हाफ राईस दाल मारके - क्रमशः - भाग २०

Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2010 - 23:56

दिपू कसा जाणार? आं? दिपू जाणार कसा?

दीपक अण्णू वाठारे यांच्या बरोबर जर दैत्य अबूबकरही निघाले आहेत ही कल्पना चाचाने ढाब्यावर मांडली असती...

रांगेने प्रदीप डांगेपासून ते साखरूपर्यंत एकजात सगळे आपापले सामान घेऊन चाचासमोर किल्ल्या घेऊन आले असते.

अन मग...

राम रहीम ढाबा... चालला कसा असता?? अबू नाही, काशीनाथ नाही, दिपू नाही...

खाना बनवण्याचा ** (सर्वसाधारणपणे बोलला जाणारा शब्द) एकाला अनुभव नाही...

ऑर्डर्स कोण घेणार?

आणि...

समजा..... ऑर्डर्स घेतल्याच...

नाही.. सर्व्ह करायला चाचा, यशवंत, सीमा वगैरे होतेच ..

पण... त्या ऑर्डर्समुताबिक...

खाना कोण बनवणार??

राम रहीम ढाब्यावर खाना कोण बनवणार???

बर ठीक आहे... आचारी आणला शिरवाडहून.. मग?? मग काय???

बंद झालेल्या सगळ्या एस. ट्या. पुन्हा यायला लागतील..

हळूच चोरून यायला लागतील... नवा आचारी कसा आहे बघू..

पण... पण....

हा 'पण' फार फार मोठा होता...

जेवताना काउंटरच्या खिडकीतून अबूबकरचे भन्नाट जोक्स ऐकायला मिळतील का??

नाश्त्याला पद्याच्या ऑम्लेट्सची चव अबूच्या कॉमेंट्सशिवाय लागेल का?

अख्खा ढाबा जो केवळ अबूच्या अस्तित्वामुळे चालायचा तो....

... चालेल का?????

अबू नाही म्हंटल्यावर कुणी येईल का या आड ठिकाणी??

चैतन्य! ज्याला मराठीत चैतन्य असं नाव आहे... त्याला ....

राम रहीम ढाब्यावर ....

'अबूबकर' असं नाव होतं....

इतका स्वार्थी होता गणपतचाचा???

केवळ 'ढाबा कसा चालणार' या विषयावर डोके लढवणारा माणूस होता तो???

इतका फालतू माणूस होता?? गणपतचाचा??

'मेराबी हिसाब कर डाल किट्टू'

कोण बोललं हे?? ... कोण बोललं???

'किट्टू' कोण म्हणू शकतं आपल्याला???

अबू?? अबू बोलला?? हे वाक्य अबू बोलला????

मोठा राडा झाला त्या दिवशी...

अबू अन चाचाचा मोठा संवाद झाला. असा संवाद की अबूभावजींचा आवाज ऐकताच चाचाची बायको तत्क्षणी खोलीतून पुन्हा मागच्या मोकळ्या जागेत आली होती...

अन... बघतच बसली होती..... धक्का बसल्यामुळे.. अबूभावजी चालले??? दिपूसाठी??

असा संवाद झाला की...

ढाब्यावरचा एक.. एक म्हणजे एक... माणूस त्यात बोलू शकत नव्हता...

सगळे थक्क झालेले होते...

पद्याला किंचित कल्पना होती... चाचासाठी अबू काय आहे.. पण.. इतकी नव्हती..

संवाद असा झाला...

अबू - मेराबी हिसाब कर डाल किट्टू...

एक सुनसान शांतता! एक भयानक शांतता...

अबू काय बोलला ते मुळी कानातून मेंदूत शिरून त्याचा अर्थ समजणेच कुणाला जमत नव्हते..

आणि चाचाला तर ते वाक्य अविश्वसनीयच वाटले होते...

'मेराबी हिसाब कर डाल'??? 'हिसाब'???

हिसाब कहा होता है ऐसे रिश्तोंका??? और.. अगर होता भी है तो...

क्या हिसाब होता है??

जैसे.. 'तुमने आजतक ढाबा अपना समझा...तो.. उसके बदलेमे....'

बदलेमे क्या?? बदलेमे मेरी जान लेले???

'तुने मेरेको.. मेरे अब्बा को... मेरी अम्मा को.. भर अनंतचतुर्दशीपर मालेगावमे बचाया.. उसके बदले'

उसके बदले क्या??? ढाबेको अपना समझनेकेलिये तो जान देही दी ना?? तो फिर?? अब क्या दे सकता है मै???

अब.. एक दिन जान बचानेकेलिये.. क्या दे सकता मै???

चाचा आजवर झाला नव्हता असा हतबुद्ध होऊन अबूकडे पाहात होता.

आणि अबू... काहीच झाले नाही अशा थाटात पुढची बाटली ओपन करून राक्षसासारखा चाचापुढे येऊन उभा राहिला होता..

ढाब्याचे नाव राम रहीम होते खरे...

पण.. यच्चयावत पब्लिकला माहीत होते... अगदी.. चाचाच्या बायकोलाही...

की .. ढाबा फक्त 'रहीम'च्या जीवावर चालत होता...

'राम' फक्त नोटा मोजायला होता इतकेच...

चाचा - क्या बोलता है अबू??
अबू - अबू जो बोलता हय वो बोलता हय.. तेरेको मालूम हय.. हिसाब कर.. मोकळा कर मेरेकू..
चाचा - अबू.. चढगयी हय तेरेको..
अबू - जोक मत सुना.. हिसाब कर.. अबूको शराब नय चढती...
चाचा - तू कायको जा रहा??
अबू - मर्जी... तेरेको क्या पंचायत???
चाचा - अबू.. तेरा दिमाग खराब होगया हय.. जा सो जा
अबू - हिसाब अबीके अबी करनेका.. सुभा नय.. धोपर नय.. अब्बी..
चाचा - देखो लोगां.. मेरे दोस्तको चढगयी हय.. तब ऐसा बोलरहा..
अबू - उन्हों क्या बातां करतां.. मेरेसे बात कर.. चल्ल.. ऊठ.. हिसाब कर.. अब्बीके अब्बी...

आता चाचाची बायको मधे पडली.

चाची - भाऊजी.. क्या बात कररहे आप.. ऐसे कैसे बोलताय..??

अबूने अत्यंत भयानक नजरेने तिच्याकडे पाहिले.. ती नजर फक्त गणपतचाचाला माहीत होती. अबूच्या दृष्टीने जेव्हा वाईट लोक मधे मोडता घालायचे तेव्हा अबू तसे पाहायचा. चाचा हादरला.. पण तोपर्यंत अबूच तिच्याकडे एक बोट ताणत जहरी आवाजात बोलला..

अबू - तुम कौन हय मेरेको बोलनेवाली?????? .. तुम्हारा मरद और मै गल्ली डंडा खेले हय... तुमको बोलनेकी इजाझत किसने दी??

हा प्रश्न अबूशिवाय कुणीही.. म्हणजे अगदी कुणीही विचारला असता तर चाचाने खाडकन कानाखाली काढली असती त्याच्या.. पण.. ते शक्य नव्हते.. अबू स्वतःच बोलत होता...

अबू - तुम कायको बाहर आयी?? आं?? बीचमे बोलनेका नय... चल किट्टू ... हिसाब कर...

अबू ऐकतच नव्हता. धड उत्तरेही देत नव्हता.

चाचा - कायको हिसाब लेकिन?? कायको?? आं??
अबू - हि.. सा....ब... क.. र..
चाचा - अरे लेकिन कायको??? आजतक इधर रह्या तू..
अबू - इथ्यास नय सुनानेका.. हिसाब करनेका...
चाचा - अबू.. अंदर चल.. आरामसे बातां करतें...
अबू - आराम वाराम कुछ नय.. इधरके इधरच हिसाब कर...

अत्यंत चवताळून, घशाच्या शिरा ताणून चाचा ओरडला..

चाचा - तेरा कुछ नय आता हिसाबमे...

हिशेबाप्रमाणे तुला काहीही देणे नाही..

काय वाक्य उच्चारलं होतं चाचाने चिडून!

'तुला मी काहीही देणे लागत नाही'...!

चाचाच्या तोंडातून जे वाक्य गेले त्यावर चाचाचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. बाकीच्यांचे जाऊचदेत!

खरंच! काहीही देणे लागत नव्हता गणपत अबूचे! माणूस देणे कधी लागतो? जेव्हा काही घेईल तेव्हा ना?? घेतलं कुठे काय होतं गणपतने अबूकडून?

मालेगावमधे अनंतचतुर्दशीला गणपत, त्याची आई अन त्याचे वडील या सगळ्यांना अबूने जिवंत ठेवलं होतं! स्वतःच्या घरात लपवून! ते जर कुणाला समजलं असतं तर त्या सगळ्यांच्या आधी अबूलाच मारलं असतं मुहल्लेवाल्यांनी! आजवर गणपत जिवंत होता हे अबूचे ... छे.. याला काय देणे म्हणतात?? याला देणे म्हणत नाहीत.. इट वॉझ जस्ट... ह्युमॅनिटी.. अ‍ॅट द कॉस्ट ऑफ वन्'स ओन वेल बिंग... वन्स ओन लाईफ...

ढाबा चालू करायच्यावेळेस अबूने जमवलेले सगळे पैसे घालून जमीन घेतली होती... हे काय देणे आहे?? छे.. इट वॉझ जस्ट अ‍ॅन इन्व्हेस्टमेंट...

ढाबा चालू झाल्यावर आलेल्या प्रत्येक गिर्‍हाईकाच्या जीभेला पुन्हा पुन्हा राम रहीम ढाब्याची आठवण होईल अशी बिर्याणी बनवली होती.... हे काय देणे आहे??? इट वॉझ जस्ट अ जॉब...

काशीनाथ, दिपू नसताना, पद्या नवखा पोरगा असताना राम रहीम ढाबा एकशे पन्नास किलोमीटरमधे गाजेल असे कर्तृत्व गाजवणे हे काय देणे आहे??? छे.. इट वॉझ जस्ट अ.... ड्युटी....!!!

अमितला शाळेत अ‍ॅडमिशन मिळावी म्हणून चाचा जाऊ शकत नसताना नाशिकच्या शाळेत पन्नास खेट्या घालणे हे काय देणे आहे??? हा हा हा हा! ... इट वॉझ प्रॉबेबली जस्ट ... अ .... फ्रेंडशिप... !!!

नाशिकचे घर बदलताना स्वतःच्या खांद्यावरून सगळे सामान हलवणे .. हे...

... हे ... हे देणे आहे??? देणे आहे हे???

ह्यँ! इट वॉझ जस्ट... हमाली... फॉर विच ही वॉझ ब्लडी पेड... !!!!

तेरा कुछबी हिसाब नही बनता...

काय वाक्य होतं ते...

एकच क्षण होता तो... त्या एका क्षणात जर कुणालाही विचारलं असतं की चाचा बोलतोय ते ....

... बरोबर आहे का हो???

लाथा घातल्या असत्या विचारणार्‍याला ढाब्यावरच्या प्रत्येकाने... पण... एकच क्षण.. तेवढाच... !!

दुसर्‍या क्षणी अबू म्हणाला...

अबू - नय तो नय... उसमे क्या.. मै चल्या... चल्ल रे दिप्या... मालेगाव जाते...
चाचा - अबू.. तेरा दिमाग खराब होगया हय.. तू कायको जा रहा मेरे समझमे नय आरहा...
अबू - तेरेको उससे क्या?? मै जा रहा है..
चाचा - ऐसे कैसे जा सकता है तू??? हम दोनोने ढाबा खडा किया है...
अबू - कायतरीच यादां काढतोस बे?? आत्ता त्याचं काय? मै चल्या..
चाचा - ये.. ये .. राम रहीम ढाबा तेरा है अबू...
अबू - मेरा है?? अच्छा! .. ठीक है.. तो ये मै तेरेको गिफ्ट देके जा रहा...
चाचा - ओ वासंती.. तुम तो समझाओ ना इसको...

चाचाला स्वतःच्या बायकोपेक्षा आत्ता त्या प्रकरणात कुणीही तितकं महत्वाचं वाटत नव्हतं.

चाची - ये क्या बोल रहे है अबूभावजी???
अबू - तुमने मेरेसे बात नय करनेका.. मै और किट्टू देखलेंगे...

आत्तापर्यंतच्या घटनांचा अत्यंत घाणेरडा परिणाम झाला चाचाच्या मनावर! दिपू अन काजलने घडोघडी अपमान केला होता. ढाब्यावरील काही जण त्यांच्याच बाजूने होते. त्यात आणखीन...

... अबू निघाला होता.

ऑफ झालेल्या चाचाने अबूने आपल्या बायकोला 'मधे बोलायचे नाही' असे सांगीतलेले ऐकताच स्वतःची जीभ सोडली...

चाचा - जा.. जा स्स्साले.. ज्ज्जा.. ज्जा अबीके अब्बी ज्जा... दारू पीता रयता हय.. पीछले .. ए .... ए बताओ रे सब लोगां... पीछले चार सालांमे ये अबू क्या काम किया ढाबेपे... पी रहा सिर्फ.. सिर्फ पी रहा..
ये काशीनाथ.. ये काशीनाथ वापस आके ढाबा चला रहा.. ये दिपू पोट्टा.. इतनासा होकर ढाबेका खाना बना रहा... ये करता क्या था?? क्या करता क्या था ये?? स्साला .. पीता रयताय बस.. क्या रे अबू.. क्या समझता अपने आपको??? आं?? क्या समझता क्या हय तू अपने आपको??? तेरे बगैर ढाबा नय चलेंगा?? अरे एकसे एक आचारी लायेंगा मै... ज्जा.. स्साले ज्जा.. मेरी प्रगती देखके जलरहाय.. मेरेको बीवी हय... बच्चा हय.. करके जल रहाय... मेरे बेटेकी शादी होरहीय.. करके जलरहाय... इसकी बीवी नय ना.. इसका कोई बेटा नय ना... इसकी तो मां बी सौतेलीच ये दिपूजैसी... इसका भाय इसको घरमेच नय लेता.. करके इसको घरच नय.. स्साला.. जलन है मनमे जलन..

इतके ऐकेपर्यंत अबू काहीही बोलत नव्हता. तिसरीचकडे मान करून बघत होता. त्याच्या दृष्टीने किट्टूचा मानसिक तोल ढळला होता. पण यानंतर चाचाने एक वाक्य उच्चारले... जे ऐकून मात्र अबूने 'अबू' ही काय चीज आहे ते दाखवले.. चाचा म्हणाला....

चाचा - साला जल रहाय... भावनाको बी ऐसेच पटाया था.. देखा नय गया इस हरामी मोहम्मेडियनसे.. अच्छी खासी हिंदू फॅमिली जी रही हय...

चाचाच्या बायकोने खाडकन पुढे येऊन जर चाचाच्या तोंडावर हात ठेवला नसता तर अबूने चाचाच्या तोंडात कदाचित एक दातही शाबूत ठेवला नसता...

बोलायचे ते बोलून गेला होता चाचा.. तोंडातून ते वाक्य निघून गेले होते..भयानक.. भयानक अपमान झाला होता एका घट्ट मैत्रीचा... सर्वांदेखत..

भावना हा अबूच्या मनातील हळवा कोपरा होता. आणि चाचाने भावनावरचे अबूचे प्रेम हे हिंदू धर्मीयांना बेइज्जत करण्यासाठी अबूने उचललेले पाऊल होते असे विधान केलेले होते...

चाचाची बायको, वासंती, जर त्याची बायको नसती तर तिनेच त्याच्या श्रीमुखात भडकावली असती. आणि .. भावनाचा तो प्रकार झाला तेव्हा पद्या चार पाच वर्षाचा असला तरी भावना हा विषय अबूसाठी काय आहे हे त्याला माहीत होते. पद्याच्या दृष्टीने चाचाने नालायक विधान केले होते. फार मोठी चूक केली होती.

रात्र रात्र भर नाशिकच्या घरात पुर्वी अबू अन गणपतचाचा अन वासंती जुन्या आठवणी काढायचे अन बोलत बसायचे. जुन्या आठवणी म्हणजे अबूच्या अन चाचाच्या! भावना मेल्यानंतर कितीतरी काळाने चाचाचे
लग्न झाले होते. त्यामुळे वासंतीला प्रत्यक्ष माहीत जरी काहीच नसले तरी ऐकून सगळेच माहीत होते. आणि... अबूसारख्या महाकाय माणसाला कित्येकदा साश्रूनयनांनी झोपताना वासंतीने स्वतःच पाहिलेले होते. बास.. तेवढेच... बाकी ढाब्यावरील एकालाही अबू, भावना, चाचा या त्रिकोणातील नात्यांची व्यवस्थित कल्पना नव्हती. आणि आज सर्वांसमक्ष चाचाने त्य निरागस नात्याचा खून करून टाकला होता.

काय होतंय हे समजायच्या आतच एखाद्या भयानक राक्षसासारख्या दिसणार्‍या अबूने चवताळून चाचाची गचांडी पकडली ...आणि...

राम रहीम ढाब्यावर त्या दिवशी पहिल्यांदाच... ढाब्याचा मालक लिटरली उचलून आपटला गेला..

हे दृष्य पाहून सगळे चाचाकडे धावले.. पद्याने अबूच्या समोर हात जोडून विनंती केली की हे सगळे थांबवा..

पण.. सुरुवात केली होती चाचाने... अत्यंत घाणेरडी सुरुवात.. अंत अबूच्या हातात होता...

दुखरे कंबरडे घेऊन अपमानीत होऊन उठत असताना चाचाने अबूला चालते व्हायला सांगीतले...

यशवंत अन सीमा थिजले होते भीतीने.. बायका तर एका कोपर्‍यातच गेल्या होत्या. सगळ्या पोरांनी मिळून चाचाला एका ठिकाणी बसवून पाणी प्यायला दिले होते... वासंती आक्रोश करून रडत होती.. चाचाला लागले यापेक्षा अबू अन चाचात भांडणे झाली याचेच तिला दु:ख जास्त होते.. अंजना तिची समजूत घालत होती..

राम आणि रहीम आज एकमेकांशी भांडले होते.. अभद्र... अभद्र छाया होती ढाब्यावर..

आणि.. अबूचे तोंड सुटले..

आजूबाजूला बायका आहेत, पोरे आहेत.. काहीही पाहिले नाही अबूने.. खास मालेगावी शिवराळ भाषेत त्याने चाचाचा आजवरचा पाढा वाचायला सुरुवात केली... अक्राळविक्राळ राक्षसासारखा भासत होता तो बोलताना... चेहर्‍यावर चाचाला उचलून आपटल्याचा कणभरही पश्चात्ताप नव्हता..

अबूबकर - **की औलाद.. **.. तेरा बाप.. तेरा बाप **मे पुछ डालके भागा भागा आया था उस दिन..
जान बचानेकेवास्ते.. मेरा जो भाय मेरेको घरमे नय लेता ना ***.. उसके मुंहपे थुकके मैने तेरेको अपने घरमे लिया था******... तेरे सारे खानदानको.. तेरी बहन मेरे वास्ते नय मरी मादर**... तेरे वजहसे मरी.. अपनी बहन की हिफाजत नय कर सकता गां*.. ना बापकी करता ना मांकी.. कुत्तेकी तरहा दौड रह्ये थे तेरे बाबूजी मुहल्लेमे.. इधर उधर कोई रखता क्या अपने परिवारको ये देखनेके लिये.. अमित है इसलिये मै जलता ****???.. तेरेको बेटा है इसलिये मै जलता?? तेरेको बीवी है इसलिये मै जलता??? ***** कौन था उसवक्त हॉस्पीटलका बिल भरनेको जब अमित दुसरी मंझिलसे गिर्‍या था.. ***** दमडी थी क्या तेरे पास उस वक्त... कौन था?? कौन था जो हर मुहल्लेमे भावनाके कातिलको ढुंढनेके लिये भूक प्यास भूलके घूम रहा था.. सारे सारे के मारे जाते तुम लोगां.. तुम लोगांकी झिंदगी हम हरामी मोहम्मेडियन्सने दी हुवी है.. जितना जी रहा.. हम हरामीयोंकी वजहसे जी रहा है तू ***..

ये वासंती... ये वासंती को पुछ.. तेरे बापने तेरे और इसके शादीमे तीन हजार रुपया मांगा था.. ये वासंतीके बापके पास क्या था?? क्या था उस वक्त उसके पास?? आं?? तब.. ***** तब ये हरामी मोहम्मेडियन वासंती का भाई बनके उधारीसे पैसा लेके आया था तेरे बापके पास.. तुने पैसा लौटानेको देढ साल लगाया.. लेकिन एहसान कैसे लौटायेगा बे ***... स्साले मच्छर.. तेरा प्रगती देखके मै क्या जलेगा... स्साले *** तेरा प्रगती हुवाच हम हरामियोंकी वजहसे है..

मेरेको शराब चढती है?? स्साले **** मेरेको चढती है शराब?? उस दिन की बातां याद नय?? जब तेरेको दो पेग ज्यादा होगये और तू गिरगया था.. उठाके रातभर मेरे हरपे रख्खा और सुभा भेजा तेरे घरपे.. तेरेको शरम आरही थी पीके बापके सामने जानेकी..

इधर का गणेश कौ बिठाता बे ***?? आं?? कौन बिठाता?? ढाबेपे गणेश बिठानेका शुरू किसने कियाय?? आं? ये... ये हरामी मोहम्मेडियन अबूबकरने... काफिर बनगया मै तेरे वास्ते.. काफिर.. मेरी कौम जलादेंगी जिंदा मेरेको.. ये सुनके..

स्साले.. मेरी सौतेली मा है ना.. तो उसका बनाया हुवा शीरखुर्मा और बिर्याणि मांगने के लिये और खाने के लिये घंटा घंटा भर कायको घुमता था घरके सामनेसे..कायको?? सौतेली मा है ना मेरी?? कायको उसकेच बगलमे सोया था उस दोपहरमे जब तेरे बापू गुस्सा होके तेरेको हकाले... अग्यार साल का था तब तू.. कायको हरामी के सौतेली मांके पास सोया अपनी मां समझकर?? कायको??

ये पद्याका खानदान जलगया था मुहल्लेमे.. पुरा का पुरा.. तू बचासका?? नय.. तेरे बापके तो खुदकीच लगी हुवी थी.. तू क्या बचायेंगा ***.. तो बादमे इसको ढाबेपे कामकेलिये लानेको मना कायको कर रहा था बे हिंदू?? कायको?? अनाथ बच्चोंको पालके ढाबेपे बडा करनेका आयडिया किसका था वासंती?? अब बोलो?? इसको बोलो अब?? किसका आयडिया था?? ये.. ये एक झिल्या छोडके कौनसा हरामी मोहम्मेडियन बच्चा लाये हम? आं??

और अगर हम हरामी हय.. तो स्साले उसी मुहल्लेमे अपनी ** क्युं मरवारहा था तेरा बाप बरसोंसे??

तेरा बेटा है करके मै जलता.. अबे मच्छर.. बेटा पैदा कोईबी करताय.. उसको बडाबी कोईबी करताय.. लेकिन जो काम हमने ढाबेपे किया वो कोई नय करताय.. दूसरेंके बच्चोंको पालनेका.. अपने बच्चेको कोईबी पालेंगा..

मी.. पीछले चार सालांसे सिर्फ पीरहा है ना?? आं?? काम नय कररहाय ना?? ***** तू पयले दिनसे गल्लेपे बादशाह बनके बैठाता है... कौनसी चीज बनासकताय तू?? कौनसी??

*** प्यार नय समझता प्यार?? तू क्या समझेंगा?? तेरेको तो मालूमच नय प्यार क्या होताय.. भावनापे मेरी नजर इसलिये नय थी के तुम्हारी कौमको बेइज्जत करे.. वो तो खुदच मेरेसे मुहोब्बत करती थी बचपनसे..

क्या गलती है दिपू की?? कायको उसकी नौकरी खारहा आज तू?? आं?? एक दिन था जब तू और मै नाशिकमे थे और काशी चला गया था.. उसके बाद काशी वापस आनेतक किसने चलाई रसोई तेरी *****??? किसने चलायी??

काजलबेटीसे उसको मुहोब्बत होगयी और उसकोबी दिपूसे प्यार होगया तो तू कायको बीचमे टांग अडारहा बे मच्छर?? तेरे बेटेकी शादी इस लडकीसे होनेकेलिये?? कायको? तेरे बेटेने कौनसा ताजमहल तामीर करके दिखादिया हय?? आं? मा बाप के सायेमे बडा होके पढेला है वो.. अमितके बापके पास पैसा है.. दिपूके बापके पास कुछबी नय... उसको तो बापच नय... दिपूकी गलती है ये?? आं??

अचानक चाचाने एक विषारी वाक्य उच्चारलं..

चाचा - तेराबी बाप मेरेच बापकी वजहसे जिंदा रहा.. उस दिन मेरे बापने स्कूटरपे उसको अस्पताल नय लेगया रयता तो.. मरच जाता तेराबी बाप.. तेरे सारे अहसान चुकते होगये उसमे...

अत्यंत हर्ट नजरेने अबूने चाचाकडे अन वासंतीकडे पाहिले..

अबूला आपले सामान घ्यायचीही गरज नव्हती.. ढाब्यावर त्याची असलेली एकही गोष्ट त्याला आता नको होती.. फक्त एक नवीन बाटली हातात घेऊन तो अत्यंत खिन्न चेहर्‍याने मागे वळला..

सगळ्यांना उद्देशून म्हणाला...

किट्टूका ध्यान रख्खोबे बच्चालोगां.. पागल है वो.. भोत गुस्सा होताय कबी कबी.. आजतक मै संभाल.. आजके बाद तुम्लोगां संभालना.. किट्टूको कुछबी हुवा मेरेको पता चला ना.. एक एक की मुंडि मरोडदेंगा मुर्गी की तरहा.. जारहा मै..

हादरलेल्या चेहर्‍याने सगळे अबूच्या बाहेर जाण्याकडे बघत असताना ...

.. वासंती किंचाळत अन धावत अबूकडे पोचली अन सर्वांदेखत 'मत जाओ भैय्या' असे म्हणून हमसाहमशी रडत तिने त्याला मिठी मारली...

हसणारा अबू... हसवणारा अबू.. ओरडणारा अबू.. वाट्टेलती कामे अचाट ताकदीने करणारा अबू.. वाट्टेल तितकी पिऊनही तसाच विनोदी बोलणारा अबू.. ढाब्यावर गुंड प्रवृत्तीची माणसे आली तर नुसते स्वतःच्या दर्शनानेच त्यांना घाबरवणारा अबू..

सगळी रूपे माहीत होती ढाब्याच्या स्टाफला..

पण आपल्या मिठीत आपली बहीण ओक्साबोक्शी रडत असताना ...

... रडणारा अबू ... होय... रडणारा अबू..

आजवर कुणीच पाहिला नव्हता...

राम रहीम ढाब्याचे चैतन्य, प्राण, जीव..

हातात केवळ एक बाटली घेऊन

सर्वांदेखत आज गेटच्या बाहेर बेदरकार चालीने जाताना एकेक माणसाने पाहिले..

आणि.. पहिला हंबरडा फोडला पद्याने..

मग बाळ्या.. झिल्या.... विकी.. दादू... मन्नू.. साखरू..

फक्त दिपू रडत नव्हता... आणि काजल... त्यांची स्वप्नेच उद्ध्वस्त झालेली होती.. आता काय रडायचे??

आणि.. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना... कसलाच अंदाज नसताना..

गणपतचाचाने... मुर्गी मारण्याची सुरी उचलली..

आणि.. पद्याचे लक्ष जाऊन त्याने त्वरेने हालचाल करण्यापुर्वी...

चाचाने ती सुरी स्वतःच्या पोटात खुपसली..

अबू निघून गेला ही घटना सहनच होऊ शकत नव्हती त्याला...

वेदनेचा पहिला डोंब उसळताच त्याच्या स्वतःच्याच हातातले त्राण गेले..

भयाण किंकाळी फोडत चाचाने सुरी हातातून सोडली होती..

नशीबाने सुरी फक्त त्वचेवरूनच फिरली होती.. तितके धाडसच झाले नव्हते चाचाचे.. सुरी आत खुपसण्याचे..

आणि अख्खा स्टाफ किंचाळून चाचाला उचलून गाडी शोधण्यासाठी गेटबाहेर धावत असताना ..

सर्वात पहिल्यांदा झिल्याचे लक्ष गेले..

तो तिकडे धावला..

गणपतचाचाचे धाडस झाले नसले तरीही...

अबूचे धाडस अगदी सहज झाले होते..

त्याने हातात घेतलेली बाटली नवीन नव्हती.. रिकामी होती.. आणि..

ती फोडून त्याने अलगद स्वतःच्या पोटात खुपसली होती... एक साधी किंचाळीही नाही..

मात्र.. अबूसारखा महाकाय माणूस इतका सहज मरणे शक्यच नव्हते.. तो वेदनांनी तळमळत रस्त्यावर पडला होता...

काजल अन इतर बायका ती दृष्ये पाहून किंचाळत होत्या.. मनीषाताई तर बेसुद्धच झाली होती..

आणि..

राम रहीम ढाब्याच्या प्रवेशद्वारावर आज रक्ताचा अभिषेक झाला होता..

रामच्याही ... आणि.. रहीमच्याही..

आणि जणू दोन तास आधीपासून बोलवावी तशी.. लांबवरून एक शिट्टी ऐकू येत होती...

कोणत्यातरी इमर्जनसीमुळे गेलेला रमण.. त्याच अ‍ॅब्युलन्समधून ढाब्यावर उतरणार होता आणि अ‍ॅब्युलन्स पुढे निघून जाणार होती..

पिंपळगाव (बसवंत) च्या फालतू रुग्णालयातून उलटे नाशिकला जेव्हा दोन रुग्णांचे स्थलांतर करण्यात आले.. तेव्हा..

सीमा अन यशवंतच्या मनात येत होते...

काजल अन अमितच्या लग्नापेक्षा..

अबू अन गणपतभाईची दोस्ती टिकली पाहिजे...

आणि निदान पुढचे दोन महिने तरी...

राम रहीम ढाब्याचे नेतृत्व.. प्रदीप डांगे यांच्याकदे येणार असल्याने..

हाफ राईस दाल मारके ही कहाणी.. दिलचस्प वळणे घेणार होती हे... निश्चीतच...!

गुलमोहर: 

विचार करणे कठीण झालय........मन एकदम सुन्न...........निशब्द.........आता पुढे काय ......!!!!!!

सुन्न.... सुन्न झालं डोकं!!!

काही सुचत नहीये.. plz पुढचा भाग लवकर येउ देत!!

अरे बापरे!!! एकदम भयानक वळण. मोठ्ठाच ट्विस्ट दिलात की स्टोरीला...
चाचा-अबूचे इतके विचित्र भांडण आज समोर वाढून ठेवले आहे अशी कल्पना काल दिली नाहीत ते बरंच झालं...आणि दोघेही मरणार नाहीयेत हा दिलासा आज दिलात हेही बरं झालं...
एक म्हण आहे ना, की भांडणात माणसाचा खरा स्वभाव समजतो, ते काही खरं नाही...
तोल सुटला की माणूस काही पण बोलतो, त्याच्या मनात असं काहीच नसतं...
अबूला हे पटणार. त्याचं मन मोठंय...ही राम-रहिमची जोडी नाही फुटणार, बरोबर ना?
फार गुंतायला होतंय ह्या कथेत. खरंच टि.व्ही. वरच्या मालिका फारच गुळमुळीत ह्या कथेपुढे. अप्रतिम! केवळ अप्रतिम!!!

पावणेबारा वाजलेत्..रात्रीचे. आठ वाजल्यापासून बसले आणी १-२० भाग वाचून काढले. गेले चार तास एका वेगळ्याच दुनियेत होते. असो. प्रतिक्रिया उद्या देते.