हस्तरेषा - एक कविकल्पना
नवजात शिशूच्या हातांच्या तळव्यांवर,
बरसात चैतन्याची- अविरत धारा सूक्ष्म कणांची,
हात दोन्ही उंचावून झेलते शैशव, सुखसंपदा त्याची !
टकमक-टकमक दृष्टी, हरपून भान_
निरखते-वैभव, अन् ,रुतली तयांची स्मृति.
तळव्यांवरती ओघळले -- बरेच सारे निसटुन गेले.
पाऊल खुणा त्या ओळखून
सांगतो ते येतील कधी परतून,
संपत्ती कि आपत्ती- सदैव रहावे जपून !
नित नवीन अनुभव,रुळल्या त्या वाटेवरती,
ओघळती रेषांच्या जाळ्यांवरती,
निसटले-अडकले कांही,अर्थ-बोध खास देती !
पाहून कोष्टक रेषांचे, भविष्य वर्तविणे सोपे,
माझी दु:खं माझ्याकडेच
शांत असतात.....
दुसर्याकडे स्वत: चं हसं
करून घेतात!
माझी दु:खं माझ्याकडेच
शांत असतात.....
दुसर्याकडे स्वत: च हसं
करून घेतात!
मी उभा होतो सज्जात
वाट तुझीच पहात
वार्यावरचा धुंद गंध
सांगुन गेला तुझ येण
गोर्या नितळ कांतीच
गाली गुलाबी हसण
कपाळा वरच्या बटेच
इकडून तिकडे रेंगाळण
पापण्यांमधून डोळ्यांच
हळुच चोरुन बघण
सार काही होत होत
जीवाला घायाळ करण
तू गेलीस माझ्या समोरुन
तेव्हा वळून नाही पाहीलस
जीवास लागला माझ्या घोर
आज अस कस हे घडलं
दुसर्या दिवशी खाली उतरुन
नीट निरखल तुझ्याकडे
तेव्हा दिसले पदरामागचे
काळे मणी दोर्यातले
काही तीव्र ...
... मंद्र काही !
मनाच्या गर्भातले दिवे ...
कवितेच्या कातर-क्षणी
उजळून टाकतात
भोगून संपलेल्या
अस्तित्वाच्या
पल्याडचे काही ...
काही अर्ध ...
... स्पष्ट काही !
काल सहज उन्हासवे,
खूप गप्पा मारल्या..
तुझ्या ओल्या बटांमधून नितळणार्या,
त्या ईवल्याश्या थेंबातून आरपार व्हायला
त्यांनाही आवडायचं म्हणे..
तळ्यातली फुले वेचताना,
उन्हही तुझ्या गाली स्पर्श करण्याची
एकही संधी सोडत नव्हते म्हणे...
पाऊस पडून गेल्यावरही,
एखादा किरण तुझ्या नजरेसमोर,
सतत असायचाच कि..
बहुदा तोच तर तुझ्या डोळ्यातल्या,
इंद्रधनुष्याचं गुपित असावं हे हि आत्ताचं कळलं..
अचानक उन्हे ताडकन उठली तेव्हा,
काय झाल? मी विचारलं..
तेव्हा ती म्हणाली..
तुझं नि माझं दु:खणं आता सारखंच रे,
दिवस सावलीचं सुख शोधण्यात जातो,
सांजेच्या आठवणींचा छळ नकोसा होतो,
पुसणारे नसताना कोणी अश्रू ढाळायचे कशाला
पतंग नसताना ज्योतीने जीवन जाळायचे कशाला
सावलीतले भास उशाशी नको नको ते चंद्र चांदणे
पोळुन निघतो चांदण्यात मी ऊनही टाळायचे कशाला
काटेरी नशीबाला घेउन काटा जपतो हळूवार मन
कोमेजुन जाताना कळते कुंपण वाळायचे कशाला
फुटलेल्या काचेत विखुरला प्रेम तुझ्यावर करणारा
आरशात मी मला दिसेना इतके भाळायचे कशाला
प्रमाणपत्रे देउन जातील अर्थ का कधी जगण्याला
मनातुनी ओठावर येते पुस्तक चाळायचे कशाला
मयुरेश साने ...३१- मे -११
कै. डॉ. दत्तात्रय भागवत यांच्या कविता असलेल्या आणि आमच्या सुचेतानंत प्रकाशनचा अंशतः सहभाग असलेल्या सोनसडे या कवितासंग्रहाचे प्रकाशन
दिनांक २ जून २०११ रोजी सायंकाळी बरोबर ६ वाजता
कर्नाटक हायस्कूल (एरंडवणे, छत्रे सभागृहाजवळ, पुणे) येथे वरच्या हॉलमध्ये
ज्येष्ठ कवी श्री. सुधीर मोघे आणि प्रसिद्ध अभिनेते/कवी सौमित्र (किशोर कदम), तसेच युवा संगीतकार केदार पंडीत
यांच्या सन्माननीय उपस्थितीत होणार आहे.
त्याचप्रमाणे,
अख्खा माणूस आपल्यासमोर.. आपादमस्तक!
- उभा असतो! वाच म्हणतो 'उघडं पुस्तक'.
आम्ही फक्त चाळतो पानं, वरच्यावरती बघतो काही
तसंच सारतो बाजूला अन् म्हणतो : 'काहीच कळत नाही!'
कळावं ही इच्छाच नसते, नुसतीच हवी असते करमणूक
नुसताच रमवायचा असतो जीव आणि घटकाभर सुख
अक्षर अक्षर ओळ न् ओळी पानं करत असतात फडफड
'ह्यालादेखील कळू दे ..' ही पुस्तकाची असते तडफड
कांही .. काही .. कळत नाही, समोर! तरी दिसत नाही
आम्ही पानं चाळत बसतो, वाचण्यासाठी फुरसत नाही!
विटून जातं मन त्याचं, पुसट होते शाई
आता वाचू म्हटलं तरी वाचता येत नाही!
(व्हॅन गॉग.. पोस्ट इंप्रेशनिस्ट कलाकारांमधलं खूप महत्वाचं नाव. त्याच्या रंग, रेषा जशा भुरळ घालतात तसाच त्याच्या आयुष्याचा प्रवासही. स्टारी नाईट्स नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या ३ कलाकृती. Starry Night Over the Rhone, Cafe Terrace at Night आणि The Starry Night)
------------------------------------------------------------------------------------

निळेपणाच्या छटा नवीन नव्हत्याच मला कधी,
आठवणी येतात त्याच्या कितीतरी आधीपासून वाहतेय निळाई श्वासात..
पण तू अंधार रंगवायला काढलास तेव्हा
कोणाला वाटलं होतं अंधार पण असा..