पिसे..

Submitted by के अंजली on 17 March, 2011 - 06:17

पिसे पिसे पिसे
लागे पावसाचे पिसे
आणि राधेच्या गं मनी
कृष्ण गोकुळीचा हसे

बाधा बाधा बाधा
झाली पावसाची बाधा
मनमोहनाच्या मनी
उभी गोड त्याची राधा

छंद छंद छंद
सर सरींचाच छंद
ओल्या मिठीमध्ये तिच्या
धुंद आनंदाचा कंद

शिरशिर शिरशिरी
उठे गोड तनुवरी
कृष्ण गालात हासतो
राधा कावरीबावरी
.
.
.
कृष्ण कृष्ण दाटुनीया
गालावरी लाज सजे
न्हाऊनीया चिंब चिंब
पावसात प्रित भिजे..!

गुलमोहर: 

सुबक, डौलदार आणि नितळ रचना......

(एवढी ही सुरेख रचना कशी काय वाचायची राहून गेली माझ्याकडून ???)