कविता

अवतीर्ण जाहले पूर्ण

Submitted by पुरंदरे शशांक on 24 July, 2012 - 23:57

सावळ्या घनांची दाटी
ती रात्र अष्टमी होती
व्याकुळली धरणी पुरती
डोळ्यात आसवे होती

कालिंदी हृदयी खळबळ
केव्हा ये मुहुर्तवेळा
सुकुमार भेटवी चरण
कुब्जाही विनवी हरिला

मुरलीतून निघती सूर
खिल्लारे घेती वेध
स्फुरतसे बाहू का वाम
निस्तब्ध यशोदा नंद

घुमतसे नाद अनाहत
राधेच्या अंतर्यामी
तृप्तता व्यापून उरली
राधा ती कृष्णचि झाली

रातीच्या मध्यप्रहरात
अवतीर्ण जाहले पूर्ण
योग्यांसी ब्रह्म निष्काम
भक्तांसी सावळा कृष्ण

गुलमोहर: 

काही तरी चुकतं आहे.

Submitted by स श्वेता on 24 July, 2012 - 18:16

काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

पूर्वी एका bat बॉल ने भागात होतं.
आंब्याच्या कोई आणि विट्टी दांडू चं पण खेळात स्वागत होतं,
आता I-PAD शिवाय चालत नाही,आणि मुलांच्या आधी महागड्या खेळासाठी आईचाच हट्ट थांबत नाही.

काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

ती तरी काय करणार बिचारी, मुल काय खेळतात यावरून घराचं status ठरतं
आणि वडिलांभोवती आर्थिक मंदी चे सावट फिरैला लागतं.
I-PAD विकत घेतलेला बाबा, आता गल्लीतल्या कोपऱ्यावर गप्पा मारत नाही, म्हणतो काय करणार त्यांना technology मधले काही कळत नाहीं.

काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

गुलमोहर: 

माबोवरील माझ्या मुली,सुना,बहिणींसाठी प्रेमाची भेट

Submitted by pradyumnasantu on 24 July, 2012 - 18:10

तिच्या सासरच्या अंगणातल्या वांग्यांच्या रोपाला
भेंड्या लागतात
गाण्यांच्या, बहिणींबरोबर खेळलेल्या, घरी
दूर दूर तिच्या माहेरी
*
थोडंसं पुढं गेल्यावर
अर्धा पिक्का आंबा पडतो थेट तिच्या पाठीवर
जणू आईनं मायेनं पाठीत दिलेला धपाटा
आगळीक काही केल्यावर
*
पुढचं झाड चिंचांचं
गाभुळलेल्या, आंबट गो्ड्या
जणू तिचा धाकटा भाऊ
इथेही करतो आचरट खोड्या
*
कोप-यातल्या नारळाला
फळं जी लागतात
पित्याच्या अंतरीच्या गोड पाण्याची
आठवण पाजवून देतात
*
पण जेव्हा ती माहेरी जाते
तिथल्या बागेतही अशीच फिरते
तिथेही आहेत दोन खास झाडं
ती दोन्हीही काढतात
डोळ्यांतून पाणी थोडं थोडं
*
एक तो पारीजात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्यर्थाच्या झाडाला

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 July, 2012 - 08:58

व्यर्थाच्या झाडाला
अर्थाचेच फळ
अर्थाच्या फळात
व्यर्थाचेच बीज
असा वृक्ष तू
वाढता वाढतो
व्यापुनिया विश्व
कुठेही नसतो

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

हा जन्म गूढ

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 July, 2012 - 08:37

जिथे जीव जडतो
स्वप्ने पाहू लागतो
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो

हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले

का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली

हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना

हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

नीरव शांततेत

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 July, 2012 - 07:56

नीरव शांततेत
सरोवर प्रशांत
घनदाट वृक्षात
वेढलेला एकांत

निळ्या आकाशात
निस्तब्ध वात
मनातील तरंग
स्तब्ध मनात

तुझ्या अस्तित्वाचे
स्पंदन कणाकणात
आनंदाची उर्मी
दाटलेली अंतरात

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

कवितेवर आधारित reality show

Submitted by चेतन.. on 23 July, 2012 - 05:13

सध्या जिकडे तिकडे आपण reality show चंच वारं आपण बघतो आहोत.. सगळ्या प्रकारच्या कलांना मिळणारा प्रोत्साहन हे निश्चितच कौतुकास्पदच आहे...
पण ह्या साऱ्या मध्ये कवितेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं मला वाटतं... तर कवितेवर आधारित असा reality show आपल्या मराठीमध्ये असायला हवा कि नको....? म्हणजे "काव्यसम्राट".. वगैरे वगैरे...!
मते जाणून घ्यायला आवडेल..!

गुलमोहर: 

ओशिळांचे निवारे

Submitted by नरेंद्र गोळे on 22 July, 2012 - 23:51

ओशिळां[१]चे निवारे

सांधका[२]चे बंध सारे, ओशिळांचे अन्‌ निवारे ।
सरकत्या काचाच खिडक्या, कणपटां[३]ची त्यांस द्वारे ॥ धृ ॥

लोह-जाळ्यांची कवाडे, रक्षती खिडक्या नी दारे ।
निरखण्या आगांतुकासी, दृश्यभिंग[४] देती सहारे ॥ १ ॥

भिंतींतुनी जडल्या कळां[५]चे, छन्नमार्गी नाद[६] सारे ।
रात्रखिट्टी[७] काढता आतून, उघडे दार बा रे ॥ २ ॥

उद्‌वाहकाभोवती फिरत, चढती कसे सारे जिने ।
गाळे निवासी वसवले, जणू छन्नमार्गी हारीने ॥ ३ ॥

मजल्यागणिक चढत्या दराने, विकत घेऊ आम्ही वारे ।
तुटक सारी संस्कृती अन्‌, सदनिकांची बंद दारे ॥ ४ ॥

नरेंद्र गोळे २०१२०७२३

गुलमोहर: 

खडकावर पाणी आल

Submitted by gajanan moreshw... on 22 July, 2012 - 13:56

खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल
रामायण आल पारायण झाल
बंधूभाव उफाळून उठलाच नाही
व्देष मनातील मिटलाच नाही
समतेच तत्व नाही मनात मुरल
खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल

गुलमोहर: 

वाट सुटकेची पाहतो सुपरस्टार कालचा

Submitted by pradyumnasantu on 22 July, 2012 - 13:41

कितीक वर्षं राहिलो चाहत्यांच्या गराड्यात
आज वेळ आलीय रहायची कोंबड्यांच्या खुराड्यात
काय सांगू तुम्हाला माझे डायलॊग्ज एके काळचे
सलीम-जावेद लिहायचे आणि फॆन्स खुळे व्हायचे
स्वत:च्या रक्तानं मुली पत्रं लिहायच्या यारों
बंगल्यासमोर माझ्या ताटकळायचे हजारो
निर्माते तर जीव टाकायचे एका ’हो’ साठी
दिग्दर्शक रेंगाळत माझ्या कुत्र्याच्या ’भो’ साठी
त्या काळात एकही हिरो माझ्यापुढं टिकला नाही
माझ्याहून अधिक किमतीला एकही सिनेमा विकला नाही
सुंदर सुंदर नट्या सतत इर्द-गिर्द नाचायच्या
ब्रेकमधे माझ्याच बातम्या स्टारडस्ट्मधे वाचायच्या
दुर्दैवाने लागोपाठ चार सिनेमे पडले
आजुबाजुचे पडेल हिरो दहा फूट ऊडले

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - कविता