मराठी गझल

नाही

Submitted by देवा on 20 October, 2008 - 08:27

काळजाला भेदणारी गाज नाही
सागरा रुचला तुझा अंदाज नाही

लाख कंठांनी सदा आक्रंदणार्‍या
बघ तुलाही लाभला आवाज नाही

दोष का द्यावे उगा त्या सावकारा?
रक्तही उरले इथे निर्व्याज नाही

का अवेळी ओघळावे आसवाने?
का मनाला एवढीही लाज नाही?

गुलमोहर: 

काही खरे नाही

Submitted by अलका_काटदरे on 15 October, 2008 - 11:30

आज इथे उद्या तिथे
माझं काही खरं नाही

अळवावरच्या पाण्याला
पान शोधण्याचा हक्क नाही

शोधून सापडलेच तर
मन काबूत राहण्याची खात्री नाही

पाण्याचा काय, पंखांचा काय
रंग कायम एकच राहिल, असं नाही

जीवनाचा रंग मात्र

गुलमोहर: 

नसे राऊळी वा नसे मंदिरी

Submitted by जागोमोहनप्यारे on 15 October, 2008 - 05:23

माझी ही गजल स्पर्धेसाठी मी उशीरा पोस्ट केली... ती बहुतेक स्पर्धेला कन्सिडर होणार नाही... म्हणून इथे पोस्ट करत आहे....

नसे राऊळी वा नसे मंदिरी
तो 'मालकंस' आज भक्तात नाही.

तिचे विरहणे काय विशेष आता
तो 'मारवा' आज विरहात नाही.

गुलमोहर: 

शब्द

Submitted by छाया देसाई on 15 October, 2008 - 01:06

झुंझारल्या क्षणाना ,मी तोलणार नाही
शब्दात दिव्यतेला ,मी मापणार नाही

कोलाहलात इथल्या ,शब्दास भाव कोठे
लीलाव अक्षरांचा ,मी मांडणार नाही

शब्दात पोकळ्या ज्या ,जाणून त्यांस आहे
फुग्गे तसे गुलाबी ,मी सोडणार नाही

शब्दात जे सुखावे ,शब्दात ते दुखावे
मन शब्द करवतीने ,मी कापणार नाही

शब्दापल्याड भाषा ,कळुदे मला अनंता
शब्दात मग कुणाच्या ,मी गुंतणार नाही
छाया देसाई

गुलमोहर: 

द्रौपदी वस्त्र हरण

Submitted by छाया देसाई on 14 October, 2008 - 06:13

धावाच अंतरीचा प्रतीसाद द्रौपदीला
र्हदयस्थ श्रीहरीने दिली दाद द्रौपदीला

अपमान हरिप्रियेचा हरिचाच तूच जाणी
दुर्योधना न दावी अती माद द्रौपदीला
कोणी नसे कुणाचा जगी सर्व बान्धलेले
ये क्रुष्ण क्रुष्ण ऐकू मनी नाद द्रौपदीला

गुलमोहर: 

भावलेले

Submitted by कौतुक शिरोडकर on 13 October, 2008 - 02:21

शब्द काही भावलेले
वेदनांनी चावलेले
रोप तू का जाळले ते ?
सोबतीने लावलेले
तव सयींचे घाव इवल्या
या मनी ना मावलेले
एक अलबम दावतो मज
क्षण सुखाचे गावलेले
आज ठरले ते शहाणे
काल वेडे धावलेले
चेंगरूनी गाव मेले
देव नाही पावलेले

गुलमोहर: 

नदी

Submitted by मृण_मयी on 11 October, 2008 - 15:30

उन्हाळा शिरी झेलता शांत झाली
नदी वाहता वाहता शांत झाली

कशी डोंगरावर खळाळून वाही
नदी नांदता नांदता शांत झाली

कुणी पाट काढी, कुणी बांध घाली
नदी आटता आटता शांत झाली

किती सागराशी नदीने लढावे
समर्पण ठरे सुज्ञता, शांत झाली

गुलमोहर: 

रस्ता

Submitted by कौतुक शिरोडकर on 11 October, 2008 - 04:56

हा ओळ्खीचा रस्ता
नेई कुठे ?... हा रस्ता
सांभाळ...तेथे खड्डा
घेई कुशी, हा रस्त्ता
वळणात वळतो सहजी
साधा.. सरळ.. हा रस्ता
ना एकदाही गेला
गावी तुझ्या हा रस्ता
चौकात एक दुज्याला
गाठून भेटे हा रस्ता
ठावूक हे कोणाला
झोपे कधी हा रस्ता ?

गुलमोहर: 

समर्पित

Submitted by कौतुक शिरोडकर on 11 October, 2008 - 04:51

बघा शब्द माझा, पटाईत नाही
गझल सांगते... मी सराईत नाही
किती जोडले अन किती तोडले ते
सही काफिये या, छपाईत नाही
वॄत्त अडखळे ते, गडबडे अलामत
अशी मांडणी..जी सफाईत नाही
असे पिळले हे, तसे घासले मी
तरी शेर खासे, धुलाईत नाही

गुलमोहर: 

मागणे

Submitted by स्मिता द on 20 September, 2008 - 02:41

शब्दांची आरास मांडली होती
स्पर्शांची रांगोळी पुसली होती

भास सारे जिवंत झाले
सत्याची केवळ सावली होती

निर्माल्य सारे जपले होते
फुलांची रास कुजली होती

लागले सार्‍या हिरवळीस वणवे
जंगले कधीच शमली होती

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल