हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग १६

Submitted by बेफ़िकीर on 19 May, 2010 - 15:45

च्यायच्ची **! काय चाललंय काय?

इकडे दहा मिनिटे काजल दिसली नाही तर 'जिंदगी ब्येक्कार' वगैरे वाटते का 'लगती है' काहीतरी!

जमलं की पिक्चरचं हिंदी? आँ?

'मुहब्बत' का काहीतरी केल्यावर एकदम 'डायरेक' हिंदीच जमायला लागतं बहुतेक!

स्साला!

आणि... आणि..

तिकडे त्या अंजनाच्या डावीकडून बघितलं की ते काय म्हणतात ते..?? आं? काय म्हणतात??

हां! ....जवानी!.. बरोबर.. जवानी नजर येते का 'आती है' काहीतरी..

परवा झरीनाचाची काय म्हणाली? आंचलबी नय पहनती ठीकसे...

अरे तुमको क्या करनेका है च्यायला?? हमको देखनेदो ना?? तुम पहनो अपना आंचल का काय ते ठीकसे..

बायकांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम काय असेल तर बायकांचा!

ही पदर नीट घेत नाही, ती आपलं ते हे.. काय ते?.. हां.. काही का असो.. आपण नको बोलायला.. ते हे हलवत चालते..

अरे?? आम्हाला पसंद हय ना??

तुम्हाला नय चालत तर भुलोबाकडे बघा? काय जबरदस्तीय काय? अंजना काय हलवत चालते ते पाहिलंच पाहिजे?

अंजना!

आली लेकाची परत! आता आपलं काय होणार ते कय समजत नय..

इकडे ही...

अन तिकडे?? .. तिकडे ती..

भजं होणार आपलं भजं! पुर्वी काशीनाथ भटारखान्यात करायचा तसलं भजं!

जरा नीट बसून विचार करायला हवा च्यायला.. नेमकं करायचं काय?

आपल्याला...... काय हवं हयं? नय.. म्हंजे.. आपल्याला काय हवं काय हय?

एक मात्र हय राव.. अंजना.. अंजनाला पाहिलं की.. नको नको ते व्हायला लागतं..

तसं काजलचं नय....

पण.. काजल.. दिसलीच नय तर.. भोत बुरा लगताय..

दो लडकीपे एकसाथ प्यार व्हताय क्या?? या नय होता??

हुवा तो क्या??

लडकी?? अंजना लडकी किधर हय?? औरत हय वो तो.. अपन पाप सोचरहेले हय.. लेकिन.. लेकिन साला...

स्स्साला! काल अंजनाने खिडकीत उभे राहून साडी बदलली... आपण आपल्या खिडकीतून पाहतोय माहीत असून..

आपल्याकडेच बघतीय औलाद.. त्येबी हसके...

त्यात काय हसायचंय? काय हसण्याजैसं काय हय काय त्यात?

आं??

बाईला साडी बदलताना एक परकाच बुवा बघतोय.. त्यात हसायचं काय? बुवा??........ आपण बुवा?? ह्या! आपण लय ल्हान पोरगं हावोत..

मग? हसी कैसी वो??

आहाहाहाहाहाहाहा...

रात्र ब्येक्कार केली खरी तिने.. खोटं कशाला बोलायचं स्वतःशीच?

काय ते.. आपलं.. काय म्हणतात त्याला??... हां.. क्या बॉडी हय.. एकदम टोकदार.

पीली चोली.. स्साली मुस्कुराके घुमघुमके साडी पहनरही..

देखा तो आदमी गिलाच...

हा काशीनाथ करतो काय??

आं??

बासुंदी, पुर्‍या, मटर पनीर, नवरतन कोर्मा.. ...

आणि घरी?? हलवा नय का जमत याला हलवा???

हा हा हा हा ! लय भारी ज्योक जमला राव! आपल्यालाबी ज्योक जमतोय..

काशीनाथने अबूच्या म्हणण्यानुसार पुन्हा ढाब्यावर प्रपंच मांडायचा ठरवल्यानंतर पंधराच दिवसांनी हा प्रकार झाला होता. अर्थातच भटारखान्याच्या शेजारची खोली दीपकरावांना मिळालेली असल्याने जराशी डायगोनली ऑपोझिट खोली काशीनाथला मिळाली.

काशीनाथने गेल्या काही वर्षात बरेच काही लक्षात आल्यामुळे एक फॅक्ट कंप्लीटली स्वीकारलेला होता.

सेक्स ही एक नैसर्गीक भावना व गरज असून ती 'आपल्यात' नाही. इतरांमध्ये असते. तेव्हा.. आपल्या संसारात सुखी व्हायचे असेल तर बायकोवर भरपूर प्रेम करावे.. मात्र.. अ‍ॅक्च्युअल 'प्रेमच' करता येत नसल्यामुळे तिला तिच्या चॉईसने कोणत्याही 'एकाशी जर ' ... 'फक्त एकाशी' तसले प्रेम बिम' करायचे असेल तर करू द्यावे.. पण.. एकाशीच...

आणि..

प्रदीप डांगे यांच्या विवाहाची बातमी कळल्यावर बॉम्बे आग्रा रोडवरच्या मालेगावच्याही पुढच्या एका ढाब्यावर कामाला असलेल्या काशीनाथने हे अंजनाला सांगीतले अन...

तिच्या मनातून आत्तापर्यंत काशीनाथने नाइलाजाने 'अ‍ॅप्रूव्ह' केलेले सर्व प्रियकर अचानक 'डिसअ‍ॅप्रूव्ह' झाले अन तिने रामरहीम ढाब्यावर कायमचे जायचा प्रयत्न करायचा लग्गा लावला.

दीपक अण्णू वाठारे..

सोळा वर्षाचा हा 'बुवा' अत्यंत आकर्षक चेहरा व वाढते शरीर घेऊन जन्माला आलेला होता.

आणि तेरा वर्षाचा असताना त्याच्या निरागसपणावर भाळलेली अंजना..

तो सोळा वर्षाचा झाल्यावर शांत बसणे शक्यच नव्हते.

काशीनाथ प्रकट झाल्यामुळे अर्थातच...

ढाब्यावर आता अबू, दिपू अन विकी.. यांची कामे दहा टक्क्याहूनही कमी झाली होती.

अबूचा प्रश्नच नव्हता. तो ढाब्याचा भागीदार होता. विकी आपला इतर कामे करू लागला होता.

आणि दीपकराव..

ते फक्त टंगळमंगळ करत होते. ... पंण... एकाच्या मनात हा प्रश्न नव्हता की आता दिपूला काम काय आहे?

फक्त पद्या 'क्या घुमता बे' म्हणून मधून मधून झापायचा तेवढे सोडले तर सगळे मस्त चाललेले होते..

अंजनाचे कुणाशीच काहीच संबंध नव्हते. केवळ एक बाई म्हणून वैशालीची सासू, सीमाकाकू अन झरीनाचाची तिच्याशी मधून मधून बोलायच्या इतकेच!

आणि मुख्य म्हणजे तिला अन काशीनाथला हे समजले होते की त्या.... 'त्या' रात्री घडलेला प्रसंग दिपूने कुणालाच सांगीतलेला नव्हता..... त्यामुळे बिचारा काशीनाथ सुखात...

तर.. अंजना मस्त होती...

तिने दिपूच्या वेळा वगैरे बघून मुद्दाम स्वतःच्या खिडकीत साडी बदलली होती .. अन त्या वेळेस दिपू काजलकडे बघायला खिडकीत येत असल्यामुळे अपेक्षेने खिडकीत आलेल्या काजलला 'दिपू आपल्याकडे बघतच नाहीये' ही जाणीव झाली.

हा पहिला प्रश्न निर्माण झाला होता...

दिपू... आपल्याकडे बघतच नव्हता..

मग..??? .. आला कशाला होता खिडकीत??

महिन्याभरातच आणखीन एक प्रसंग घडला.

दिपू हा मार्गदर्शनाअभावी वाढलेला मुलगा होता. पण हे जाणून घ्यायला कोण तयार होणार??

अशा मुलांना चांगले वाईट, बरे-भुले कोण शिकवणार? आहे तुम्हाला वेळ? आहे पैसा खर्च करायची तयारी? स्वतःच्या मुलांना जे शिकवाल ते शिकवायची, तेवढी माया लावायची, तेवढा वेळ द्यायची.. तयारी आहे? पैसा जाऊदे हो.. उगाच 'आम्ही क्राय या संस्थेला गेल्या वर्षी पाच हजार दिले' वगैरे नका सांगू! येताय राम रहीम ढाब्यावर??????

काजल कपडे वाळत घालत असताना तिने सहज बघितले तेव्हा...

तिला धक्काच बसला... प्रचंड धक्का...

जिच्याशी कुणीच बोलत नाही अशा अंजनाच्या घरात.. काशीनाथ नसताना...

दिपू त्या घरातून बाहेर पडत होता.. कदाचित 'बाहेर पडू पाहत' होता ... आणि...

आतून एक गोरापान हात बाहेर आला होता... ज्याच्यात दिपूचे मनगट धरले गेले होते... आणि...

दिपू पुन्हा आत खेचला गेला होता...

हे काय? काय झाले हे??

काजलला काहीही समजेना...

ती स्वतःच्या घरात जाऊन खिडकीत जाऊन लक्ष देत बसली..

आणि...

त्यावेळेस अंजनाच्या घरात वेगळाच प्रकार घडत होता...

खिडकीतून खाणाखुणा करून अंजनाने दिपूला स्वतःच्या घरात बोलावले होते..

दिपू कुठल्यातरी अनामिक मोहाने गेला होता.. तिथे गेल्यावर अंजनाने त्याला खारे काजू खायला दिले होते.. ही बाई आता आपल्या बाबतीत बदलली असावी असा विचार करून दोन चार काजू तोंडात टाकून तिच्याकडे बघत बाहेर निघालेल्या दिपूला तिने अलगद आत पुन्हा ओढले होते...

आणि.. त्या क्षणी.. नवल म्हणजे... दिपूलाही अगदी... तेच 'हवेसे' वाटत होते...

अंजनाचे, ... एका.. अत्यंत टचटचीत स्त्रीचे शरीर कदाचित बर्‍याच वर्षांनंतर बघायला मिळू शकेल या अबोध विचाराने तो आत गेला होता.

याक्षणी त्याला काजल ही 'त्याची हक्काची' वाटत होती. 'ती काय? आहेच!' हा त्याच्या मनातला विचार होता. 'पण अंजना?' अंजनासारखी बाई कशी सोडायची?

तीन चार वर्षात अंजनामधे काहीच फरक पडला नसला तरीही दीपकरावांमधे बराच फरक पडलेला होता. आधीच अंजनानेच त्यांना 'शरीरसुख कसे असू शकते' याचा साधारण किंवा किमान अंदाज दिलेला होता. त्यात गेल्या काही महिन्यांपासून काजलच्या सायीसारख्या ओठांना ओठात घेण्याची मजा काही औरच असते असा त्यांना साक्षात्कार झालेला होता.

आणि... आता... परत खुद्द अंजना...

अंजनाने त्याला आत ओढल्यावर बिनदिक्कत दार आतून लावून घेतले.

अंजना - क्या रे? .. आँ?.... भूल गया बेचारीको???

इथे 'बेचारे' कोण होते हा एक प्रश्नच होता. पण दीपकरावांनी 'समर्थ पुरुष' असल्याप्रमाणे 'छे' अशा अर्थी मान हलवली.

अंजना - तो?? देखता बी नय?? इतनी बुरी हय मै?? अब तो काशी बी कुछ नय कहेंगा.. आजा.

अंजनाने दिपूला आपल्या जवळ घेतले तसा दिपूला तिचा तोच.. अनेक वर्षांपुर्वीचा उग्र सुगंध जाणवला..

दिपू खुळावला. यावेळेस अंजनाला फारसे प्रयत्न करावेच लागले नाहीत. तिने त्याचे तोंड स्वतःच्या उरावर दाबून घेतल्यावर पिसाळल्यासारखा दिपू तिच्या अंगाशी खेळायला लागला.

त्याचे बालीश 'प्रेम-प्रयत्न' पाहून अंजना खदखदून हसत होती. तिने त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले. थट्टा म्हणून!

दिपू तिच्या अंगाशी झोंबू लागला. तिचा पदर क्षणार्धात बाजूला झाला. दिपूला नक्की काय करतात याचा जरी अनुभव नसला तरी नवनिसर्गाचा प्रभाव असल्यामुळे आपल्या नवप्राप्त शक्तीने त्याने अंजनाला बेडवर आडवे केले.

दहा मिनिटात 'तू काढलेस म्हणून.. नाहीतर मी कसली माझे कपडे काढतीय' अशा चेहर्‍याने अंजनाने स्वतःला व त्याला निर्वस्त्र केले मात्र.. त्यानंतर...

दीपक अण्णू वाठारे .. यांना ऐन समरप्रसंगी त्यांची प्रेयसी .. काजल यशवंत बोरास्ते हिची आठवण झाली..

एक्झॅक्टली हेच.. हेच आपल्याला काजलबद्दल वाटते .. आणि त्याचवेळेस.. हेही वाटते की.. हे अजिबात करता नाही आले तरी चालेल... आयुष्यात करता नाही आले तरीही चालेल... पण... काजल फक्त समोर असली पाहिजे.... फक्त समोर... फक्त दिसली तरी... पुष्कळ झाले....

दीपक अण्णू वाठारे आपली फूलपँट सावरत उठले अन चोरट्या नजरेने अंजनाच्या घराबाहेर पडले..

त्याक्षणी अंजनाला पूर्ण आत्मविश्वास मिळाला होता...

जो मुलगा... अजून पूर्ण पुरुषही झालेला नव्हता... तो आता तिच्या कह्यात होता... ती त्याला केव्हाही पूर्ण पुरुष करून स्वतःची तहान भागवून घेणार होती...

आणि अगदी म्हणजे अगदी त्याचक्षणी...

काजलही दिपूकडे आपल्या घराच्या खिडकीतून बघत होती...

असे चोरट्या नजरेने एखाद्या घरातून बाहेर पडतात याचा अर्थ काय...

हे अठरा वर्षाच्या ... अन अनेक थोराड पुरुषांच्या नजरा झेललेल्या मुलीला व्यवस्थित समजलेले होते...

दोनच दिवसांनी झरीनाचाचीच्या मुलाने आणलेल्या होल्यांचा रस्सा सगळे जण ओरपत असताना काजलचा काहीतरी विषय निघाला तेव्हा काजल सर्वांदेखत बिनदिक्कत यशवंतला.. म्हणजे स्वतःच्या बापाला म्हणाली...

वो... टहेरेका कदम लडका मेरेको पसंद हय.. आप लोगां बातच नय करते.. मग मी कशाला बोलू???

गुलमोहर: 

राव आज न्याहारी थोडी आळणी वाट्ली.
आणि थोडी कमी सुद्धा,
पोट पण नाही भरलय आज.
अजुन थोडी खुलवता आली असत, अजुन थोडे लिखाण हवे होते.गेल्या सोळा भागात फक्त हाच भाग थोडा अपुरा वाट्ला.
तरीहि तुम्हि लिहित राहा, पुढील भाग टिविस्ट घेउन येतिल नक्किच.
पु. ले.शु.

काय राव ... मस्त लिहिता एकदम .
काही जजमेंटच होत नाही ...
आता ह्या दिप्याला वाईट म्हणाव का आडवयातला आहे म्हणून जवळ घेऊन नीट समजावून सांगावं ?
चक्क तुमच्या कथेतील एक पात्र झाल्यासारखं वाटतंय.

आजचा भाग इतर सर्व भागांपेक्षा जरा कमी जमलाय. अर्थात हे माझे मत. तसंच तो खूप कमी अंतराने आलाय. बेफिकीर, लोकांना लवकर वाचायला हवं असतं याचं बिलकूल प्रेशर घेवू नका. टेक युवर ओन टाइम !

हा पण भाग मागील भागाप्रमाणे उत्तम Happy
बेफिकीर, लोकांना लवकर वाचायला हवं असतं याचं बिलकूल प्रेशर घेवू नका. टेक युवर ओन टाइम ! <<< अनुमोदन Happy

हा भागही छान आहे . आता.................पुढील भागाची प्रतीक्षा............

<<< तसंच तो खूप कमी अंतराने आलाय. बेफिकीर, लोकांना लवकर वाचायला हवं असतं याचं बिलकूल प्रेशर घेवू नका. टेक युवर ओन टाइम ! >>>
shugol ला अनुमोदन!
बाकी, हाही भाग मस्त जमलाय...नेहमीप्रमाणे Happy फक्त विनाकारणच टर्न मिळालाय गोष्टीला... जो आवडला नाही Sad ह्या अंजना-काशिनाथला आउट करा हो स्टोरीतून...