मराठी गझल

गुपित

Submitted by pulasti on 6 November, 2008 - 07:32

पक्का मी शेंदाड शिपाई! कधीतरी पण घडते काही
बाहुंमध्ये आणि जरासे; जरासेच फुरफुरते काही

कुणास कळतो सर्व पसारा? तरी शहाणा त्यास म्हणावे -
ज्याला कळते - सगळे त्याच्या कळण्यासाठी नसते काही

गुलमोहर: 

आकार नाही!

Submitted by गणेश कुलकर्णी on 3 November, 2008 - 08:07

जगातून इतक्यात माघार नाही
मनाला कशाचाच आजार नाही!

उगा वाचतो रोज पोथ्या पुराणे
प्रभू एवढ्याने गवसणार नाही!

लढाया जुन्या काल बोलून गेल्या
नव्या ह्या जमान्यास आभार नाही!

असा ये जशी की झळाळी नभाला
अजुनही कपाळी अंलकार नाही!

गुलमोहर: 

पापणी

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 October, 2008 - 10:00

बोलताना तू अशी झुकविते का पापणी ?
भाव डोळ्यातील ते, लपविते का पापणी ?
चांदण्यांची सावली, भेट तेथे आपली
आठवण माझीच ती, झुलविते का पापणी ?
कोणता हा सल सखे, जाळतो तव अंतरा
शब्द ही ओठी नसे, हरविते का पापणी ?

गुलमोहर: 

मोजले का तू कधी ?

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 October, 2008 - 09:52

सोबती सारे किती, मोजले का तू कधी ?
मोसमी वारे किती, मोजले का तू कधी ?
भांडणे रुसणे तुझे अन मनवणे ते तिचे
रे, अरे, कारे किती, मोजले का तू कधी ?
पाहता तव यातना, आसवे ढाळी कुणी
त्यातले खारे किती, मोजले का तू कधी ?

गुलमोहर: 

रोजचेच

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 October, 2008 - 00:46

गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच
लोचनी तिच्या सदैव
पाहतो नवेच पेच
वागतो किती जपून
लागते मधेच ठेच
घेतली न मी उगाच
बोलतो अता खरेच
नेमकी फुले गहाळ
पाकळ्या हळूच वेच
भार फार नियमनात
बोलतात आकडेच
काय लढवशी गडास
जर फितूर आतलेच

गुलमोहर: 

एवढेच शेवटी

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 October, 2008 - 00:41

वाहतील ताटवे, एवढेच शेवटी
ओंजळीत आसवे, एवढेच शेवटी
भांडलो कधी , किती ? आठवे न ते अता
प्रीत नांदली सवे, एवढेच शेवटी
पेरतो सदाच मी, आसपास चांदणॅ
उगवती न चांदवे, एवढेच शेवटी
कोंडले मलाच मी, तळघरी, तरी पुन्हा
दु:ख दार ठोठवे, एवढेच शेवटी

गुलमोहर: 

तू

Submitted by कौतुक शिरोडकर on 23 October, 2008 - 00:32

बोलशी खोटे जरी तू
दे दिलासे मज तरी तू
छत न मी शाकारलेले
थांब ना, थोडे सरी तू
चिंततो वाईट माझे
रे मना, माझा अरी तू
यातने गोंजारले मी
मागल्यापेक्षा बरी तू
भाग्य भाळी, रेघ हाती
हे खरे का ही खरी तू ?
वेदना, चिंता हजारो

गुलमोहर: 

भीती वाटते

Submitted by सत्यजित on 22 October, 2008 - 08:40

का सत्याची कास धरावी तरी भीती वाटते?
का न्यायाची आस धरावी तरी भीती वाटते?

का पट्टी डोळ्यांवरली कान देवीचे झाकते?
का अपराधी वाट धरावी तरी भीती वाटते

का श्रद्धेने मी धगधगती उदी भाळी लावली
आता विझली वात धरावी तरी भीती वाटते

गुलमोहर: 

प्रमाद

Submitted by कौतुक शिरोडकर on 22 October, 2008 - 02:20

कोण मी.. हे याद नाही
ओळखीची साद नाही
ओरडूनी सांग की मी ...
बोध आहे... ब्याद नाही
भोग सारे भोगले ते
जीवनाशी वाद नाही
शोध अन मग सांग मजला
कोण तो बरबाद नाही
मोकळे केले मनाला
संपले संवाद नाही
वाजले नाणे कितीदा
एवढा मी बाद नाही

गुलमोहर: 

अजूनही

Submitted by जो_एस on 21 October, 2008 - 07:29

एक छोटासा प्रयत्न

दाटती जुनेच का विचार ते अजूनही
का व्यथा अशी मनास जाळते अजूनही

गोड गोड बोलतात ते समोर आमच्या
झेलतेच पाठ कुटिल वार ते अजूनही

दिवस तेच रात्र तीच तेच चंद्र सूर्यही
माणसेच बदलती विचार ते अजूनही

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल