उरेल गुंता भरजरी

Submitted by सत्यजित on 6 August, 2008 - 06:05

बरच दिवस गझल लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे पण, व्यकरण जमत नाही आहे. एक प्रयत्न येथे मांडतो आहे, जाणाकारानी मार्गदर्शन करावे ही विनंती.

पाहिले असे तुला अन भासली कोजागिरी
मिटल्या नयनात जागुनी रात केली साजरी

तू आलीस सांजवेळी अंगणी बहरली जुई
शहारते अंगाग माझे तू माळलीस तगर जरी

पाहिले वसंत अनेक आज वसंतोत्सव पाहिला
सोहळे हे यौवनाचे तू भासशी मु़कूल लाजरी

बोलघेवड्या मनाशी अबोल गुज चालले
कल्लोळी भावनांच्या चाले तुझीच गहजरी

पाहिले नटवे गुलाब न मोहले त्यांनी मला
मनवृंदावनी बहरणारी मोहते मना मंजरी

तार तार जुळवूनी त्या आठवांचा शालू बांधला
विरले जर धागे कधी तरी उरेल गुंता भरजरी

-सत्यजित

गुलमोहर: 

छान आहे !! गझल वगैरे मधलं मला काही कळत नाही. पण तुम्ही जे लिहिलय ते आवडलं.

-- शकुन

>>तार तार जुळवूनी त्या आठवांचा शालू बांधला
विरले जर धागे कधी तरी उरेल गुंता भरजरी
फार छान!

गहजरी म्हणजे?
कोजागिरी असे हवे ना? मंजरी की मंजिरी?
तगर जरी.. थोडे ताणल्यासारखे वाटले.

ही छान कविता आहे, असे मला वाटते.

चिनु मला मान्य आहे की ही कविता आहे अंत्य यमक जुळवुन गझल नाही होत. पण व्रुत्त आणि मिटर सांभाळताना कवितेचा आत्मा कुठे तरी हलतो. अर्थात त्यातच तर गझलेची जान आहे. म्हणुनच गझल सहज उतरायला हवी पण मी लिहीली कडवी भाव सांभाळुन शेर होतिल का? आणि कशी? म्हणुन तर तुम्हा सर्वाची मदत हवी आहे.

गहजरी म्हणजे गजर.. या विठूचा गजर हरी नामाचा.
मंजरी म्हणजे मंजिरी

आणि तगरी पेक्षा वसंतोत्सव जास्त ताणाला आहे अस मला वाटते.. Happy

ही छान कविता आहे, असे मला वाटते. Happy हे आवडल. Happy

शकुन, अपना भी वहीच हाल आहे... आभार Happy

सत्या, मला हे सुंदर काव्यच वाटले. गझलच्या बाबतीत मी देखील शिकाऊ आहे Happy आपल्या कार्यशाळेतल्या जाणकारांच्या गझल वाचून पहा. 'जमीन' कशी लागेल, वृत्त, मीटर या सर्व गोष्टींचा सविस्तर खुलासा तिथे आहेच.
वृत्त सांभाळायला शब्दांची काटछाट करणे बरोबर वाटत नाही.
सुरुवात करायचीच तर सोपे वृत्त आणि लहान मीटर निवडून पहा. त्यामुळे दमछाक कमी होईल Happy हे माझे दोन शब्द संपवते!
वसंतोत्सव आवडला. राहु दे तसाच. गहजरीबद्दल धन्यवाद.

छान रे सत्या Happy
.
तू आलीस सांजवेळी अंगणी बहरली जुई
शहारते अंगाग माझे तू माळलीस तगर जरी >>>>

.
तार तार जुळवूनी त्या आठवांचा शालू बांधला
विरले जर धागे कधी तरी उरेल गुंता भरजरी >>>>
.
हे खास आवडल

भावना येऊ देत. कविता जमली की गझल जमेल असे भटांनी त्यांच्या बाराखडीत सांगितलयं.
वृत्तांचा वृथा नको विचार
रक्तात काव्यांचा होऊ दे संचार
मग उतरताच शब्द कागदावर
तिला गझल म्हणतील जाणकार

सत्या प्रयत्न मस्त आहे.. तू चांगला कवी तर आहेसच.. तेव्हा गजलेचे तंत्र आत्मसात कर अजुन सुंदर गझल लिहिशील..

मीही शिकत आहेच... मिळून शिकुया Happy

शेवटचा शेर विशेष आवडला...

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

      सत्यजित, तुझा प्रयत्नं झक्कास आहे. आपण सगळेच इथे शिकतो आहोत. मिल्याशी सहमत. सुंदर कविता लिहितो आहेस. गजलेचं तंत्र आत्मसात कर... सुर्रेख गजल लिहू लागशील.
      कार्यशाळेचा बीबी वाचलास तर तुझी वरची गजल कुठे मात्रांत, वगैरे गुटली खातेय ते कळेलच.

      वैभवने म्हटल्याप्रमाणे कल्पना शब्दात येतानाच मुळात "तालात" येऊदे. म्हणजे मग मात्रात बसवण्यासाठी मूळ कल्पनेची प्लास्टिक सर्जरी करत बसावं लागत नाही Happy

      मी एक थोडा प्रयत्न केलाय तुझ्या कल्पना थोड्याफार घेऊन. बघ कसं वाटतय. (मीटर बदललय थोडसं)
      पाहणे तुजला जणू कोजागिरी हो शर्वरी
      झाकल्या नयनांत जागुनि रात्र करणे साजरी
      (गालगागा गालगागा गालगागा गालगा)

      आता पुढचे शेर हाच ताल संभाळत दुसर्‍या ओळीत 'अरी' ने संपले पाहिजेत. उदा:
      सांजवेळी येच तू, माळू नको पण मोगरा
      बहरलो मी, वेच मजला माळण्या वेणीवरी

      तुझ्या कल्पना झक्कास आहेत. आणि मी ही शिकाऊच त्यामु़ळे बट्ट्याबोळ झालाय. पण "साधारण" त्याच कल्पनेच्या आधारे वृत्त संभाळून लिहिण्याचा एक प्रयत्नं केला, इतकच.

      वाकेन पण मोडणार नाय.... Happy आयला शाळेत कधी अभ्यास नाही केला पण आता आभ्यास करावा लागणारस दिसतय. तुम्ही लिहा मी कॉपी मारेन... Happy

      पाहिले असे तुला अन भासली कोजागिरी
      मिटल्या नयनात जागुनी रात केली साजरी

      "पाहिले अवघे तुला अन भासली कोजागिरी
      जागुनी नयनात मिटल्या रात केली साजरी"
      *****
      तू आलीस सांजवेळी अंगणी जुई बहरली
      शहारते अंगाग माझे तू माळलीस तगर जरी

      "पावली तू सांजवेळी अंगणी जुई बहरली
      शहारले अंगांग माझे जरि तगर तू माळली"
      *****
      पाहिले वसंत अनेक आज वसंतोत्सव पाहिला
      सोहळे हे यौवनाचे तू भासशी मु़कूल लाजरी

      "पाहिले सण किती अनंत वसंत आजच पाहिला
      सोहळा हा यौवनाचा पाहुनी तुज लाजला"
      ****
      पहाबुवा कुठे जवळपास आहे का ते.

      सी.ल झक्कास .... मिटर बसवलत पण अंत्य यमक गोंधळतय ना...

      आता तुम्हि म्हणाल बच्चा समजके खंदे पे बिठाया... Happy पणा प्लिज तेवढ सुचवा ना...

      अरे अंत्य यमकाचं मला नंतर कळालं. आधी तुझं वाचल्यावर जे मीटर सुचलं तसं लिहिलं आणि मग इतर प्रतिसाद वाचले. आता तुम्हि म्हणाल बच्चा समजके खंदे पे बिठाया वगैरे असं कांही वाटायचं नाही मला . मी वाचायलाच लागलो मुळी मायबोलीवर. जे जे वाचतो ते सगळंच मला नवीन आहे. पण सर्वच छान आहे. असं खेळायला मला खूप आनंद मिळतो आहे. कांहितरी वेगळं वेगळ्या आपुलकीच्या परिवारात. !! Happy बघु पुन्हा प्रयत्न करीन. नक्की.
      .....................अज्ञात