काही तरी चुकतं आहे.

Submitted by स श्वेता on 24 July, 2012 - 18:16

काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

पूर्वी एका bat बॉल ने भागात होतं.
आंब्याच्या कोई आणि विट्टी दांडू चं पण खेळात स्वागत होतं,
आता I-PAD शिवाय चालत नाही,आणि मुलांच्या आधी महागड्या खेळासाठी आईचाच हट्ट थांबत नाही.

काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

ती तरी काय करणार बिचारी, मुल काय खेळतात यावरून घराचं status ठरतं
आणि वडिलांभोवती आर्थिक मंदी चे सावट फिरैला लागतं.
I-PAD विकत घेतलेला बाबा, आता गल्लीतल्या कोपऱ्यावर गप्पा मारत नाही, म्हणतो काय करणार त्यांना technology मधले काही कळत नाहीं.

काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

काम करून बाबा आता खूप मोठा झाला आहे,हसणारा बाबा मात्र त्या कोपऱ्यावरच हरवला आहे,म्हणून आनंदासाठी आम्ही आता परदेशात फिरतो,जग फिरून सुद्धा आम्ही हसण्याला मुकतो.

खरच काही तरी चुकतं आहे खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.
आई आणि तिच्या मैत्रिणींच वेगलं ते काय होणार होतं !
पूर्वी असायच्या मनमोकळ्या गप्पा,भरभरून गारणी आणि घाल्घाळून डोळ्यात पाणी,
शेजारणी सुद्धा असायच्या सख्या मैत्रिणी,आज मात्र अनुभव वेगळा आहे माझा आयुष्य इतरांपेक्स्या कित्ती "सुंदर" या कल्पनेचाच भपका आहे. पूर्वी रडलेल्या डोळ्यांमध्ये सुद्धा खरंखुरं हसू असायचं,आता हसणाऱ्या मुखवट्या बरोबर आपणही खोटं खोटं हसायचं.

खरच काही तरी चुकतं आहे........

गुलमोहर: 

आपली कविता जरा उभी केली की वाचायला छान वाटते.
न आवडल्यास माफ करा

काही तरी चुकतं आहे
खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

पूर्वी एका bat बॉल ने भागात होतं.
आंब्याच्या कोई आणि विट्टी दांडू चं
खेळात स्वागत होतं,
आता I-PAD शिवाय चालत नाही,
आणि मुलांच्या आधी
महागड्या खेळासाठी
आईचाच हट्ट थांबत नाही.

काही तरी चुकतं आहे
खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

ती तरी काय करणार बिचारी,
मुल काय खेळतात
यावरून घराचं status ठरतं
आणि वडिलांभोवती
आर्थिक मंदी चे सावट फिरैला लागतं.
I-PAD विकत घेतलेला बाबा आता
गल्लीतल्या कोपऱ्यावर गप्पा मारत नाही,
म्हणतो काय करणार
त्यांना technology मधले काही कळत नाहीं.

काही तरी चुकतं आहे
खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.

काम करून बाबा आता
खूप मोठा झाला आहे,
हसणारा बाबा मात्र
त्या कोपऱ्यावरच हरवला आहे,
आनंदासाठी आम्ही आता परदेशात फिरतो,
जग फिरून सुद्धा आम्ही हसण्याला मुकतो.

खरच काही तरी चुकतं आहे
खऱ्या सुखाला जग सारं मुकते आहे.
आई आणि तिच्या मैत्रिणींच
वेगलं ते काय होणार होतं !
पूर्वी असायच्या
मनमोकळ्या गप्पा,भरभरून गारणी
आणि घाल्घाळून डोळ्यात पाणी,
शेजारणी सुद्धा असायच्या सख्या मैत्रिणी
आज मात्र अनुभव वेगळा आहे
माझा आयुष्य इतरांपेक्स्या कित्ती "सुंदर"
या कल्पनेचाच भपका आहे.
पूर्वी रडलेल्या डोळ्यांमध्ये सुद्धा
खरंखुरं हसू असायचं,
आता हसणाऱ्या मुखवट्या बरोबर
आपणही खोटं खोटं हसायचं.

खरच काही तरी चुकतं आहे.....

छान!!!

विक्रांत प्रभाकर आपले खूप आभार,मला सुद्धा नवीन मांडणी खूप आवडली ! आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाच्या आहेत सर्वांचे मनापासून आभार.