हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १७

Submitted by बेफ़िकीर on 21 May, 2010 - 03:49

प्रेयसीचा पहिलाच रुसवा! तो आपण काढायचा असतो हेही माहीत नव्हते दिपूला. त्याला इतकेच वाटत होते की ही अशी चमत्कारीकपणे का बोलतीय? पण तिच्याशी बोलायची संधीच मिळत नव्हती.

एक दिवस सगळे जण ढाब्यावर दैनंदिन लढाई करत असताना सीमाकाकू काही कामानिमित्त शिरवाडला गेली अन काजल घरात एकटीच आहे हे पाहून दिपूने तिच्या घरात प्रवेश केला.

काजल - क्या???
दिपू - कुछ नय..
काजल - तो इधर कैसे आगया?

दिपू मख्खपणे उभा राहिला.

काजल - काम नय हय? ढाबेपे?... ज्जा.. अबूचाचा बुलायेंगे..

ती लाजून किंवा थट्टा म्हणून 'ज्जा' म्हणत नाही आहे हे समजण्याइतका तो नक्कीच हुषार होता.

दिपू - तू..
काजल - क्या??
दिपू - ऐसे कैसे बोली?
काजल - क्या?
दिपू - वो.. टहेरेके कदम के लडकेके साथ शादी बनायेंगी करके??
काजल - क्युं??
दिपू - ......
काजल - तुला काय पंचायती नाही त्या?

भयंकर दुखावल्यासारखे दिपूने काजलकडे बघितले. ती आपली त्याच्याकडे पाठ फिरवून काहीतरी निवडत बसली होती.

दिपू - अपना ठर्‍या हय ना?
काजल - क्या?
दिपू - शादी करनेका??

काजलने तीव्र नजर करून गर्रकन मान फिरवून मागे पाहिले..

काजल - दिमाग खराब हय? शादी? तुझसे?
दिपू - तूच बोली ना.. अबी यशवंतकाकाको नय बतानेका.. दादी बोली तो ठीक हय करके..
काजल - भूल जा सब..
दिपू - कायको??
काजल - कायको म्हणजे? इच्छा माझी...
दिपू - असं कसं??

आता काजल उठून उभी राहिली. दिपूकडे तीव्रपणे बघत म्हणाली..

काजल - असं कसं? तू कोण विचारणार?
दिपू - अपन दोनोने वादा किया ना एक दुसरेसे?
काजल - वादाबिदा करनेकी अबी उमर नही हय तेरी.. ज्जा.. कामपे लग जा..
दिपू - वो कामका मय देखलेता.. तू मत समझा... तेरेको क्या होगया इतना बोल..
काजल - तू हय कौन मेरा? तेरेको कायको बोलेंगी मै?
दिपू - लेकिन.. क्या हो क्या गया अचानक? चांदवडसे आतेतक तो अपन वहीच बात कररहे थे..
काजल - भूल जा वो बाते.. मै तेरेसे दो साल बडी हय.. अपनी शादीका खयालबी नय आनेको होना अब.. मै पढेली हय.. खेतीबाडी करनेवाले लडके आरहे मेरे वास्ते.. तू ढाबेपर काम करनेवाला एक छोटा लडका हय.. जिसको पगार बी नय मिला अबीतक... शादी की उमरबी नय तेरी.. मा बापका पता नय..

या अप्सरेसारख्या दिसणार्‍या मुलीची जीभ मिरची झोंबावी तशी चालते हे दिपूला नवीन होते. अत्यंत अपमानीत अन विषण्ण चेहरा करून तो तिच्या खोलीतून निघाला. जाताना मात्र त्याने तिला सुनावले.

दिपू - मा बाप का पता हय! मा महुरवाडी मे है..तेरेको ... तू उसकी कोईबी नय हय फिरबी.. तेरेको बी अपनी बच्ची समझकर प्यार किया उस दिन... जब अपन गये थे.. बाप मरगया हय.. इसमे मरी गलती नय.. मा बाप गरीब थे.. मै सौतेला था.. इसलिये किसीने सिखायाच नय.. लेकिन फिरबी इंग्लीश आता.. पढनेको आता.. लिखनेको आता.. येच.. मनीषाताई आयी हय ना इधर?? इसीनेच सिखाया सबकुछ.. इलेक्ट्रिक का काम आता.. पुरा ढाबेका खाना मै पका सकता.. पका सकता क्या? पकाताच हय.. जितनी चीजे तेरेको लडकी होकेबी पकानेको नय आती उतनी मै पकाता...

तू दो सालसे बडी हय.. लेकिन भुलोबाको मेरेच साथ आयी थी.. महुरवाडीकोबी.. तेरी शादी की उमर हय.. मेरी नय हय.. लेकिन.. फिरबी.. समीरको अ‍ॅक्सीड्यांट हुवा तब.. पत्थर के पीछे तुने..मेरेच.. अब वो बोलनेकी बातां नय हय.. लेकिन.. तुने.. और वो.. सुबह जीपमे चांदवड गये अपन तब भी.. अगर तू बडी हय.. तो... फिर वो सब कायको?? सबको भैय्या पुकारती हय तू.. मला का नय??

और.. मै ढाबेपे काम करताय.. मला काय माहिती??.. मी इथे का काम करतोय?? तुझे आईबाप तुला इथे घेऊन आले.. मला.. मला पळून आना पडा.. नय तो मारदेते वो विजूबिजू मेरेको...

अनाथ होके..बी.. मै आज.. सबको अपनासा लगताय.. सब काम कर सकताय..

तेरेमे बदल होगया हय.. जाता मै.. लेकिन..

इतके बोलेपर्यंत त्याच्याकडे पाठ करून उभी असलेल्या काजलच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते. ते त्याला दिसू नये म्हणून त्याच्याकडे पाह करूनच ती म्हणाली...

काजल - तेरेको क्या.. वो.. अंजना दीदीभी प्यार करतीच ना?? .. मेरी क्या जरूरत हय..???

प्रकाश! ....लखलखाट झाला ज्ञानाचा! अरेच्चा! हा प्रॉब्लेम आहे होय??

दिपू - अंजना?
काजल - फिर?
दिपू - तेरेको क्या पता?
काजल - मतलब.. करतीय ना प्यार वो बी??
दिपू - प्यार? वो बडी औरत हय.. तेरेसेबी पाच सात साल बडी होयेंगी..
काजल - फिरभी तिच्या घरी जातो.. काशीनाथचाचा नसताना.. हो ना??
दिपू - घरी जातो?
काजल - तुला वाटलं मला नय समजलं??
दिपू - काय समजलं?
काजल - उसने तेरेको अंदर खीचा.. फिर बीस एक मिनीटके बाद बाहर आया तू चोरके जैसा...

दिपूने खिन्न होत मान खाली घातली. झालेला प्रकार खरा होता हे त्याला व्यवस्थित माहीत होते. आपले प्रकरण इथे कळलेले आहे हे समजल्यावर तो खूपच निराश झाला होता. त्याला एकच संधी होती. ते म्हणजे दार लावून घेतल्यावर आत काय झाले हे काजलला माहीत असणारच नव्हते. त्याबाबत काहीतरी वेगळेच सांगता येते का याचा तो विचार करत होता. पण मुळात काजललाच जर कुणीतरी किंवा खुद्द अंजनाने काहीतरी सांगीतलेले असले आपल्याला बदनाम करायला तर? मग आपली चोरी पकडली जाईल!

या प्रसंगात तीक्ष्ण बुद्धी काम देत नव्हती. काहीतरी करायला हवे होते. शेवटी दिपू परिस्थितीला शरण गेला. तेच त्याला योग्य वाटले. सगळे खरे सांगून टाकायचे.

दिपू - खरं.. ऐकायचंय का??
काजल - नय.. जा तू.. बुरी आदते लगगयी हय ये उमरमे.. शादी के लायक नय तू..
दिपू - उसीनेच फसाया हय मेरेको..

काजलच्या डोळ्यातील निर्माण झालेले आश्चर्याचे भाव तब्बल पंधरा मिनीटे दिपू बोलत होता तोपर्यंत वाढतच गेले होते..चार पाच वर्षापुर्वी झालेला प्रसंग तर काजलच्या दृष्टीने अतर्क्यच होता.

दिपू - लेकिन.. कल.. मेरेको.. उस वक्त.. तेरी याद आयी.. मला समज्या.. अपुन गलती करतोय हे बरोबर नय.. काजलवर..

काजल - काय?? .. काय काजलवर?? बोल ना.... दिपू.. बोल ना...

दिपू - काय नय.. जाता मै.. भोत काम हय ढाबेपे.. ढाबेपे काम करनेवाला लडका हय मै.. पगारबी नय मिलता अबीतक.. तेरेसे छोटा हय.. मा बाप का पताबी नय.. यहा रुकेंगा तो पद्या चिल्लायेंगा.. जाता मै..

ताड ताड बाहेर चालत गेलेल्या दिपूचे शब्द काजलच्या कानात घणाच्या घावांसारखे शिरत होते... पुन्हा पुन्हा.. आणि.. त्याचा परिणाम म्हणून तिच्या डोळ्यातून सरींवर सरी ओघळत होत्या..

आणि दुसर्‍या दिवशी सगळेच्या सगळे सकाळी नाश्त्याला बसलेले असताना..

मनीषा सर्वांदेखत म्हणाली..

मनीषा - काजलची शादी ठरवण्यासाठी जाणार होते ना यशवंतकाका तुम? नय गये??
यशवंत - जानेकाय ना.. क्या सीमा.. आजच जाके आते क्या??

दिपू डोळ्याच्या कोपर्‍यातून काजल़कडे बघत होता.. कानांत प्राण आणून ऐकत होता..

आणि तितक्याच शांतपणे काजल म्हणाली..

काजल - आप लोगोंको चेष्टा खरीच वाटते.. उससे कैसे शादी करेंगी मै?? नापसंद किया वो लोग मेरेको...

कोणत्याही स्टँडर्डने काजल कुणालाही नापसंत असू शकत नाही हे ढाब्यावरील मन्नूलाही समजू शकत होते. अवाक झालेला यशवंत अन सीमा तिच्याकडे बघत असताना अबू बोलला..

अबू - इतनी काली.. फटेले सूरत की, सफेद बालोंकी, मोटीकी मोटी लडकी तो नापसंदच होयेंगी ना?? पसंद होनेके लिये लडकी देखनेमे जरा तो अच्छी चाहिये की नय?? ये चिपकली कैसे पसंद होगी??

हा विनोद होता हे केवळ अबू बोलत होता म्हणून नाही तर सरळ सरळ उदाहरणच समोर होते यावरूनही समजू शकत होते.

नाशकापर्यंत फिरलात तरीही अन उलटे मालेगावपर्यंत चाळणी घेऊन निघालात तरीही ..

काजलसारखे असामान्य लावण्य असलेली मुलगी मिळणार नाही हे कुणीही मान्य केलं असतं..

अन अबू म्हणत होता मुलगी दिसायला जरा तरी बरी हवी की..

अजिबात वाईट वाटले नाही कुणालाही.. यशवंत अन सीमासुद्धा पोट धरून हसले. काजल गाल फुगवून अबूकडे बघत बसली.

अबू - क्या देखती? आईना देखाय क्या कबी?
काजल - मै कायको देखू? आपच देखो..
अबू - मै कायको देखू? शादी तेरी.. आईना मै देखू? कायको नापसंद किया तेरेको?
काजल - उनसेच पुछो..
यशवंत - पण आजी काय म्हणाली?
काजल - कुछ नय..
सीमा काकू - कुछ नय मतलब??
काजल - आजी थीच नय वहा..

आजी थीच नय वहा??? म्हणजे काय म्हणते ही? गेली होती घरी.. जिथे आजी राहते.. तिथेच स्वतः कदम बघायला येणार होते.. इथे परत आल्यावर म्हणाली की त्यांनी नापसंत केलंय.. अजून मुलगी तशी लहान आहे म्हणून आपण जास्ती खोलात शिरलो नाहीत.. आता बोलता बोलता म्हणतीय की आजी नव्हतीच तिथे?? म्हणजे? मग भेटली कुठे ही कदमांना?? यशवंतच्या मनात एका क्षणात हे विचार आले. काजल बोलता बोलता फसली होती हे दिपूला समजले होते.

यशवंत - आजी थीच नय मतलब? कुठे भेटले कदम?
काजल - महुरवाडी..

पद्यानेसुद्धा ऑम्लेट्स थांबवून मागे वळून काजलकडे पाहिले. सगळीच खाणारी तोंडे विचारात पडून काजलकडे बघत होती. दिप्या महुरवाडीचा आहे हे सगळ्यानाच माहीत होते.. पण महुरवाडीला काजल कदमांना भेटली या प्रकारात दिपूही तिथेच असणार हे फक्त चाचाच्या लक्षात आले अन अबूच्या..

चाचा - ये दिप्याबी होयेंगा फिर?? बघण्याच्या वेळी?

काजलने आवंढा गिळला. दिपूने आपली बुद्धी ऐनवेळेस चालवली.

दिपू - मै इसको वहीच कहरहा था चाचा, भोत झगडा हुवा हमारा रास्तेमे..
चाचा - कायको??
दिपू - ये उधर आयी और मेरेको बतायाच नय.. मै अपना घरमे बैठेला था.. दुसरे दिन बसस्टँडपे बोलतीय 'मै कल म्हौर्वाडीच आयी थी'

दिपू काजलच्या बायकी आविर्भावात अन बायकी आवाजात माना वेळावत म्हणाला. सगळे हसू लागले. काजलही हसू लागली. मात्र दिपू अन काजलचे हसणे वेगळ्याच कारणासाठी होते. अबू मात्र अजून विचार करत होता.

अबू - लेकिन.. आजी थीच नय तो.. तू गयी किसके साथ म्हौर्वाडी...

हा प्रश्न खरे तर आपल्याला सुचायला पाहिजे हे सीमा अन यशवंत दोघांनाही वाटले. सगळेच काजलकडे बघू लागले.

काजल - बापूचाचा आये थे ना.. टहेरेसे..
यशवंत - आजी क्यों नय आयी??

आजी पडल्याचे मुद्दाम सांगीतलेले नव्हते तिने. ते सांगीतले तर बाबा धावत टहेर्‍याला जातील अन वाट्टेल ते बोलणारी आजी 'हिचं लग्न दिपूशी करून टाक, मी जावयाचा मान म्हणून सव्वा पाच रुपये दिले आहेत' म्हणून सांगून टाकायची. झाली का पंचाईत? अजून या दिपूला पगार नाही की कुणी सिरियसली घेत नाही. नवीनच नाटक व्हायचे...

काजल - आजी नय आयी..
सीमा - का?
काजल - टहेर्‍याचे पावणे महुरवाडीलाच थांबले म्हणून चिडली
अबू - अब लडकीवाले हय तो थोडा इधर उधर तो सयनाच पडेंगा ना??

दिपूने गप्प बसायला हरकत नव्हती. पण तल्लख मेंदू.. वापरायचा आपला.

दिपू - आपने इसकी आजी देखी नय अबू..

यशवंत अन सीमा आता हा काय सांगणार हे कान टवकारून ऐकू लागले.

अबू - मै किसीकीच आजी नय देखता.

पहिल्यांदाच नाश्त्याला सगळ्यांबरोबर बसलेली वैशाली सुद्धा हस लागली.

दिपू - वैसा नय..
अबू - वैसा क्या.. कैसाच नय देखता..
दिपू - अरे सुनो तो अबू..

हसणे थांबल्यावर दिपूने बॉम्ब टाकला.

दिपू -चाचीको वैजयंतीमाला कयती हय वो..

जरा कुठे ऑम्लेट घशात जात होते.. ठसके लागले दोघा तिघांना..

सीमाकाकू आपली डोळे वटारून हसायला लागली.

यशवंत - तूने देखा क्या दादीको?
दिपू - फिर?? बोली डागदरका नाम लिया तो गावाचं शमशान करून ठिवंल..

कुणीच हासलं नाही.

यशवंत - डागदर कायको??

आता सांगणं आलं.

काजल - वो.. कुछ नय.. थोडासा उधरच गिरगयी.. मैने कहा.. चल डागदरके पास.. तो उसको आनाच नय था..
यशवंत - लागलं का?
काजल - फार नय.. संध्याकाळी बरी बी झाली..
दिपू - और इसको निरूपा रॉय और हेलन कयती..
अबू - कहां निरूपा रॉय.. कहा हेलन??

अबूने हे वाक्य बोलताना निरूपा रॉयच्या वेळेस चाचाच्या बायकोकडे हात केला अन हेलन म्हणताना चाचाकडे! चाचाने गंभीर नजरेने अबूकडे पाहिले. पद्याही मागे वळून हसत होता.

अबू - किट्टू.. तू दोन तीन सालसे हस्याच नय .. नय क्या?? अब गाल फटेंगे हसेंगा तो..

चाचा गंभीरच होता. तो उठला अन प्लेट ठेवायला गेला. तिथे झरीनाचाचीही त्याच्याकडे बघत हळूच पदर तोंडाला लावून हसत होती.

अन अचानक हसता हसता दिपूचे लक्ष अंजनाकडे गेले. अंजना त्याच्याचकडे बघत होती.

च्यायला! लक्षच नव्हतं आपलं! बरं झालं म्हणा.. लक्ष नव्हतं ते.. आता द्यायचंच नाही लक्ष हिच्याकडे..

पण असं होतंय थोडंच? पुन्हा पुन्हा दिपूचे लक्ष तिच्याकडे जायला लागले.

बाळ्याचे अन मनीषाचे नवीन लग्न झालेले होते. ते आज नेमके शेजारीच बसले होते. अन बाळूच्या दुसर्‍या बाजूला सीमाकाकू!

अबू - ओय बाळू.. थोडा हटके बैठ उससे.. बुरा लगेगा

खरे तर बाळू मनीषाच्या शेजारी असला तरीही चांगले अंतर मेंटेन करूनच होता. तरी अबू चेष्टा करतोय म्हंटल्यावर आणखीन चेष्टा नको व्हायला म्हणून किंचित सरकला.

अबू - अबे सीमाभाभीसे हटके बैठ कहरहा मै.. मनीषा को बुरा लगेंगा. तू मनीषासेच हटके बैठरहा हय?? बीवी हय ना तेरी? उसको तो चिपककेच बैठना मंगता..

सीमाकाकूला गणपतचाचाची बायको आल्यापासून अबूच्या असल्या थट्टेची सवय झाली होती. कारण ते दोघे एकमेकांची काहीही थट्टा करायचे. त्यामुळे सीमाही आता मोकळे बोलू लागली होती अन यशवंतही!

अबूच्या या विनोदावर काशीनाथही हसला. मात्र गणपतचाचा अजूनही गंभीरच होता. मनीषा मात्र ओशाळली होती. तिच्या दृष्टीने ढाब्यावर राहायचे म्हणजे एक प्रॉब्लेमच होता सुरुवातीला. पण अबूबकर ही काय चीज आहे हे ढाब्यावर राहायला आलेल्या माणसाला चोवीस तासात समजायचे अन मग तो माणूस कायमचा तिथलाच होऊन जायचा.

अबू - पद्या? आजकलकी मुर्गीया कहांसे लाता तुम लोगां...
पद्या - शिरवाडसेच.. क्युं?
अबू - कडवी लगती हय.. मुझे लगा गणपतके घरसे लाता के क्या...

मन्नू निवांत ऑम्लेट खात होता. त्याने हे ऐकल्यावर तो गणपतचाचाला म्हणाला..

मन्नू - आपके घरपे कडवी मुर्गीया हय??

अंजना स्वतःची प्लेट ठेवून जाऊ लागली. जाताना दिपूच्या मांडीला मुद्दाम स्वतःच्या उजव्या पायाचा अंगठा जरा जास्तच दाबून गेली. बहुधा.. 'आज आयेंगा ना' असा काहीतरी प्रश्न विचारायचा असावा.

दिपूने आज जायचे ठरवले होते. चक्क! पण.. यापुर्वी ज्यासाठी तिच्याकडे गेला होता त्यासाठी नाही. तिला हे सांगण्यासाठी की त्याचे काजलवर प्रेम आहे अन काजलला तो तिच्याकडे आलेला आवातही नाही अन त्यांच्यात त्यावरून वाद होतात. दिपूने 'मी अंजनाला एकदाच भेटून हे सांगणार आहे' हे काजललाही सांगीतलेले होते अन त्या गोष्टीला तिचा होकार होता.

दुपारी दोनच्या टळटळीत उन्हात जेव्हा सगळा स्टाफ ढाब्यावर मरमर मरत होता तेव्हा संधी साधून हळूच दिपू अंजनाकडे गेला. आनंदलेल्या अंजनाने त्याला पटकन ओढून दार लावून घेतले व त्याला बेडवर ओढून त्याच्या अंगावर पडून हसत म्हणाली..

अंजना - क्या होना?? इतनी दोपहरमे?? फिर याद आगयी क्या??

तिच्या वजनाने दबलेल्या दिपूला क्षणभर गुदमरले.. पण तोंड बाजूला करून तो म्हणाला...

दिपू - मेरेको.. आपसे बात करनेकी हय..
अंजना - बात?? ऐसे माहौलमे बातेच करेंगा क्या..??

त्याच्या मिसरुड फुटलेल्या ओठांवर स्वतःचे तप्त ओठ टेकवत ती म्हणाली.

दिपू - काजल..

अंजना पटकन बाजूला सरकली..

अंजना - काजल?? .......उसका क्या?
दिपू - उसे सब मालूम हय..

खाडकन उठलेल्या अंजनाने पांढर्‍या फटफटीत चेहर्‍याने दिपूकडे पाहिले.. काशीनाथने जगावेगळी परवानगी प्रेमाने दिलेली असली तरी ढाब्यावर सगळ्यांना हे माहीत होऊन बदनामी होऊ नये हे मात्र तिलाही मनापासून वाटत होते.

अंजना - कैसे??
दिपू - उसने देखा उस दिन.. मेरेको यहा आते हुवे...
अंजना - तो??
दिपू - .. तो.. पुछरही थी...
अंजना - तो?? तुने सच तो नय बताया??
दिपू - बतानाच पडा...

अंजनाने अंगातील सगळी शक्ती एकवटून दिपूचे खांदे गदागदा हलवत भीषण परंतु दबक्या स्वरात त्याला विचारले..

अंजना - ***... क्या बताया?? कायको बताया??

दिपूने अलगद स्वतःची सुटका करून घेतली. खांदे अजून दुखत होते..

दिपू - सब... सबकुछ बताया...

अंजना मटकन खाली बसली. मागच्या वेळेस निघून जाताना 'दिपूने पहाटे काय झाले हे सगळ्यांना सांगीतले तर काय' याची तिला काळजी नव्हती. कारण परत कधीच न येण्यासाठी ती चाललेली होती काशीनाथचा मार खाऊन! पण मालेगावच्या पुढच्या ढाब्यावर असताना राम रहीम ढाब्याच्या बातम्या काशीनाथ ड्रायव्हर अन कंडक्टरकडून काढत होता अन त्याला अन अंजनाला हळूहळू अंदाज येऊ लागला होता की दिपूने काही सांगीतलेलेच नसावे. काही वर्षे गेल्यावर त्या आठवणीचा ताजेपणा केव्हाच विरलेला होता. काशीनाथही खूपच बदलला होता. त्याच्या दुर्दैवी अक्षमतेची जाणीव झाल्यामुळे त्याने चक्क अंजनाला एक यार ठेवलास तर चालेल म्हणून सांगीतले होते. आणि काही हळूवार क्षणी काही गप्पा झाल्याच तर 'राम रहीम ढाब्यावर आपली किती आमदनी होती अन आपल्याला किती महत्व होते' हे ते दोघेही एकमेकांशी बोलू लागले होते. पद्याचे लग्न हे निमित्त करून पुन्हा आलेल्या काशीनाथला अबूने हक्काने 'आता जायचे नाही' असे सांगीतलेले होते अन त्यालाही तेच हवे होते. मात्र अंजनाच्या डो़क्यातून तरणाबांड होत असलेला दिपू काही जात नव्हता. दोन दिवसांनी काशीनाथने आधीच्या ढाब्यावर जाऊन आपले सामान हलवून राम रहीम ढाब्यावर पुन्हा एकदा आणले होते अन पुन्हा एकदा कर्णोपकर्णी चर्चा झाली होती की शेवभाजीवाला अन बासुंदीवाला काशीनाथ आता राम रहीम ढाब्यावर पुन्हा आला आहे.

मात्र, एवढे सगळे मनासारखे होऊन या बावळट दिपूने काहीही कारण नसता डोके न चालवून सगळे मूर्खासारखे त्या पोरीला सांगीतले म्हणून अंजना हादरली होती. काजलला सांगीतले म्हणजे ती सीमाताईला सांगणार. सीमाताई इतर बायकांना... शेवटी.. आपल्याला वाळीत टाकणार... काहीही झाले तरी.. आपल्या वयाला शोभेल असा... म्हणजे.. पद्यावगैरेसारखा पुरुष असता तर गोष्ट वेगळी होती.. पण.. दिपू?

अंजना अत्यंत जळजळीत डोळ्यांनी दिपूकडे पाहात होती अन तो भेदरून तिच्याकडे..

अंजनाने अचानक उठून दिपूच्या खाडकन कानाखाली वाजवली. हे त्याला अपेक्षितच नव्हते. गाल चोळत तो हेलपाटला.

अंजना - मालूम हय औरतकी अब्रू क्या होती हय??

अंजना घुसमटल्यासारखी पण भयानक स्वरात बोलत होती...

दिपू - आपकोच.. ..... आपकोच.. मालूम नय..

अंजनाने पुन्हा दिपूचे खांदे धरले. अशा मनस्थितीतील स्त्री अत्यंत विषारी अन चेटकीणीसारखी दिसते. दिपू अक्षरशः गर्भगळीत झाला होता.

अंजना - मै अगर चिल्लायेंगी ना.. की तू घरमे घुसता हय और.. मेरेउपर हात डाल..
दिपू - वो छोडो.. अबू और चाचा तुम्हारे उपर भरोसाच नय करेंगे..

वास्तव! जळजळीत वास्तव असूनही ऐकायला नकोसं असलेलळ वास्तव..

अंजना हताश होऊन खाली बसून रडू लागली.

दिपू - आप रोना मत.. काजल.. कुणाला.. म्हंजे कुणालाच नय बोलायची.. आमचं.. प्रेम हय एकमेकांवर..

तब्बल दोन मिनिटे अंजना दिपूच्या डोळ्यांकडे अन दिपू तिच्या डोळ्यांकडे बघत होते.

अंजनाच्या चेहर्‍यात खूपच फरक पडू लागला होता. हळूहळू तिला घटनांमधली सुसंगती जाणवू लागली होती. मधेमधे सगळे असताना दिपू अन काजलचे संवाद कोणत्या दिशेने जायचे याच्यात आता एक बेसिस जाणवू लागले होते.

मोकळं मोकळं वाटलं तिला.. मनाने वाईट नव्हती...

अंजना - दिपू.. एक बार बता.. फिरसे... तुम.. दोनोबी प्यार करते क्या एकदुसरेसे??

दिपूने होकारार्थी मान डोलावली.

अंजना - अगर वैसा हय तो .. काजल कबीच किसीको नय बतायेंगी.. क्युंकी.. वो सुनके उसकी शादी तेरेसे करनेको घबरायेंगे उसके मम्मी पापा
दिपू - नयच बतायेंगी.. मेरी कसम खायी हय उसने..
अंजना - और अगर वैसा हय.. तो..
दिपू - क्या??
अंजना - मै.. ऐसी गलती .. तेरे साथ वो सब.. दुबारा नय करेंगी दिपू.. और.. आजसे मै खुद देखेंगी.. तुम्हारे दोनोके बीचमे कौन आता हय... जा तू.. फिर मत आना मेरे पास.. मैबी नयच बुलायेंगी.. और.. काजलको .. अपना बनानेमे कोईबी ... दिक्कत आये तो.. बिन्दास मेरेको बोल.. जा..

अंजनाने दिपूला जवळ घेऊन गुडबाय किस दिला.

एक मोठीच अडचण दूर झाली होती. जिला ढाब्यावर फारसे काहीही महत्व नव्हते.. मात्र जिच्या नवर्‍याच्या जीवावर ढाब्याला पुन्हा सोनेरी दिवस येत होते.. त्या बाईला..

हाफ राईस दाल मारकेचे सगळ्यात मोठे रहस्य.. दिपू अन काजलचे प्रेम.. समजलेले होते...

आणि.. ती त्या प्रेमाच्या बाजूने झालेली होती.. विरोधात नव्हती..

हा सगळा प्रकार काजलला कम्युनिकेट करायला दिपूला तब्बल चार दिवस लागले. चोवीस तास समोर असूनही भेटीच होऊ शकायच्या नाहीत.

पण त्याचा परिणाम एकदम मस्त झाला. काजलने खोल्यांच्याही मागच्या अंधारात दिपूने हे सगळे सांगीतल्यावर स्वतःहून पुढे होऊन त्याचे एक हलके चुंबन घेतले. आणि दीपक अण्णू वाठारे तिच्या त्या अ‍ॅक्शनचा होईल तेवढा फायदा काढायच्या प्रयत्नात असताना अत्यंत स्त्रीसुलभ हालचाली करत हसत ती तिथून पळत पुन्हा आपल्या घरात गेली होती.

......

हळूच एकमेकांकडे बघणे, ओठातल्या ओठात हसणे, रात्री खिडकीतून आंखमिचौली, खाणाखुणा करणे, अबूच्या जोक्सना हसत हसत एकमेकांकडे प्रेमाने पाहात हसून घेणे.. काही ना काही प्रसंग निर्माण करत दोन तीन मिनिटे तरी एकांताची मिळतील असे बघणे, महिन्यातून एखादेच का होईना पण चोरटे चुंबन घेणे.. एखादा महत्वाचा प्रसंग, सण वगैरे असला तर ढाब्यावर सगळे जमले की दिपूला उद्देशून एखादे प्रेमगीत म्हणून दाखवणे.. अंजना व वैशाली आता ढाब्याच्या जीवनात रमणे.. पद्या अन वैशालीला एक गोंडस मुलगा तर बाळू अन मनीषाला एक गोंडस मुलगी होणे...चाचाची बायको पुन्हा अमितबरोबर, स्वतःच्या मुलाबरोबर राहायला म्हणून नाशिकला निघून जाणे.. काशीनाथने ढाब्याचा गल्ला किमान पंधरा टक्क्यांनी सरासरी वाढवणे...

या सगळ्या प्रकारात अन अत्यंत आनंदात दिड वर्ष पसार झाले....

प्रेमकहाणी दिवसेंदिवस रंगतच चालली होती... फक्त काही किरकोळ गालबोटे लागलेली होती..

काजल अन दिपूच्या प्रेमाबद्दल यशवंतशी काही बोलायच्या आधीच काजलची बिचारी आजी निधन पावली होती. मन्नूचाचाला असाध्य रोग होऊन तोही परलोकवासी झाला होता. समीरने चक्क चाचाशी पगाराबाबत बहंडण करून नोकरी सोडून वडाळा भुईच्या एका ढाब्यात नोकरी धरलेली होती...

अबूचे पिण्याचे प्रमाण पुर्वीसारखेच.. म्हणजे अफाट होते.. या वर्षीच्या भुलोबाला सीमा, यशवंत, वैशाली, प्रदीप, बाळु, मनीषा असे सगळेच गेले होते...

आणि..

त्या दिवशी तो प्रसंग घडला..

पुन्हा सगळे नाश्त्याला बसलेले असताना चाचा बोलू लागला.. चाचा अत्यंत गंभीर दिसत होता. आवाजही खूप नाराज झाल्यासारखा होता. दिपूकडे रोखून बघत दुखावलेल्या आवाजात चाचा म्हणाला..

चाचा - दिपू.. तेरेको.. यहांके पयले दिन.. पद्याने टोपी दिलीवती.. ना??
दिपू - हां..
चाचा - किधर हय??
दिपू - कमरेपे.. कायको??
चाचा - और किसकिसने क्या क्या दिया??
दिपू - कायको लेकिन??
चाचा - जितना पुछता उतना बोल?? (चाचाचा आवाज ऐकून सगळेच टरकले, काजल तर भेदरलीच)
दिपू - .. बाळ्ने फोटो दिया भगवानका.. विकी पेन दिया एक..
चाचा - दादूने??
दिपू - रुमाल.. रुमाल दिया..
चाचा - समीर तो हयच नय.. झिल्याने क्या दिया था??
दिपू - कंगी..
चाचा - सब है अबी तेरे कमरेपे??
दिपू - याद नय.. लेकिन भगवान का फोटो.. और टोपी तो हय..
चाचा - पेन और रुमाल??
दिपू - ढुंढता हय मैइ.. कायको पुछरहे है लेकिन??
चाचा - सबका सब वापस दे देनेका.. ज्याचे होते त्याला.. आजच्या आज...

सन्नाटा पसरला..

दिपू पुन्हा भेदरून बोलला..

दिपू - लेके आता मै.. लेकिन.. गुस्सा होगये क्या चाचा आप? गलती झालीय का काही??

दिपूला भीती होती त्याचे अन काजलचे कुणाला काही कळले की काय??

पण चाचा बोललाच नाही. गंभीरच..

अबू मात्र बोलला.. आणि.. अबू जे बोलला..

ते ऐकल्यावर धिंगाणाच झाला भटारखान्यात.. काजल लालेलाल होऊन दिपूकडे नुसती बघतच राहिली होती ते ऐकल्यावर..

अबू - अबे पोट्टे.. अब तेरेको पगार मिलेंगा.. तो ये सब फोकटकी चीजां कायको चाहिये अब तेरेको?? घोडे?? अठरा बरस का होगयेला ना तू?? अबीबी पद्याकीच दी हुवी टोपी पहनेंगा क्या?? आं?? आज तेरेवास्ते और मन्नू और साखरूकेके वास्ते पार्टी हय रातमे.. मै खुद बिर्याणी बनारहा.. क्या काशीनाथ?? तूबी आज पीले जितनी चाहे.. क्या?? .. ओ अंजना भाभी.. भली सुबह भागना मत लास्ट टायम जैसा.. ये नालायक दिपू अब खुदके पगारसे सबको एक एक गिफ्टा देंएंगा.. काजलबेटी.. तेरेको क्या होना अब्बीच बोल.. ये पोट्टा जारहा देख पिंपळगावको.. साडे पाच सालका पगार और बोनस मिलके इस भूतनीकेको बाईस हजार मिलरहेले यारो लोगां.. और मन्नूको सोला और साखरू साडे सतरा.. साला इतना पैसा देखा क्या यशवंत कबी जिंदगीमे एकसाथां...आं???

आठव्या वर्षी घरातून नकोसे झाल्यामुळे हाकलून दिलेले दीपक अण्णू वाठारे..

स्वतःच्या हिम्मतीवर जगत जगत.. वर पुन्हा पॉप्युलर होत होत..

आज अठरा वर्षांचे झालेले होते.. आणि..

पगार सुरू होणार .. या खुषीत त्यांनी पूर्ण पुरुष झाल्याच्या आनंदात काजलकडे अभिमानाने पण चोरून पाहिले तेव्हा ...

हाफ राईस दाल मारकेची धडकन काजल लाजत लाजत म्हणाली..

"मेरेको क्या.. कुछ बी चलेंगा.. लेकिन.. लाल कलर साडी.. हयच नय मेरे पास.. है ना आई???"

गुलमोहर: 

गुंतायला होते कथेत.. आपण पण त्या धाब्यावर आहोत्..त्या वातावरणात..त्या लोकांत आहोत..
असेच वाटते..ह्या कथेत एकरुप होऊन जातो.. खुपच छान... Happy

kya kehna..................... gr888888888888888

अप्रतिम शब्दच नाही सुचत आहेत मला.
दालला बहुतेक तड्का दिलाय यार तु.
पु. ले. शु.
लवकर लवकर लिह.............
आता वाट बघवत नाहि आहे आम्हाला.
पण तुमचा आजार साम्भाळुन आणि धिराने लिहा.
आम्हि काय वाचक मन्डळी.
अजुन दहा भाग दिलेत तरी एकत्रच वाचु,
तहान भागणार नाही आमची कधीच.
आणि काजल ने जे मागितले ते तर अगदी मनला छेदुन गेले.

मस्तच!!!!! दिल खुष हो गया... अंजनाचा प्रॉब्लेम एकदम हळूवारपणे सोडवलात. छान Happy

आता लवकरच दिपू-काजलचं लग्न...आणि मग???? कादंबरी संपणार????? Sad

खरंच ढाब्यावरचं एक पात्र म्हणून राहायची सवय लागलीये आता... ढाबा सोडणं अवघड जाणार....जमेल तेवढी स्ट्रेच करा ही कथा...तेवढाच ढाब्याचा आणि तिथल्या लोकांचा सहवास मिळेल...

खरं सांगू का, ही कथा दिपू आणि काजल पणजोबा, पणजी होईस्तोवर चालू राहिलेली मला चालेल...बाकी तुमची आणि बाकी वाचकांची इच्छा! Happy

जमेल तेवढी स्ट्रेच करा ही कथा>>>> ही कादंबरी काय टीव्हीवरची सिरीयल आहे काय.. पाणी घालून वाढवायला..

मला वाटलंच, कुणीतरी असं म्हणणार!
नाही.... पाणी घालायची वेळ नाही येणार...डाळ चविष्ट, रुचकर बनवायला बेफिकीरांकडे भरपूर वेगवेगळया प्रकारचे मसाले आहेत. ते घालून ते नव-नवीन प्रयोग करु शकतील. त्यांना प्रयोगांचा कंटाळा आला की मग "आणि अशाप्रकारे दिपू- काजल पणजी-पणजोबा झाले----समाप्त" असा दी-एण्ड करु शकतील Lol

प्रयोगाचा कंटाळा -

सानी, आपले कथेबाबतचे 'प्रेम' पाहून आनंद वाटला. पण माझ्यासाठी 'हाफ राईस दाल मारके' हा कुठलाही प्रयोग नाही. मी ती कादंबरी 'सध्या' जगतोय!

सानी, आपल्या प्रेमळ प्रतिसादासाठी मनःपुर्वक आभार!

सर्वांच्या प्रेमळ प्रतिसादाचे मनापासून अनेक धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर, मी सुद्धा सध्या तुमच्या लेखणीतून ढाब्याचे जीवन जगतेय....आणि मन तिथे इतकं रमलंय, की आता ढाबा सोडावा लागेल याची नुसती चाहूलसुद्धा अस्वस्थता आणतेय...असो, ढाबा सुटला तरी तुमचे लेखन वाचायचे सुटू नये, एवढी किमान अपेक्षा... Happy