सांजसंध्येचा हात घट्ट पकडून
तू निघालीस तेव्हा..
तुझा तो लाजरा पदर
माझ्या हातून सोडवताना
सहज म्हणालीस.. हि वेळ नाहीये रे वेड्या !
तेव्हापासून आजपर्यंत फक्त
असंख्य वेळेच्या वेड्या संज्ञा आणि तू,
माझ्या शब्दात कितीदा मिरवल्या मी..
कितीतरी वेळा चांदण्यांचं आकाश,
बेभान सरींचा तो गलका,
रंगवला असेल तुझ्या शुभ्र पदरावर..
पण माझ्या तळहाताचे ठसे,
केवळ किनारीवरच दिसतील तुला..!
ते पुढे सरकावेत असं कितीही वाटलं तरी,
तुझ्या ओठांवरच्या त्या 'वेळेच्या' वेशीचं लांबणं,
तेव्हापासून तु अडवून धरल्याचं आठवतयं मला...
काल सहज ती अडवणूक..
लांघावी एकदाची असं ठरवूनच
मी दाराची चौकट ओलांडली तर..
अंगणात कोमेजल्या कळ्यांच्या,
आसवांनी मुसमुसत..
दु:खद घटनांचे संकेत दिले अन ..
वार्याने तुझ्या त्या पदराची
कोपरचिंधी तळहाती ठेवली..
'वेळ निघून गेल्याचे' ते
अंखड संदर्भ जुळवताना
मी असंख्य तुकड्यात
शेवटापर्यंत पांगत गेलो एवढंच !
०० नादखुळा
सुंदर शेवट का रे असा ? पण
सुंदर
शेवट का रे असा ?
पण लिहीलय सुंदर
टुकार
टुकार
शेवट असा का?
शेवट असा का?
मला जे मांडणं अपेक्षित होतं
मला जे मांडणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे हा शेवट असाच आहे. वेळेच्या जाणीवा यावर लिहिलेली खूप जुनी कविता आहे हि. थोडासा निगेटिव्ह शेवट असेलही. धन्यवाद.
'वेळ निघून गेल्याचे' ते अंखड
'वेळ निघून गेल्याचे' ते
अंखड संदर्भ जुळवताना
मी त्या तुकड्यातून
सुरूवातीपर्यंत पांगत गेलो एवढंच !
असं म्हणायचं आहे काय?
ह्म्म्म्म, असं होतं खरं
ह्म्म्म्म, असं होतं खरं बर्याचदा
आवडली रे....
आवडली.
आवडली.
hi pan avadli re nadyaa.
hi pan avadli re nadyaa.
आभार्स. विशालभौ असंच होतं रे.
आभार्स. विशालभौ असंच होतं रे.
होइल, होइल तसंही होइल...,
होइल, होइल तसंही होइल..., कदाचित पुढच्या जन्मी
कोपरचिंधी हा शब्द आवडला.
कोपरचिंधी हा शब्द आवडला.
मलापण कोपरचिंधी आवडला..
मलापण कोपरचिंधी आवडला..
धन्स. नचिकेत, ठमा. विशालभौ
धन्स. नचिकेत, ठमा. विशालभौ
मस्तय कविता
मस्तय कविता
बरी आहे!
बरी आहे!
अर्थ उलगडला तर सुंदर, नाही
अर्थ उलगडला तर सुंदर, नाही उमगली तर अवघड.
कोपरचिंधी आवडली.
>> कितीतरी वेळा चांदण्यांचं आकाश,
बेभान सरींचा तो गलका,
रंगवला असेल तुझ्या शुभ्र पदरावर.. >>>
नादखुळायस अगदी
चांगलं मांडलंय, पण शेवट एकदम
चांगलं मांडलंय, पण शेवट एकदम वेगळ्या वळणाने झालाय.