पडसाद

Submitted by pulasti on 8 August, 2008 - 17:00

सूर त्याचे, चित्त माझे, साद अन पडसाद आहे
तोकडा व्यासंग माझा; आसवांची दाद आहे

मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे

एक रस्त्याच्या कडेला फूल खोकत बोलले, "ह्या -
माणसांचा फार आता वाढला उच्छाद आहे!"

बंगले बांधा तुम्ही पण झोपड्यांमध्येच का रे?
...बापजाद्या दौलतीचा केवढा उन्माद आहे

देवधर्माने जगी होतेच की काही भले, पण -
कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?

गुलमोहर: 

फूल खोकत बोलले! छानच. पण ३ रा आणि ४ था वगळता पडसाद व्यवस्थित उमटलेत.

फूल खोकले? थोडे ग्लायकोडीन पाजा की त्याला.. Happy

=============================================
|| हरिण ओम ||
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम हरणं व्रज |

>>मी जुना झालो कधी? का? ते मला कळलेच नाही...
>>वेगळे संदर्भ आता खुंटला संवाद आहे

पुलस्ति.... एकदम सही!

पहिल्या चार-सहा ओळी खूपच सुंदर आहेत; पुढे वाचल्यावर वाट भटकल्यासारखे वाटले.

पुलस्ती मस्तच...

त्यातही दुसरा शेर खूप आवडला...

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

      व्वा मस्तच,
      २, ३ आणि ५वा जास्त आवडला.

      सुधीर
      ====================

      हर देशमे तू हर वेषमे तू , तेरे नाम अनेक तू एक ही है
      तेरी रंगभुमी यह विश्वंभरा , सब खेलमे मेलमे तूही तो है

      पुलस्ती,
      पहिला वाचताना विचार करावा लागला (का कुणास ठाऊक). शेवटला सुंदरच.
      बंगले - सहज आहे.
      'फूल खोकत'ने मात्र विकेट घेतली. (एकदम ताशी ११० ने जाता जाता रस्त्यावर फतकल मारून बसल्यासारखं वाटलं.)

      शेवटाचे दोन शेर सही.

        ***
        टिंग म्हणता येते खाली, टुंग म्हणता जाते वर

        पुलस्ति.. दुसरा शेर सगळ्यात जास्त आवडला..:)

        ओळींचे क्रमांक मोजत मोजत का बुवा आवडून किंवा नावडून घ्यायचे बुवा?
        मला तर सगळ्याच ओळी आवडल्या.
        न मोजता वाचत गेल्यामूळे असं झालं असावं का? Proud
        --
        हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
        सुंदर साजिरा, श्रावण आला..!

        देवधर्माने जगी होतेच की काही भले, पण -
        कोणते नियमीत होते कोणता अपवाद आहे?

        सर्वात आवडला....
        एकदम सहज....
        सर्वांचं चांगलं होतं, माझ्याच बाबतीत "असं" का घडतं? असा आपण बर्‍याचदा नकारार्थी सूर लावतो... तोच अगदी नेमका ह्या शेरात उतरलाय....

        मतला आणि देवधर्माच्या शेरातला उला मिसरा याबद्दल मी गझल पोस्टताना फारसा समाधानी नव्हतो... पण मला म्हणायचंय ते मांडणारं काही वेगळं सुचत नव्हतं...

        प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!!