तुझ्याकडे तर सगळंच आहे रे
ओघ आहे, वेग आहे
आभा आहे, प्रभा आहे
तेजाळती झळाळती
अमोघशी प्रतिभा आहे..
लय आहे , ताल आहे
साद आहे, नाद आहे
गुणगुणणारं एक
छानसं गुजगान आहे
हरखून जावं अशा
शब्दांची खाण आहे
माझ्याकडे काय आहे ?
इथे तिथे पडलेल्या
छिन्नविछिन्न भावनांशिवाय !
ओघळून सुकलेल्या
संततधार आसवांशिवाय !
तुला इच्छा झालीच तर..
माझ्या डोळ्यांत वाच ..!
Maitreyee Bhagwat
04 June 2011
वीणा बासनी बांधली तरी तरसल्या तारा
पाश मोकळे सोडावे अशा बरसल्या धारा
कीती दिसामाजी आज नभ धरेला भेटले
कशा कोरड मातीला आज गवसल्या गारा
चकोराचे चांदण्याशी काय असावे मागणे?
नभ मेघानी दाटावे वाट हरवल्या तारा
पशू पक्षी भीजलेले आडोशाला थांबलेले
कशा घरोघरी माइ घालू विसरल्या चारा
कशी तरूणपणात पाने गळाया लागली
वाचा फुटेल का कधी त्यांच्या लपवल्या मारा
आजकाल मी तपासत असते
आपल्या दोघांच्या स्वप्नांचे
अक्षांश, रेखांश...!
मान्य आहे मला-
की माझ्या झोपडीच्या
स्वप्नांमधे 'अर्थ' नसेल
पण तुझ्या महालाच्या
स्वप्नांत उणीपुरीसुद्धा
'माया' नव्हती !
हे तुला कळलं तरी पुष्कळ आहे!
गंमतच आहे सगळी...
त्याला माझाही...
अगदी माझाही मत्सर वाटावा?
ओके, अॅग्रीड...! मी आलो की ती सुखावते..
मी पाहीलेत, माझ्या आगमनाने...
तिच्या अंगोपांगी फुललेले निशिगंध,
मी अनुभवली आहेत, माझ्या ....
ओझरत्या स्पर्शानेही शहारून आलेली तिची गात्रे!
कधी कधी नकळत तिच्या हनुवटीवर रेंगाळते माझी नजर...
आणि मग ती हरवते...
तो संतप्त होतो, रुसतो, चरफडतो...
तिला म्हणतो,
तू अशीच आहेस...
तो आला की मला विसरतेस...., मला पण?
तुला खरं सांगू...
ती तर मला आवडतेच रे...
पण तुझा तो रुसवा पण मोहवून टाकतो,
प्रेमाचं असंच असतं बघ...
त्याला कुणाशीच वाटणी मान्य नसते...
मजसाठी योजियले जे, ते कार्य पुरे केले मी
आता मज प्रस्थानाचा आदेश मिळावा स्वामी
मंतरलेल्या ऊर्मींचे आभाळ पांघरुन झाले
चौर्यांशी लक्षांच्या या चक्रात संचरुन झाले
भोवळ येते प्राणांना, आवेग विरावा स्वामी
का भ्रामक अनुबंधांच्या वचनात व्यर्थ गुंतावे?
जाणीव दुरावत जावी अन् अखेरचे थांबावे!
थकलेल्या आसक्तीचा उद्धार करावा स्वामी
उसळत्या भोग-योगाच्या उत्कटल्या आतुर वेगा
सांभाळावे, अन् घ्यावी झेलून शिरावर गंगा
पाताळ गाठण्याआधी आधार मिळावा स्वामी
आगळा संवाद
गोरा कुंभार पायांनी मळतो माती,
गरगर फ़िरते चाक घड्यांची तिथे रास.
जगदीशाच्या नांमाचा करून उद्घोष,
कांतितेज अन् दरवळतो संतोष.
तन्मयता ती दिसे वेगळी प्रत्येकाला,
कुणी म्हणे शरण खरा परमेशाला-
कलावंत तो सेवेत कलेच्या बुडला !
घडे मोजता दिसे वेगळी पत्नीला !
पत्नी केवळ कुरतडते नखाने नाती,
मनीं पुसते -"कां केली मम आयुष्याची माती ?
सर्व घड्यांची रिक्त ठेवुनी पोटे- खंत कशी ना वाटे ?"
घडता अग्निदिव्य मांजर-पिल्लांचे वदला गोरा--
"उमगे सार्थक हेच जीवनाचे.
घडे रिकामे नसते तर नसती जगली ती
दैव नव्हे किमया ही कष्टांची !"
आज परत एकदा,
तळहातावरच्या रेषा,
पुन्हा पुन्हा तपासल्या.
तुझी रेषा मात्र,
पुसट दिसेनाशी झाली होती.
ह्मम्म्म..
त्याचं काय जातंय?
हातावर रेघोट्या ओरबडायला?
आणि दुसर्यांची नशीबं लिहायला?
सळसळत्या पात्यानं तुझी रेषा,
छेदून गेली कधीच माझ्या हृदयाला.
रक्तरंजीत हाताकडे पाहत,
मी ही त्याला आव्हान दिलं.
बेटा,
तू लाख कलाकुसर करशील,
माझं भविष्य लिहिण्यात.
पण एक गोष्ट विसरलास,
शेवटी हात तर माझाच आहे ना?
आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर !
-सत्यजित
रोज झाकळुनी येतं
रोज सपानं फुलतं
मला वाकुल्या दावितं
रोज आभाळं पळतं
दूरं वावरा मधुन
हाक मातीची ऐकतो
कसं द्यावं तिला काही
मीच भीक रे मागतो
माझ्या डोळ्यांचा पाऊस
त्यो बी भिजविना रानं
आता तूच सांग देवा
कसं पेरावं बीयाणं?
श्वास जातो श्वास येतो
अशी कणगीची तर्हा
हंबरुन गोठ्यामधी
गुरं मागत्यात चारा
देवा सुखानं का कोणी
घेतो गळ्यामधी फास?
कशी याला कीव नाही
कसा तुझा हा पाऊस?
रिती पोटांची खळगी
सांग, कशानं बुजावी?
तूच दिलीस ना भूक
आता येतो तुझ्या गावी
अयुश्या मधे माझे काहि म्हन् न्या सरखे राहिले नहि,
जे मिलाले ते सामभाले परियनत अयुशय च राहिले नहि य्