मराठी गझल

धुके

Submitted by चिन्नु on 22 August, 2008 - 16:43

धुके विरून गेले
बघे निघून गेले

उफाळला किनारा
चरे निवून गेले

प्रवाद चाललाहे
ऋणी लुटून गेले

उसासला फुलोरा
झरे भिजून गेले

नको नव्यास हाका
जुने निजून गेले

कडाडले इथे जे
तिथे थिजून गेले

ट ला ट पाहता ही
कुणी खिजून गेले Wink

गुलमोहर: 

खाक

Submitted by दाद on 21 August, 2008 - 00:55

माझिया हास्यात थोडी वेदनेची झाक आहे
बंद ओठांमागुती व्याकूळलेली हाक आहे

ओठ कुंपण, ओठ बागा, श्वासही गंधाळलेले
टाळण्याची ना मुभा, हा भोगण्याचा धाक आहे

भेटण्या येशील का तू चांदण्याच्या पावलांनी

गुलमोहर: 

मिठाई

Submitted by pulasti on 19 August, 2008 - 23:13

विचार आला पुन्हा जुना तो, जुनी धिटाई तशीच आहे
"बघा झटकले!" अशी आमची जुनी बढाई तशीच आहे!

जरी पुढारी हसून सांगे - "जवळजवळ संपलीच समजा! "
घरात दारात पोचलेली सुरू लढाई तशीच आहे

अजून झुकतात मेघ काही, अजून झरतात थेंब थोडे

गुलमोहर: 

तेच का रे?

Submitted by दाद on 19 August, 2008 - 00:02

बोलतोसच तेच का रे
लागणारे ठेच, का रे?

गुंतल्यावाचून झाली
उत्तरेही पेच का रे?

वादळाला सावराया
हात हे लटकेच का रे?

विखरुनी गेले कधी जर
वेचशिल हलकेच का रे?

टाळले स्वप्नातही जे
(टाळले दु:स्वप्न मी जे)
भेट आले तेच का रे?

गुलमोहर: 

पडसाद

Submitted by pulasti on 8 August, 2008 - 17:00

सूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहे
तोकडा व्यासंग माझा; आसवांची दाद आहे

मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे

एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "ह्या -

गुलमोहर: 

उरेल गुंता भरजरी

Submitted by सत्यजित on 6 August, 2008 - 06:05

बरच दिवस गझल लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे पण, व्यकरण जमत नाही आहे. एक प्रयत्न येथे मांडतो आहे, जाणाकारानी मार्गदर्शन करावे ही विनंती.

पाहिले असे तुला अन भासली कोजागिरी
मिटल्या नयनात जागुनी रात केली साजरी

गुलमोहर: 

जगणे

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 August, 2008 - 07:17

जगणे नव्हे आभास
मरणाचा रोज भास
सुख थांबेना मुठीत
करतो तरी प्रयास
धाय मोकले विवेक
इमान जेव्हा पणास
उठे पंगती सदैव
बळे बळे कुणा उपास
डोळ्यात रात जागी
गहीवरे छत उदास
उतु जाई तम घरात्
लखलख जगी आरास
लिही कुणी ना पानी

गुलमोहर: 

पाठलाग

Submitted by सुमेधा आदवडे on 31 July, 2008 - 02:59

पदराचा शेव ओला करत राहीले
आठवांची ओंजळ मी भरत राहीले

पेरलेस तू जे अंधाराचे दाणे
पीक त्याचेच जन्मभर बहरत राहीले

निद्रेला पारखे झाले डोळ्यांचे पाखरु
रात्रभर छताला टोचा मारत राहीले

मी कशी म्हणु आता होईल रे पहाट

गुलमोहर: 

आम्ही

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 July, 2008 - 01:09

हे रोजचेच गाणे
तरि ही आम्ही दिवाणे

ढकलुनी प्रश्न दुज्यावर
कुटतो आम्ही उखाणे

आव सदा जिंकल्याचा
असो जरी आम्ही उताणे

यश बैसले कुंपणावर
शोधितो आम्ही बहाणे

ती वाकडी वाट त्यांची
फक्त आम्ही शहाणे

बहिष्कारुनी गेले गाव

गुलमोहर: 

क्षण

Submitted by अलका_काटदरे on 23 July, 2008 - 11:46

क्षण टिपायचा, क्षण झेलायचा
क्षण लुटण्याचा, क्षण स्मरायचा
क्षण वेचायचा--
तुझ्या न माझ्या सहवासाचा

क्षण धुन्दीचा, क्षण भाग्याचा
क्षण सॉख्याचा, क्षण परीक्षेचा
क्षण परिक्षणेचा--
तुझ्या न माझ्या ऑक्षणाचा

क्षण अविस्मरणीय...

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल