अजूनही ऐकतोय तुला आवडणारी चार गाणी
एखाद्या निवांत संध्याकाळी
आणि झोकून देतो स्वतःला भूतकाळाच्या गडद
अंधारात
आठवणींच्या चांदण्या मोजण्यासाठी...
मग बोलत रहातात फक्त श्वास
घरभर पसरलेल्या शांततेशी
आणि मन बधिर होऊन झेलत रहातं
त्या चांदणसरी...
छमकन समोर यायचीस
मैत्रीणींच्या घोळक्यातून
अन् धूसर होत जायचा सगळा आसपास
आतून-बाहेरून..
कँटीनकडे वळणारी तुझी पावलं
खिशातल्या खिशात
माझं गणित पक्क करायची
अन् क्षणाक्षणाला ओढणी सावरणारे तुझे हात
तर माझी घसरणारी नजर
सतत एकमेकांच्या विरोधात..असायची
ज्या वयानं तुला शहाणं केलं
त्याच वयानं सैरभैर झालेला मी
नि काट्यात गुंतलेला पदरही अलगद काढण्यात
सराईत झालेली तू...
एकाच छत्रीतून चालतानाही
आपल्या कक्षा कधी भिडल्याच नाहीत एकमेकींना
आणि माझा भिजणारा खांदा
सदैव हसत राहिला मला..
ते मंतरलेले दिवस
त्या स्वप्नवेड्या रात्री
सरल्यात कधीच
आणि आता उरलय फक्त....
हे गाणं.....
हे चांदणं...
आणि तुझ्या सयीने भिजणारा
हा खांदा...
----शाम
त्या स्वप्नवेड्या रात्री
त्या स्वप्नवेड्या रात्री
सरल्यात कधीच
आणि आता उरलय फक्त....
हे गाणं.....
हे चांदणं...
आणि तुझ्या सयीने भिजणारा
हा खांदा...
स्माइल?.. हे देवा संध्या
स्माइल?..
हे देवा संध्या बाईंना माफ कर त्याना काय म्हणायचय कळतच नाहीये...(मला)
व्वा...
ज्या वयानं तुला शहाणं
ज्या वयानं तुला शहाणं केलं
त्याच वयानं सैरभैर झालेला मी
नि काट्यात गुंतलेला पदरही अलगद काढण्यात
सराईत झालेली तू...>>>>
जियो...., कसलं क्लास लिहीलं आहेस भाऊ !!
सुंदर.
सुंदर.
सहि .....
सहि .....