मी एक अश्वत्थामा
मी एक अश्वत्थामा
वाहतं मन घेऊन फिरणारा
जगाच्या कुठल्याश्या कोपरयात
समदु:खी शोधणारा
मनाच्या भळाळत्या जखमेवर
दवापाणी शोधणारा
आणि सतत गर्दीत असूनही
सलग एकाकी असणा्रा
नाही मी चिरंजीव
पण वाहतं मन आहेच
म्हणूनच ठरलो कदाचित
मी एक अश्वत्थामा
अश्रू वर अश्रू गुन्फुनी
केली वेदनान्ची माला,,,,,,,,,,
कुणी न ऊरले माझे
मी साद घालू कुणाला?????
ओंजळीत सूर्य घे,
एक नवी रात कर.
भंगल्या साऱ्या दिशा
श्वासातून एक कर.
रात्रीच्या चांदण्यात
स्वप्नांचा हात धर;
अधरांच्या ज्योतीवर
जरा माझी प्रीत धर!
- डॉ.सुनील अहिरराव
(C)copyright:all rights reserved.
सखे ग साजणी,
श्रावणातल्या हळुवार सरीप्रमाणे
तुझ्या पावलान्चा आभास......
अन तु येताच कन्ठात रोखलेला दिर्घ श्वास...........
सखे ग साजणी,
तु जेन्व्हा येतेस
मनात चलबिचल होते,,,,
ह्रिदयामधे सुखाची लहर येउन जाते.........
सखे ग साजणी,
तु जेन्व्हा बोलते
मन वार्यावर डोलते
आकाशातल्या घारीशी
ते स्वतः लाच तोलते...............
सखे ग साजणी
तु बोलताना वाट्ते
नुसते तुझ्याकडेच पहावे
अन् तु नसताना
तुझ्याच आठवणीत रहावे............
सखे ग साजणी
मन वेडेपिसे होते
तुलाच पाहण्यासाठी
उताविळ ते असते
तुझ्यात राहण्यासाठी............
सखे ग साजणी
तुझे हसणे जणू
हळुवार ऊमलणारी कळी
फुलपाखरा,पाखरा
नको घालू येरझरा
फुलावरी जा तु बस
चाख फुलाचा तु रस
कशाला उद्याची आस
हा हट्ट नाही बरा !!१!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
आज मिळेल सह्ज रस
उद्या लागेल तुझा कस
नको करु हव्यास
करु नकोस नखरा !!२!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
मन तृप्त करण्यास
घे फुलातील सुवास
तुला मिळेल मधु रस
बघ फुलावरी बसुनी जरा !!३!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
आला छान पाऊस
फुले उमळली गो॑डस
जाऊनी त्या॑च्या आसपास
घे जिवनाचा आन॑ द खरा !!४!! फुलपाखरा,पाखरा नको घालू येरझरा
नाव चालते नावीका रे
नाव चालते नावीका रे .............................
वाराभरली शीडे खुणावी, पैलतीराला निघाया रे ||धॄ||
जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती
रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे... | १ |
पल्याड जावे हीच आकांक्षा, कुणी मागता तुजला भिक्षा
धीराने तू वल्हवित नेशी, चिंता कसली रे.. | २ |
तरी कशाला चिंता वाहे, कर्मदरिद्री तया म्हणावे
अज्ञान्याला कशी कळावी, ओळख तुझी ही रे | ३ |
नाव चालते नावीका रे ................................
तू जवल आलास अन मी शहारले....
कारन ती वेलच तशी होती!
श्वास कन्थात रोखला गेला
कारन ती वेलच तशी होती!
तू बहकत गेलास
कारन्,,,,ती वेलच तशी होती!
आपन दोघेही शान्त होतो
कारन....ती वेलच तशी होती!
तू हलुच शिरलास कुशीत,,
मीसुद्धा घत्त कवतालले तुला......
प्रतीकार करने जमलेच नाही मला....
कारन ती वेलच तशी होती.......!!!!!!!
****************************
****************************
कधीकाळी अगदी लाजभिऊ असलेला
तुझा माझ्यातला पाऊस..
आपल्यातले ओलेते शब्द
कधी पुसट करत गेला ते कळलं नाही.....
तुझी देखणी बोटं माझ्या केसात फिरतांना
तो तुझ्या शब्दा-शब्दातून निथळायचा...
तो बरसेल तेंव्हा दुसर्याने भिजायचे
हा आपला जुनाच नियम
आता जरासा बदलून पाहू....
तू नकोच म्हणू तुझे जुने पावसाचे गाणे...
फक्त काही जुन्या वळचणीतल्या गोष्टी...
ओलेत्या पंखांची अस्प्ष्ट थरथर...
त्या चोचीत मी ..
माझे ओठ गळाबंद...तुझ्या श्वासांनी !!!
डार्क ऑरेंज शुभ्र सफेद वर जरा उग्रच वाटतो
मात्र तोच लाईट क्रिम वर डोळे थंड करतो
पहा बँकग्राऊंड बदलल्याने किती तो फरक पडतो
मी काहिसं असंच बँकग्राऊंड बदलायचं ठरवलयं,
तुमच्यात राहावसच वाटत नाही
भटक्यांमध्ये जावसं वाटतय
बँकग्राऊंड बदलून उठून दिसेल कदाचित,
मी काहिसं असंच ठरवलयं,
पिवळ्यात जरासं निळ मिसळलं तर हिरवं होतं
हे भकास पिवळं गवत त्या निळ्या आकाशाच्या
बँकग्राऊंडवर किती उसळलं तरी हिरव काहि होईना
इतक्यात कोणी पेटवल कि ते काळं होऊ पाहतय
जख्खं काळं म्हणजे कोणत्याच रंगाचा आता मागमूस नाही
असं कसं काळा हा काही मूळ रंग नाही
सगळे रंग कुस्करून टाकावेत
तेव्हा कुठे हा अंधार बनतो
केली नुस्ती तिन्गल तवाली..........अन जम्लच कधीतरी तर केला अभ्यास.......आता फार येते आथवन....हेच खरे कि,,,,,,,,,,,,,,,,,
शालेचे महत्व ति सोदुन गेल्याशिवाय कलत नाही,
तिचा निरोप घेताना मात्र ,
पावले वलतात घराकदे आनी मन काही वलत नाही!!!!