बिजाने रुजावे वसंतात गावे

Submitted by कल्पी on 17 March, 2011 - 06:54

बिजाने रुजावे वसंतात गावे
नियमाप्रमाणे सारेच व्हावे

आसवांना का सांगावे कुणी
अश्रुनी नेहमी खारेच व्हावे

ज्या दिशेला गेलेत गंध
त्या दिशांनी वारेच प्यावे

रेषा हातच्या पाहुन झाल्या
भाग्यात नेहमी तारेच यावे

गेला तो क्षण वितळुन गेला
विसरुन मी आता धारेत जावे

पाऊसाने गावे गीत मनाचे
दिलाने दिलाचे दारेच व्हावे
कल्पी जोशी
१७/०३/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: