माबोवरील माझ्या मुली,सुना,बहिणींसाठी प्रेमाची भेट

Submitted by pradyumnasantu on 24 July, 2012 - 18:10

तिच्या सासरच्या अंगणातल्या वांग्यांच्या रोपाला
भेंड्या लागतात
गाण्यांच्या, बहिणींबरोबर खेळलेल्या, घरी
दूर दूर तिच्या माहेरी
*
थोडंसं पुढं गेल्यावर
अर्धा पिक्का आंबा पडतो थेट तिच्या पाठीवर
जणू आईनं मायेनं पाठीत दिलेला धपाटा
आगळीक काही केल्यावर
*
पुढचं झाड चिंचांचं
गाभुळलेल्या, आंबट गो्ड्या
जणू तिचा धाकटा भाऊ
इथेही करतो आचरट खोड्या
*
कोप-यातल्या नारळाला
फळं जी लागतात
पित्याच्या अंतरीच्या गोड पाण्याची
आठवण पाजवून देतात
*
पण जेव्हा ती माहेरी जाते
तिथल्या बागेतही अशीच फिरते
तिथेही आहेत दोन खास झाडं
ती दोन्हीही काढतात
डोळ्यांतून पाणी थोडं थोडं
*
एक तो पारीजात
तो देतो ’ह्यां’च्या केशरी प्रेमाची साक्ष
आणि दुसरा सावलीदार
सासू-सास-यांचा वटवृक्ष
******

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

म्हणूनतर, व्हीनसजी, कविता लेकींसाठी, तसेच सुनांसाठीही आहे.
धन्यवाद विभाग्रजजी, लाजोजी, व्हिनसजी. कृपालोभ ठेवावा.

छान आहे !

आवडली