Submitted by UlhasBhide on 4 March, 2011 - 04:07
कसे जगायचे ?
असेच का कसेबसे आयुष्य हे रेटायचे ?
की सुखाचे क्षण प्रयत्ने त्यातुनी वेचायचे ?
अडथळे आले म्हणूनी का तिथे थबकायचे ?
की तयांना लंघण्याचे मार्ग चोखाळायचे ?
विपुल असते दु:ख म्हणुनी त्यात का डुंबायचे ?
मंथुनी भवसागरा सुखरत्न की मिळवायचे ?
करुण कविता प्रसवुनीया दु:ख का पोसायचे ?
नवरसांनी शिंपुनी की काव्य जोपासायचे ?
लागला कणसूर तरि का मैफिली त्यागायचे ?
घेउनी आलाप ताना की समेवर यायचे ?
भंगल्या स्वप्नासवे का भंगुनीया जायचे ?
छिन्न त्या स्वप्नावशेषां की पुन्हा जोडायचे ?
समजुनीया भार हे आयुष्य का कंठायचे ?
मानुनी वरदान की ते निशिदिनी घडवायचे ?
.... उल्हास भिडे (४-३-२०११)
गुलमोहर:
शेअर करा
अडथळे आले म्हणूनी का तिथे
अडथळे आले म्हणूनी का तिथे थबकायचे ?
की तयांना लंघण्याचे मार्ग चोखाळायचे
द्विपदी व कविता आवडली.
कवी प्रदीप निफाडकरांच्या गझलेचा मतला आठवला.
असेच का प्रदीप मी कसेबसे जगायचे (हा मतलाच आहे, मक्ता नव्हे)
छान आहे पण एरवीच्या
छान आहे
पण एरवीच्या कवितांपेक्षा एवढी नाही आवडली.
का कोण जाणे.
उल्हास, अप्रतिम कविता! अगदी
उल्हास,
अप्रतिम कविता!
अगदी खास जमलिये.
फारच प्रेरणादायी आहे.
फक्त ते >>लंघण्याचे>> आहे ते लांघण्याचे करशील का?
काका, सुंदर जमलिए
काका, सुंदर जमलिए कविता...
खूप आवडली...
सुंदर सुंदर मस्त...
सुंदर सुंदर मस्त...
सुरेख....
सुरेख....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/24092
दिवा!
(No subject)
खुप छान
खुप छान
आवडली... सगळ्या द्विपदी एकाच
आवडली...
सगळ्या द्विपदी एकाच आशयाच्या असल्यासारख्या वाटल्या...अर्थात हरकत काहीच नाही
छानच
छानच
लागला कणसूर तरि का मैफिली
लागला कणसूर तरि का मैफिली त्यागायचे ?
घेउनी आलाप ताना की समेवर यायचे ?
वा! खूप खूप आवडली कविता.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
अडथळे आले म्हणूनी का तिथे
अडथळे आले म्हणूनी का तिथे थबकायचे ?
की तयांना लंघण्याचे मार्ग चोखाळायचे >> अप्रतिम......
सुरेख... आवडली !!
सुरेख... आवडली !!
खुप छान. बेफिकिरशी सहमत.
खुप छान. बेफिकिरशी सहमत.