शैशव...

Submitted by विशाल कुलकर्णी on 30 May, 2011 - 03:42

कसा आहेस?
आज काल भेटत नाहीस पुर्वीसारखा...
त्याने खांद्यावर हात टाकत विचारलं
तसा सुस्कारलो हलकेच...
एक स्तब्ध नि:श्वास टाकत म्हणालो,
वय झालं रे आता...
नाही जमत पहिल्यासारखं वारंवार यायला,

वेडा की काय?
अरे असं वय वगैरे कधी असतं का ?
त्या व्याधी देहाच्या...
मनाच्या हिरवेपणाला कसलं आलय वय?

कायरे...
आपल्या भेटीला स्थळकाळाची बंधनं कधीपासून पडायला लागली?
आणि तूला कुठेही यायची किंवा जायची गरजच काय?
अलगद, अगदी हळुवारपणे, पण मनापासून
आपल्याच मनाच्या कुठल्याही कोपर्‍यात डोकवायचं...

आणि घालायची मला एक साद...
बघ तुझं ते 'चिरतरुण' शैशव धावतच येतं की नाही!

विशाल...

गुलमोहर: 

त्या व्याधी देहाच्या...
मनाच्या हिरवेपणाला कसलं आलय वय?

अलगद, अगदी हळुवारपणे, पण मनापासून
आपल्याच मनाच्या कुठल्याही कोपर्‍यात डोकवायचं...

आणि घालायची मला एक साद...
बघ तुझं ते 'चिरतरुण' शैशव धावतच येतं की नाही!

....हीच तर खरी कविता !! नाही तर कविता म्हणजे आणखी काय वेगळं असतं याहून ??

कधी कविता लिहिता न येवूनही जेंव्हा तिला उत्स्फूर्त दाद दिली जाते तेंव्हा ती दादही एक भावसमृद्ध कविताच असते........ मुक्तछंदातली....... Happy

विशाल मस्त कविता!

अलगद, अगदी हळुवारपणे, पण मनापासून
आपल्याच मनाच्या कुठल्याही कोपर्‍यात डोकवायचं...

आणि घालायची मला एक साद...
बघ तुझं ते 'चिरतरुण' शैशव धावतच येतं की नाही!>>>>>>>>>>>>>>>> खरच डोकवायला हवच !

हिरवेपण या शब्दाला एक भिन्न व प्रचलीत छटा आहे ती सोडल्यास आशय अतिशय आवडला>>>

मराठी भाषा आहे देवा, वाकवाल तशी वाकते आणि समजुन घ्याल तितकी आणि तशी समजते. Wink
मनःपूर्वक आभार Happy

मस्त! 'चिरतरूण शैशव'....! जन्म, मृत्यू आणि नाते यांना कधी साद घालावी लागते का? कधी ते आपल्या कुशीत येतात आणि कधी आपण त्यांच्या कुशीत अलगद जातो; ते पण साद न घालता, कळतदेखील नाही!

!!

>> वय झालं रे आता... >>
तुझं नाही आमचं झालंय वय...
>> देवा >> बालगंधर्व पाहून झाला वाटतं!
रच्याकने, कसा आहेस विशल्या ?? Happy

पल्ले मी मजेत गं..........., तू बोल?
'बालगंधर्व'ची पारायणे झाली गं Happy
साधना धन्स !