जगणे

Submitted by कौतुक शिरोडकर on 1 August, 2008 - 07:17

जगणे नव्हे आभास
मरणाचा रोज भास
सुख थांबेना मुठीत
करतो तरी प्रयास
धाय मोकले विवेक
इमान जेव्हा पणास
उठे पंगती सदैव
बळे बळे कुणा उपास
डोळ्यात रात जागी
गहीवरे छत उदास
उतु जाई तम घरात्
लखलख जगी आरास
लिही कुणी ना पानी
आखता वरी समास
जळलो चिती पुरेसा
संपला का प्रवास ?

गुलमोहर: 

छान!, पण ही गजल आहे का महित नाही.