धुके

Submitted by चिन्नु on 22 August, 2008 - 16:43

धुके विरून गेले
बघे निघून गेले

उफाळला किनारा
चरे निवून गेले

प्रवाद चाललाहे
ऋणी लुटून गेले

उसासला फुलोरा
झरे भिजून गेले

नको नव्यास हाका
जुने निजून गेले

कडाडले इथे जे
तिथे थिजून गेले

ट ला ट पाहता ही
कुणी खिजून गेले Wink

'चिन्नू'स सांग दाता
कर्ते दिपून गेले!

चिन्नु

गुलमोहर: 

नको नव्यास हाका
जुने निजून गेले
वाह....

छोट्या बहराच्या गझलांना सुंदर बहर आलाय इथे....
छान वाटतंय वाचताना... नाहीतर मध्यंतरी इथे गझलेच्या समजुतीने बरीच मुक्तछंदे पोस्ट होत होती....
(कृपया हा परिसंवादाचा मुद्दा होऊ नये, हे निरीक्षण आहे माझं!! Happy )

खूप खूप धन्यवाद आनंदयात्री, स्लर्ती. थोडी धाकधुकीतच पोस्ट केल्ये. एक दोन शेर मनासारखे जमले नाहीत तरी. काही चुकल्यास कृपया मार्गदर्शन करावे.

चिन्नु, फुलोरा आणि नवे-जुने हे शेर आवडले!
पहिला, शेवटचा आणि प्रवाद हे नीट कळले नाहीत...

धन्यवाद पुलस्ति.

मतला आधी असा होता:
धुके विरून गेले
बघे निघून गेले
पण नंतरच्या शेरात 'ऋणी''कुणी' ह्या शब्दांनी अलामत भंगेल की काय म्हणून 'जनं' हा शब्द योजावा लागला.

प्रवाद चाललाहे
ऋणी घिसून गेले, हा आधी असा लिहिला होता:
प्रवाद चाललाहे
ऋणी 'लुटून' गेले
आता लुटून मुळे अलामत भंगेल म्हणून बदलले पण त्याची रयाच गेली. Happy हा शेर मला काढावासा वाटत आहे आता.

मक्ता जमला आहेही आणि नाहीही! Happy
देवाकडे मागणे होते मक्त्यात की जाणकार मायबाप ज्यांन्नी गझलेशी ओळख करून दिली, अश्या सर्वांना ही गझल आवडावी Happy एवढे सांगावे लागले म्हणजे इथेपण गुटली खाल्लीच! पुढल्या वेळी सुधारण्यचा नक्की प्रयत्न करेन.

चिन्नु,
अलामतीबद्दल...
तुझ्या मूळच्या मतल्यावरून -
धुके विरून गेले
बघे निघून गेले
अलामत "ऊ" होते. वि/नि मधल्या "इ" चा तसेच धुके/बघे मधल्या "ए" चं अलामतीत योगदान नाहिये. (२-२ अलामती असलेल्याही गझला असतात... पण तो तर फारच कठीण प्रकार आहे!)

म्हणून - मतल्यात "बघे" च जास्त योग्य वाटतंय.

तसेच, लुटून चेही घिसून करायची गरजच नसल्यामुळे, लुटून च ठेव.

मक्त्याचा मला असा अर्थ लागतोय - "हे दात्या, तू चिन्नूस सांग की कर्ते दिपून गेले आहेत". अजूनही गोंधळ होतोय...

धन्यवाद पुलस्ति. अभ्यास न केल्याने पुलाखालून पाणी वाहून गेल्यासारखे झाले आहे Happy
मक्ता बदलावाच लागेल असे दिसत्ये. अर्थ एवढा स्पष्ट नाहीये. कर्ते पेक्षा अजून काय योजता येइल यावर विचार करत्ये. सुचल्यास नक्की सांगा.

उसासला फुलोरा
झरे भिजून गेले

>>> व्वा आवडला हा शेर...

पुलस्ती म्हणतात तसे काही काही शेर अजून स्पष्ट ह्यायला पाहिजेत... छोट्या बहर मुळे मर्यादा आलीय असे वाटतेय...

उफाळला किनारा
चरे निवून गेले हा चांगला वाटतोय पण कळला नाही मला... 'चरे' चे प्रयोजन कळले नाही

उन्हाचे चरे का?

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे

      धन्यवाद मिल्या..
      बरोबर, उन्हामुळे किनार्‍याला पडलेले चरे उर्फ भेगा असा अर्थ होता.