुझ्या खऱ्या संसारात,

गुलमोहर: 

काळ कडवा होत गेला*

Submitted by जयन्ता५२ on 17 December, 2011 - 09:32

काळ कडवा होत गेला
शब्द हळवा होत गेला

कालचा तो धृवतारा
आज चकवा होत गेला

रांग वाढे मंदिरी अन्
काळ बडवा होत गेला

हात दोन्ही सारखे पण
एक उजवा होत गेला

अंगठया, दोरे, विभूती
संत फसवा होत गेला

बोल त्याचे,मौन त्याचे
एक फतवा होत गेला

---------------------------------जयन्ता५२
* आधी इतरत्र प्रकाशित

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हळू वाद घाला

Submitted by निशिकांत on 17 December, 2011 - 02:19

हळू वाद घाला

फुलांनो हवेशी हळू वाद घाला
हवा पोंचवी गंध तुमचा जगाला

जरी फूल निर्माल्य होते तरी का
कळ्या हट्ट करतात उमलावयाला

कशाला भुलावे वृथा मृगजळाला?
करू यत्न मिळवावया शाश्वताला

जरा दु:ख लपवायलाही शिकावे
जगा हास्य देऊन फुलवावयाला

नको आज ओठी तुझे गोड गाणे
उद्या तेच लागेल काचावयाला

नव्याने जगू या करू श्रीगणेशा
जुने घाव आघात विसरावयाला

जुन्या प्रेमपत्रास वाचून भिजलो
कढीला शिळ्या का अता ऊत आला

मला जीवनाची नशा एवढी की
यमाला सुचवले उद्या यावयाला

खरे प्रेम "निशिकांत" त्यागात असते
नसे ते तराजूत तोलावयाला

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

गुलमोहर: 

माफी

Submitted by वैवकु on 16 December, 2011 - 05:51

==============================================
मायबोलीवरील समस्त गझलकारांची आणि त्यांच्या अप्रतीम गझलांची माफी मागून ........
ही रचना गझल नाही असे आढळल्यास; आपणास या रचनेचा ( आमचा नव्हे... ) विसर पडावा हीच विठ्ठल चरणी प्रार्थना........................
==============================================

फक्त पश्चाताप की ठरता न काफी
मीच आता मागतो माझीच माफी

मांडतो बाजार मी फुटक्या मण्यांचा
हो तुम्हा लखलाभ ती तुमची सराफी

डोलता मौजेत माझा तो शिकारा
होडक्या म्हणती खुळ्या "ही तर तराफी*..!"

अष्टलांचा** शौक माझ्या विठ्ठलाला
रंडका शिणगार माझा सोनचाफी

गुलमोहर: 

उद्याच्य़ा दिशेने किती पाहिले मी

Submitted by उमेश वैद्य on 14 December, 2011 - 04:52

उद्याच्य़ा दिशेने किती पाहिले मी
तसे आजही शोधितच राहिले मी

अशी राहिलेली कशी काय बाकी
तरी कालचे कालची साहिले मी

नव्हताच कंठातला सूर माझ्या
तरीही तराणे तुझे गाइले मी

म्हणालास तू देव नाहीच आहे
पुजूनी तयाला तरी तारिले मी

मिळालेच नाही कधी खावयाला
कितीदा तरी दात हे कोरिले मी

मला जाहले आज माझेच ओझे
तरीही जरासे तुझे वाहिले मी

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 

मी माझ्याशी झगडत असतो

Submitted by निशिकांत on 13 December, 2011 - 10:26

बनून वादी अन् प्रतिवादी मी माझ्याशी झगडत असतो
मनावेगळे घडता क्रोधे मी माझ्यावर बरसत असतो

पहिले वहिले प्रेम भंगले वैषम्याला दिला न थारा
नभी पाहुनी शुक्रतारका मनास माझ्या रिझवत असतो

घाव दिले हे कुणी मला मी नोंद तयांची कधी न केली
काळासंगे चालत चालत जखमांना मी बुजवत असतो

जीवन झाले माती आता, करून ओले त्या मातीला
मडके पक्के करावया मी गोरा(*) होउन तुडवत असतो

धोपट मार्गी पुरे जाहले जगणे आता फिकेफिकेसे
बंड करूनी तिरप्या मार्गी कधी तरी मी नकळत असतो

खूप ऐकल्या गानमैफिली रागरागिनी, ठुमर्‍या, टप्पे
मना आवडे फ्यूजन आता ताल धरूनी थिरकत असतो

आज जगी अंधार एवढा दीपस्तंभही कुणीच नाही

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल