अपेक्षा

अपेक्षा

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 10 May, 2019 - 06:47

- (अर्धशतक शब्दकथा)

"त्याने सतत तुझाच विचार करत रहावं अशी इच्छा आहे का तुझी ?"- ती जरा घुश्श्यातच प्रश्नार्थी झाली,

"अजिबात नाही; त्याने निदान तसं भासवू तरी नये, इतकीच अपेक्षा आहे माझी" - ती हि निश्चयाने उत्तरली.

तिच्या त्या उत्तराने 'हरवलेली ती पुन्हा सापडली' या आनंदाने'; आरशातली 'ती'ही सुखावली.

.....मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 

लघुकथा - अपेक्षा

Submitted by भागवत on 11 December, 2017 - 04:59

बागेश्री ती तिच्या दुनियेत मग्न राहायची. ती स्व‍च्छंदी असल्यामुळे सगळ्या सोबत रमायची. पण आजोळी यायला टाळायची आप्पा मुळे. आप्पाच्या फटकळ वागण्यामुळे तिला इथे करमायचे नाही. आनंद आपल्या लाडक्या भाचीला आणि बहिणीला घेण्यासाठी स्टेशन वर आला होता. आप्पा खुप आनंदात होते. आज दिवाळी निमित्त घरी पाहुणे आले होते. नातवंडे, पाहुणे, सुना, मुला मध्ये आप्पाचा जीव रमायचा. आप्पाची मुलगी वसुधा सुद्धा आपल्या मुलीला बागेश्रीला सोबत घेऊन आली होती. तसे बागेश्रीचे जास्त काही जमायचे नाही आजोबा सोबत पण आईच्या आग्रहा खातर ती आली होती. पण या वेळेस बागेश्री आप्पा आनंदी वाटले नाहीत.

शब्दखुणा: 

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन) संगे !

Submitted by कुमार१ on 5 September, 2016 - 09:28

हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे.

विषय: 

हितगुज २०१२ दिवाळी अंकाकडून वाचकांच्या अपेक्षा काय?

Submitted by संपादक on 15 September, 2012 - 01:03

श्री गणरायाच्या आगमनाच्या तयारीत मग्न असतानाच एकीकडे चाहूल लागते दिवाळीची आणि अर्थातच दिवाळी अंकाची.

हितगुज दिवाळी अंकाचं यंदाचं हे तेरावं वर्ष. या वर्षीचा दिवाळी अंकदेखील आजवरच्या मायबोलीच्या वाचनीय दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसा असावा, हीच तुम्हां-आम्हां प्रत्येक मायबोलीकराची इच्छा! 'वाचकांच्या पसंतीस उतरेल' असा दिवाळी अंक प्रकाशित करण्याच्या कामात सर्वात मोलाचा सहभाग हा अर्थातच आपणा वाचकांचाच ...

Subscribe to RSS - अपेक्षा