खडकावर पाणी आल

Submitted by gajanan moreshw... on 22 July, 2012 - 13:56

खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल
रामायण आल पारायण झाल
बंधूभाव उफाळून उठलाच नाही
व्देष मनातील मिटलाच नाही
समतेच तत्व नाही मनात मुरल
खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल
गीता आली गाऊन झाली
धर्म कुणाला उमजलाच नाही
कर्म - त्याचाही अर्थ कुणाला समजलाच नाही
कृष्ण मात्र फुकट मेला
निषाधाच्या तिरकमठयान
एवढच फक्त ध्यानी आल
खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल
गाथा आली वाचून झाली
दात्याचा आनंद उमजलाच नाही
अठठावीस युगं विटेवर उभा
त्या "काळ्याचा" अंत कुणालाच समजलाच नाही
इंद्रायणी बुडून डोही
गाथेवरुन पाणि गेल
एवढच फक्त ध्यानी आल
खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल
ज्ञानेश्वरी आली पारायण झाली
ज्ञानदेवाचे मात्र तुकडे झाले
ज्ञान पडल बाजुला
देवाला मिळाला देव्हारा
पण देवपण बाहेर नाही आल
एवढच फक्त ध्यानी आल
खडकावर पाणी आल
ऊन आल अन वाळून गेल

गुलमोहर: 

शेवटी कवितेचा सारांश काय?
पालथ्या घड्यावर पाणी.

ज्ञानदेवाचे मात्र तुकडे झाले>>>>>हे नाही समजल.

छान