पोरगा कवा डगर झाला

Submitted by कल्पी on 16 March, 2011 - 10:27

शेंबुड पुसता पुसता
पोरगा कवा डगर झाला
एवढाल्या टांगा मारुन
कवा चालाले लागला
काय व पार्बते करलच नाही

दाढी मिशी फ़ुटली त्याले
आता म्या पायली
कौतुकानं माही मान उच उच झाली
पायजामा बी पहाना जी
आखुड आखुड झाला
पोरगं कवा आपलावाला
एवढा डगर झाला
नाही व धनी मले समजलाच नाही

आता त्याले तालुक्याले
कालेजात धाडु
मॊठे डगर किताबीचा ढिग घेउन देउ
साहेबावानी पोरगं
आपल दिसन तवा कानी
काय व पार्बते पोरगा आपला साहेब होईन कावं
एवढा डगर पोरगा आपला
खरच होईल कावं

धनी आता मले काही समजलाच नाही
पोरामागे आपणबी शहाणे होउन कावं
साहेबाचे आईबाप म्हणुन शोबु कावं
हाबी आपल्याले
माय बाप म्हणन काजी
लाजन का नाहीत त्या सोम्यावानी हा बी

नाही व पार्बते तसं नाही होणार
माह्या पोरगा तसा तरी आहे कावं
मायबाप सर्वे गणगोत
त्याच्या भवती पायजे ्ना
झाला डगर तरी
तो आपला पोरगाच असन
नको फ़िकर पार्बते नको बाता आता

चाल तयारीले लाग आता लाग
उद्यापासून तालुक्याले जाऊ
पोरासंगे तेथवरी जाउनच येउ
मग आलो गावाले का शेती पाहात राहु
धु-यावर उभ्या उभ्या मोटारीले पाहु
जाईन ते तवा हात हालवत राहु
कल्पी जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान Happy