Submitted by उमेश वैद्य on 14 December, 2011 - 04:52
उद्याच्य़ा दिशेने किती पाहिले मी
तसे आजही शोधितच राहिले मी
अशी राहिलेली कशी काय बाकी
तरी कालचे कालची साहिले मी
नव्हताच कंठातला सूर माझ्या
तरीही तराणे तुझे गाइले मी
म्हणालास तू देव नाहीच आहे
पुजूनी तयाला तरी तारिले मी
मिळालेच नाही कधी खावयाला
कितीदा तरी दात हे कोरिले मी
मला जाहले आज माझेच ओझे
तरीही जरासे तुझे वाहिले मी
उमेश वैद्य २०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा