कविता

केले तर होते

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 July, 2012 - 05:32

केले तर होते मनाचे उन्मन
अन्यथा विचारी राहते पांगुन
केले तर होते सत्याचे आचरण
असत्य अंधारी अन्यथा पतन
केले तर होते निश्चये साधन
अन्यथा जीवन जातसे वाहून
केले तर होते जन्माचे कल्याण
अन्यथा विक्रान्ता तीच वणवण

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

देवाच्या दारात

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 July, 2012 - 05:09

देवाच्या दारात
गट होतात
लोक भांडतात
निष्ठेने किती

जरी असे एक
आराध्य दैवत
गाठणे जीवनी
एकच ध्येय

भक्तात श्रेष्टत्व
उच्य नीचत्व
अहंता वाढवत
घड़े का साधन

इथे ही जर
द्वेष मत्सर
काय संसार
मग वाईट

विक्रांत

http://kavitesathikavita.blogspot.in/

गुलमोहर: 

दुसरे प्रेम - 'काव्यद्विदल'

Submitted by रसप on 19 July, 2012 - 00:47

‎'मराठी कविता समूहा'च्या 'काव्यद्विदल - भाग -१' मध्ये माझा सहभाग -

प्रथम काव्यदल -

उगाच पळणे प्रेमापासुन सहजच मिळताना
मनातले समजून टाळणे सगळे दिसताना
मग नकळत फुलते कळी कोवळी हसते बावरते
हे असे नेहमी होते माझे मनास हरताना

मनात गाणे गुणगुणतो पण ओठांवर बंदी
मोजत बसतो उगाच पडल्या खड्ड्यांची रुंदी
मी कितीकितीदा पाउल माझे जपून चालवले
पण वळणावरती मलाच चढते गाण्याची धुंदी

धडपडणे ही सवयच माझी, अंगी बाणवली
सपाट रस्त्यानेही मजला घसरण दाखवली
पाहून घसरलो डोळे केवळ, हसू कधी हळवे
अन कधी पाहुनी छबीस दिवसा स्वप्ने रंगवली

मनात माझ्या कधी कुणाचा दरवळला चाफा

गुलमोहर: 

***पाउस ...

Submitted by vrishali gotkhi... on 18 July, 2012 - 12:51

पावसाचे थेंब झेलतोय .. .चेहेऱ्यावर ..मी ..
जणू ..तुझ्या "गुलाबी '..ओठांचा ..स्पर्शच ..अनुभवतोय मी ..!
पावसाची ..रुण..झुण...रुण..झुण...
जणू .तुझ्या बोलण्याची धुन...छुन छुन .....छुन छुन..!
पाऊस ..बरसतोय ..अंगावर ..
जणू ..आवेग तुझा .."बेभान "....अनावर ..!!
पावसाचा .."स्पर्श '..तना ..मनावर ....
जणू ..आठवणी "एकांताच्या ..आपल्या "..क्षणा .. क्षणावर ..!
..असे दर मोसमात .पावसाने येणे .
आणी ..जागवणे ..आठवणी पुन्हा ..पुन्हा ..
तुला .पण आठवत असतील का..ग तुझ्या माझ्या प्रीतीच्या "खुणा "?

गुलमोहर: 

आनंद - चित्रपट कविता

Submitted by रसप on 18 July, 2012 - 05:50

Picture3.png

क्षणही आयुष्याचा
उगाच रडलो नाही
नियतीशी असेन हरलो
मृत्यूशी हरलो नाही

एकेक घाव तो जपला
जो खोल-खोल मज रुतला
झेलले उरावर सारे
मी पाठ फिरवली नाही

मावळत्या सायंकाळी
रंगांची उधळण झाली
मी कुठल्या एका रंगी
हटकून रंगलो नाही

प्रत्येक रंग मी ल्यालो
अन् सर्व रसांना प्यालो
आनंद वाटला येथे
दु:ख़ास दावले नाही

.…रसप….
१५ मार्च २००९

गुलमोहर: 

"शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात"

Submitted by मराठी टायगर on 18 July, 2012 - 03:00

"शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात"

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात,
कळलच नाही,'काय बघीतलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात?'
कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं,
नाकावरती सोडावॉटर आणि मागे दोन वेण्या .
वारं आलं तर ऊडून जाईल अशी तीची काया,
रुपं पक्क काकूबाई...पण अभ्यासावर माया
गॅदरींगमध्ये एकदां तिने गायलं होतं गाणं,
तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं जाणं.
नारळीपौर्णीमेला तिन मला नारळीभात वाढला,
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला
नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जीरून गेली,

गुलमोहर: 

बाप

Submitted by चाऊ on 18 July, 2012 - 02:32

माझा बाप अजून बच्चा आहे
आतुन थोडा कच्चा आहे
व्यवहार काही कळत नाही
पण मनाचा सच्चा आहे

सांगतात सगळे, भरपूर कमव
आयुष्यात जेवढं जमेल तेवढं जमव
स्वतांचं भलं आणि स्वता:च नाव
सगळाच, दिडक्यांचा हिशेब आहे

ह्याचं म्हणणं वेगळच, सांगतो,
जोड नाती, माणसं जमव,
मुला - नातवंडांना सुखानं रमव
मला खरच तेवढच हवं आहे

शिकायचं तर शिक, हवं तर
खेळायचं तर खेळ जन्मभर
काय करशील ते कर मनोभावे
असा जगावेगळा सल्ला आहे

बघ हे तारे, तो ध्रुव आणि व्याध
पावसात भिजलेले हिरवे पहाड
घे श्वासात भरुन न्हालेल्या बाळाचा गंध
ह्यातच जगण्याची सगळी मजा आहे

वाटून घे तिळ, सात जणात सारखा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी कात टाकली

Submitted by जयदीप. on 18 July, 2012 - 02:21

आज अचानक दिसेनात
दु:खं माझी गोंदवलेली
माझंच मला कळलं नाही
केंव्हा मी कात टाकली!

विरले ओरबाडे द्वेषाचे
भरली प्रत्येक जखम ओली
माझंच मला कळलं नाही
केंव्हा मी कात टाकली!

नवी पहाट, नवीन स्वप्ने
कोरी काया नवीनवेली
माझंच मला कळलं नाही
केंव्हा मी कात टाकली!

गुलमोहर: 

होतीस तू

Submitted by संजयb on 18 July, 2012 - 02:03

तू होतीस तू
गाताना हसताना
होतीस तू
ऊंच भरारी धेताना
शिखरा वरून गरगरत येताना
काही चूकले म्हणून रडताना
होतीस तू
मी जग जिंकले मनात
कोणी नह्वते जाणले
ते जाणून घेेण्यास
होतीस तू
जीवनाचे अवधड पल्ले
वाकडी अन् तिकडी वळणे
तेवत होतीस तू शेजारी
वाटे वरचे काटे
दावीत होतीस तू
तूझ्या पंखातील भरारी
अन् डोळ्यातील दृढ स्वप्ने
सारे ठेवून पाठी
माझ्या सवे
होतीस तू

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तु***

Submitted by vrishali gotkhi... on 17 July, 2012 - 12:42

.

तू ..असतेस मनाच्या आकाशात जणू "शुक्राची " चांदणी !
..अढळ..पणे चमकणारी ..
तू ..असतेस माझ्या . आसपास ..
जशी हवेची झुळूक ..मंद ,सुगंधी ,सभोवार अलवार पसरलेली ..!
तू असतेस जणू माझ्या हृदयीचा .."चंद्र "..
शीतल ..मनाला सुखावणारा ..
आणी ..सारे आकाश व्यापून ..उरणारा ..!
असे ..काही असते मी मलाच तुझ्यात गुंतवलेले ..
की तुझ्याच .आस्तित्वात...असतात माझे" श्वास "..सामावलेले !!

व्रुशालि...*
.................

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता