वाट सुटकेची पाहतो सुपरस्टार कालचा

Submitted by pradyumnasantu on 22 July, 2012 - 13:41

कितीक वर्षं राहिलो चाहत्यांच्या गराड्यात
आज वेळ आलीय रहायची कोंबड्यांच्या खुराड्यात
काय सांगू तुम्हाला माझे डायलॊग्ज एके काळचे
सलीम-जावेद लिहायचे आणि फॆन्स खुळे व्हायचे
स्वत:च्या रक्तानं मुली पत्रं लिहायच्या यारों
बंगल्यासमोर माझ्या ताटकळायचे हजारो
निर्माते तर जीव टाकायचे एका ’हो’ साठी
दिग्दर्शक रेंगाळत माझ्या कुत्र्याच्या ’भो’ साठी
त्या काळात एकही हिरो माझ्यापुढं टिकला नाही
माझ्याहून अधिक किमतीला एकही सिनेमा विकला नाही
सुंदर सुंदर नट्या सतत इर्द-गिर्द नाचायच्या
ब्रेकमधे माझ्याच बातम्या स्टारडस्ट्मधे वाचायच्या
दुर्दैवाने लागोपाठ चार सिनेमे पडले
आजुबाजुचे पडेल हिरो दहा फूट ऊडले
एकेकाळचा सुपरस्टार मी ते सारे याद करतो
आज मात्र या छोट्याशा खुराड्यात वावरतो
आज अपु-या घरात या तंगडी हलवायला जागा नाही
एकालागुन दहा कोंबडे नशीबाघरची वाट पाही
आला आला आला पहा सुरा घेऊन माझा देव
आत्ता होईल सुटका माझी देवा स्वर्गात जागा ठेव
पण हाय खाटकानेही कोंबडा उचलला दुसराच
आणखी जगणं भाग आहे, आज मरणं विसराच
केविलवाणा डायलॊग माझा न ऐकल्यासारखं करून
सुराधारी ऒडीयन्स माझा गेला तिथून निघून
रोज एक जात जात अखेरचा मी उरलो
भल्यामोठ्या खुराड्यात त्या आनंदाने फिरलो
सकाळ झाली आला धडधडत मालकाचा खटारा
त्यातून काढून यात टाकले नवीन कोंबडे बारा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आयुष्यभर चाहत्यांच्या गराड्यात राहिलेल्या नेत्या, अभिनेत्यांचे जीणे निवृत्तीनंतर खडतर बनते. पैसा-अडका. मित्र,नातेवाईक, सुखे साथ सोडतात. मृत्यूची वाट बघणे नशिबी येते पण तोही लौकर वाट्याला येत नाही.तो जवळ आला, आला असे वाटते तो लाईनीत नवे बारा कोंबडे दाखल होतात.

विभाग्रजजी, हाच कवितेचा शेवट. प्रतिसादाबद्दल हार्दिक आभार.