स्वप्नी तुझिया दिसेन मी ( मतलाबंद ग़ज़ल )

Submitted by निशिकांत on 18 December, 2011 - 23:50

दार किलकिले ठेव सख्या तू डोकाउन तुज बघेन मी
झोप असूदे तुला लागली स्वप्नी तुझिया दिसेन मी

मनातले ते व्यक्त कराया तुझी राधिका बुजेन मी
लाज वाटते हाक मारण्या मंदमंद दरवळेन मी

आनंदीआनंद बरसता कोरडी कशी उरेन मी?
श्रावणातल्या सरीप्रमाणे तुला चिंबवून भिजेन मी

आठवणीचा दाह कितीही मला छळूदे, हसेन मी
झुळूक होउन तुझ्याभोवती थंड गारवा असेन मी

खाचा खळगे जीवन मार्गी मनात भिती पडेन मी
हात मला दे घट्ट धराया क्षितिजावरती फिरेन मी

चर्चा करण्या दोष कुणाचा, आसपासही नसेन मी
असेल चुकले माझे समजुन माझ्यावरती रुसेन मी

तुझीच बाजी सदा असूदे खुशीखुशीने पिसेन मी
डाव खेळता तुझीच राणी हुकुमी पत्ता बनेन मी

प्रसंग येता जगास सार्‍या पुरून बाकी उरेन मी
ध्येय असूदे ऊंच तुजसवे हिमालयावर चढेन मी

किती लळा "निशिकांत" लावला! प्रेमसागरी बुडेन मी
जन्मोजन्मी खरेच तुझिया ग़ज़लांमधुनी झरेन मी

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३

गुलमोहर: 

क्या बात है सरजी..... फारच सुंदर, अप्रतिम, सुर्रेख, मस्त, अलवार....
वाचतच रहावी अशी लयदार, सुघड रचना.....

Did not like much

श्रावणातल्या सरीप्रमाणे तुला चिंबवून भिजेन मी>>>

chimbavun madhil 'vu' rhasva havaa naa ? Happy

आवडली! मस्त लय आहे!

'चिंबवुन' करा फक्त, तेवढा एकच दोष दिसतो आहे. आणि बाकी मात्रांच्या घड्या व्यवस्थित बसल्याने तो विशेष जाणवतो आहे. Happy

चिकणी चमेली,
गजलेच्या पहिल्या शेराच्या दोन्ही ओळीत काफिया (अंत्य यमक) आणी रदीफ असते, या शेरास मतला म्हणतात. बाकीच्या शेरात फक्त दुसर्‍या ओळीत काफिया आणी रदीफ असतात. गजलेत सर्वच शेर कफियाच्या प्रकारातले असतील तर त्या गजलेस मतला बंद गजल न्हणतात.